PustakNaka

PustakNaka असा नाका जिथं असतं ट्रॅफिक पुस्तकं आणि वाचकांचं...

बऱ्याच दिवसानंतर झालापण गोष्टीचा शेवट झालाज्या फांदीला फळे लागलीत्या फांदीचा पोपट झालाएक काढली वीट वहीवरअन पानाचा विठ्ठल...
16/10/2025

बऱ्याच दिवसानंतर झाला
पण गोष्टीचा शेवट झाला

ज्या फांदीला फळे लागली
त्या फांदीचा पोपट झाला

एक काढली वीट वहीवर
अन पानाचा विठ्ठल झाला

जिंकत होतो शर्यत मीही
माझासुद्धा कासव झाला

उत्तर शेवट आले ‘नाही’
प्रश्न एवढा चावट झाला

लढलो होतो जेंव्हा जेंव्हा
या देहाचा पर्वत झाला

तुझी आठवण आली आणिक
विषय उगाचच लांबट झाला

- गिरीश जंगमे

वाचन प्रेरणा!!!❤️PustakNaka
15/10/2025

वाचन प्रेरणा!!!

❤️

PustakNaka

03/10/2025

माणूसपण टिकवण्याचं माध्यम 💚

#कविताप्रेमी #बुक #प्रेमी #काव्य #चारोळी #पुस्तक #मराठीपुस्तक #मराठीकविता

❤️
02/10/2025

❤️

बापू....बापू आज तुमची जयंती झाली,मोठी मोठी भाषणे झाली ..सरकारी तस्बीरींची पुन्हा एकदा पुजनं झाली।बापू तुमचा विचार मात्र ...
02/10/2025

बापू....

बापू आज तुमची जयंती झाली,
मोठी मोठी भाषणे झाली ..
सरकारी तस्बीरींची पुन्हा एकदा पुजनं झाली।
बापू तुमचा विचार मात्र आम्हाला उमजलाच नाही,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेचं नाही ।।

शहरं सारी बकाल झाली, गाव मात्र सुनसान झाली
शहरांमध्ये काम नाही गावामध्ये राम नाही ।
'खेड्यांकडे चला' तुमचा विचार आम्हाला समजला नाही ,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेचं नाही ।।

बापू तुम्हाला मारणारे आजं तुमची पूजा करत आहे, चरख्यांनं स्वातंत्र्य मिळतं का ? असं म्हणणारे सत्ता भोगत आहे।
कपडे घातले जरूर खादीचे
पण सत्तेसमोर सत्याचा विचार मात्र घेतला नाही,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेच नाही..।।

दिवसाढवळ्या रस्त्यावरती हवा तसा अत्याचार करता येतो ,
सत्य अहिंसेच्या देशात बापू कायदा हवा तसा वाकवता येतो ।
नोटेवरच्या गांधी पेक्षा पुस्तकातला गांधी मोठा नाही ,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेच नाही ।।

गोरगरिबांची चिंता कोणाला बापू?
'हरिजन' आता रस्त्यावर आहे ,
लाखो झाले तुमचे अनुयायी पण एक पटेल नेहरु दिसत नाही ।
गरिबांसाठी वस्त्र त्यागणारा बापू आता दिसणार नाही ,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेच नाही..।।

गांधी असा मरत नाही , गांधीला कोणी मारत नाही,
एक गांधी मारला म्हणून गांधी हा विचार मरत नाही।
स्वीकारा अथवा नाकारा गांधींना मात्र पर्याय नाही ,
माफ करा बापू आम्हाला गांधी कळलेच नाही..।।

विकास नवाळे

#बापू

भेदाच्या सीमारेषा पुसून टाकणारा भूमिनिष्ठ लेखक...--------------------------------------------------------------------काॅ...
29/09/2025

भेदाच्या सीमारेषा पुसून टाकणारा भूमिनिष्ठ लेखक...
--------------------------------------------------------------------

काॅलेजच्या स्नेहसंमेलनासाठी नवा, वेगळा आणि माणूसकेंद्री विचार मांडणाऱ्या लेखक कलावंतांना निमंत्रित करण्याची खूप चांगली परंपरा आमच्याकडे आहे. आता नेमकं साल आठवत नाही, पण पंधरा एक वर्षांपूर्वीचा तो काळ असावा. एकदा एन.डी पाटील सरांनी मला बोलावून सांगितले, 'अरे, भास्कर चंदनशिवांना आपल्याकडे एकदा बोलवा.' एरवी ते अशा गोष्टींमध्ये फारसं लक्ष घालत नसत. का कुणास ठाऊक पण त्या वर्षी त्यांनी बोलावून मला ही गोष्ट सांगितली. भास्कर चंदनशिव यांचे लेखन आवर्जून त्यांनी वाचलेले होते. दोघांच्या आस्थाविषयांमध्ये खूपसे साम्य होते. 'लाल चिखल' या त्यांच्या कथेचा अनेकदा आपल्या भाषणात आवर्जून ते उल्लेखही करायचे. त्यामुळे प्रत्यक्ष भेट नसली, तरी त्यांच्याप्रति एक प्रकारचे ममत्व त्यांच्या मनात होते. 'हा लेखक आपल्या शैक्षणिक संकुलात आला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांची त्याच्याशी भेट घडवून आणली पाहिजे,' अशी या मागची त्यांची धारणा होती. एक दोन दिवसात चंदनशिव यांचेशी फोनवर मी संपर्क केला. बोललो. कसलेही आढेवेढे अथवा अटीशर्ती न घालता स्नेहसंमेलनाला यायचं त्यांनी मान्य केलं. तारीख पक्की झाली. 'एनडी' सरांच्या कानावर जेव्हा मी ही बाब घातली, तेव्हा मनापासून त्यांना आनंद झाला...

उंची गाड्या उडवत येणाऱ्या आणि खाण्यापिण्यासह ऐनवेळी भलत्यासलत्या डिमांड करुन संयोजकाला बेजार करुन सोडणाऱ्या पाहुण्यांचा पूर्वानुभव विचारात घेऊन व्यवस्थेच्या सोयीसाठी 'कसे येणार?' विचारण्यासाठी मी त्यांना फोन केला, तर पलीकडून अत्यंत नम्र स्वरात ते म्हणाले, 'तुम्ही काही चिंता करु नका. मी एस.टी.ने येईन. तुमची गैरसोय करणार नाही. आदल्या दिवशी मुक्कामाला येईन.' एस.टी.ने म्हटल्यावर मला धक्काच बसला. त्यांच्याशी झालेल्या या चर्चेनंतर लाॅजवर रुम बुक करण्याच्या तयारीला मी लागलो. तर दरम्यान लातूरकडच्या आमच्या स्टाफमधल्या एका ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला कल्पना न देताच परस्पर चंदनशिव यांचेशी संपर्क केला आणि त्यांना आपल्या घरी मुक्कामी येण्याची विनंती केली. खरेतर भागवाले एवढा एक धागा सोडला, तर त्या दोघांचा तसा काही खास असा पूर्वपरिचयही नव्हता. तरीही ते आनंदाने या भागवाल्यांच्या घरी राहायला तयार झाले. 'काॅलेजच्या समारंभाचे पाहुणे आणि त्यांना असे स्टाफच्या घरी उतरवणे योग्य नव्हे.' असे प्राचार्यांचे मत पडले. ते मला म्हणाले,'पाहुणे एखाद्या जेवणाला अथवा नाश्त्याला त्यांच्याकडे जाणे ठीक. मुक्कामी ठेवणे काही ठीक नव्हे. तुम्ही पाहुण्यांशी बोलून घ्या.' माझी पंचाईत झाली. मी पुन्हा फोन केला, तर चंदनशिव मला म्हणाले, 'तुम्ही काहीही ताण घेऊ नका. मी निवांत राहीन गाववाल्यांकडे.' मी आपला प्राचार्यांना तसा निरोप दिला आणि पुढच्या तयारीला लागलो.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सांगितलेल्या एस.टी.ने अगदी ठरलेल्या वेळेत ते आले. आणायला आम्ही एस.टी. स्टॅन्डवर गेलो. जाताना स्वागतासाठी बुके नेला होता. तो घेताना त्यांना अवघडल्यासारखे झाले. 'बुकेची काही आवश्यकता नव्हती', असा काहीसा भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. कसलाही आव नाही. लेखकपणाचा ताल नाही. अत्यंत साधा आणि सालस माणूस. आमच्या नियोजनानुसार रात्री जेवणासाठी त्यांना बाहेर हाॅटेलात नेण्याचा बेत होता. तो ही त्यांनी रद्द केला आणि संबंधित भागवाल्यांच्या घरीच जेवण पसंत केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना उद्देशून ते अतिशय संथ पण काळजाला भिडणारे असे खूप बेसिक बोलले. मुलांना ते खूप भावले. त्यांची मांडणी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी होती. या कार्यक्रमात काॅलेजच्यावतीने त्यांचा सत्कार करताना एनडी सरांनी या लेखकाला आपल्या मिठीत घेतले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. एन.डी.पाटील कधीच कुणा ऐऱ्यागैऱ्याला असे मिठीत घेत नसत. समान प्रश्नांसाठी आपापल्या आस्थाभूमीवर उभं राहून लढणारे हे दोन दिग्गज. अर्धाएक दिवस दोघे एकमेकांच्या सहवासात होते. शेतीतले बदल, चळवळींची भूमिका या संदर्भाने बोलत होते. सर आवर्जून कौतुकाने त्यांना काॅलेजमधील अनेक नव्या वेगळ्या गोष्टी दाखवत होते. भूमीशी घट्ट नाळ जोडून उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी प्राण पणाला लावून लढणारा एक योद्धाविचारवंत आणि त्याच प्रश्नांसाठी आपली लेखणी झिजवणारा जमिनीवर पाय असलेला भूमिनिष्ठ लेखक यांचा हा संवाद नुसता ऐकण्यासारखाच नव्हे, तर तो ऊर्जादायीही होता...

रात्रीचे जेवण त्यांनी माझ्या घरी घेतले. कोल्हापुरी तांबड्या पांढर्‍या रश्श्याचा आग्र। धरुनही आवर्जून त्यांनी अगदी साधा शाकाहारी मेनूच सांगितला. अत्यंत आनंदाने जेवले आणि आम्ही त्यांना निरोप दिला. विशेष म्हणजे मानधनाची रक्कम त्यांनी आम्हाला सांगितली नव्हती. सारासारविवेकाने आम्हीच ती ठरवली होती. गंमत म्हणजे आवर्जून एनडी सरांनी आम्हाला ती रक्कम विचारुन घेतली आणि सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाकिटात आणखी दिडेक हजाराची रक्कम वाढवायला लावली. प्राचार्यांनी पाकीट त्यांच्या हातात घातले, तेव्हा रक्कम किती वगैरे असले गैरलागू प्रश्न त्यांनी उपस्थित केले नाहीत. अत्यंत आनंदाने कार्यक्रमाला ते आले. विद्यार्थ्यांशी संवाद केला आणि तितक्याच आनंदाने ते माघारी गेले. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांच्या आहारी जाऊन मानपानासाठी अडून बसणाऱ्या लेखकांच्या सवंग काळात लेखक इतका साधा आणि सरळ असू शकतो, हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला.

भास्कर चंदनशिव गेल्याची बातमी आली आणि आठवणींचा हा सारा पट माझ्या नजरेसमोरुन तरळून गेला. गावगाड्याचं, तिथल्या समूहभावाचं समग्र आकलन असलेला हा लेखक होता. आयुष्यभर आपल्या लेखनातून त्यांनी हे आकलन मांडले आणि गावगाड्याला अधिकाधिक माणूसपणाकडे नेण्याचा प्रयत्न केला. शोषणग्रस्त माणूस त्यांच्या लेखनाचा मुख्य गाभा होता. भूमीनिष्ठा साहित्यातल्या ग्रामीण, दलित अशा भेदाच्या सीमारेषा पुसून टाकणारा आणि जमिनीवर पाय असलेला मराठीतला हा खूप महत्त्वाचा लेखक होता. त्यांच्या जाण्याने पोकळी वगैरे निर्माण झाली म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांचे लेखन उद्याच्या काळात त्यांची पोकळी भरुन काढेल. कारण कुठल्याही काळात नोंद घ्यावा असाच हा लेखक होता. त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो...

- एकनाथ पाटील
इस्लामपूर

युवा गझलकार : प्रमोद जगताप.........................बाप सपान पेरतोमाय दुःखाला दळतेतिच्या कुंकवात मलाभाषा प्रेमाची कळते.सा...
28/09/2025

युवा गझलकार : प्रमोद जगताप.........................
बाप सपान पेरतो
माय दुःखाला दळते
तिच्या कुंकवात मला
भाषा प्रेमाची कळते.
सातारच्या ग्रंथमहोत्सवात काही वर्षापूर्वी ही कविता सादर झाली आणि ऊपस्थितांची दाद मिळवून गेली. अष्टाक्षरी छंदातली ही कविता सादर केली होती, प्रमोद जगताप या युवा कवीने. तो त्याच्या कवितेत लिहीतो,
बाप होतो घरदार
आई खिडकी बनते
गार सुखाची झुळूक
रोज घरात आणते..
आईबापाच्या त्यागाची मुळाक्षरं आणि वेदनेची बाराखडी गिरवणार्या या युवा कवीने सगळ्यांचे लक्ष वेधले. कविता सादर करण्याची त्याची पद्धतही अद्भूत होती.आईन गायलेली गाणी ऐकत आणि ती टिपून घेत तो लहानाचा मोठा झाला. आजोळला मामाकडे भजनी मंडळात अभंग आणि गवळणी गात गात त्याचा गळा सुरेल झाला. पुढे एनएसएस च्या माध्यमातून व्याख्यान आणि कवितांचे कार्यक्रम ऐकून त्या विचारांवर त्याचा पिंड पोसला गेला आणि त्याला त्याची कविता सापडली.

छंदोबद्ध कविता करता करता त्यात गेयता आली आणि आयुष्याच्या एका वळणावर त्याला गझल ही प्रिय झाली. साहित्यात अलीकडे गझल मोठ्या प्रमाणात रुजली असली तरी सातारा जिल्ह्यात गझल लिहिणारे अपवादानेच आढळतात. तंत्राच्या अंगाने कठीण असलेला हा प्रकार प्रमोद जगताप लिलया हाताळतात. अवघ्या आयुष्याचे सार काही शब्दात सांगणारा हा काव्यप्रकार. सध्या सातारा जिल्ह्यातील उमेदीच्या गझलकारांमध्ये प्रमोद जगताप हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे याचे कारण म्हणजे त्याची गझल केवळ रदीफ काफिया ही तंत्र वापरून शब्दांचे खेळ करत नाही तर या कवीला गझल साहित्य प्रकाराचे नेमके भान आहे. त्यात आर्तता आहे. भावनिक अवाहन आहे. आशयाची खोली आहे आणि रुपबंधाचीही जाण आहे.

फलटण तालुक्यातील गोखळी सारख्या छोट्या गावातून प्राथमिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेला हा युवक आज सहाय्यक प्राध्यापक आहे मात्र कधी काळी तो हायस्कूलला चक्क नापास झाला होता यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र प्रमोद यांनी खचून न जाता जिद्दीने हा प्रवास सुरू ठेवला. मुधोजी मधून महाविद्यालयीन शिक्षण घेऊन सातारच्या आझाद कॉलेज मधून त्यांनी शिक्षण शास्त्रात पदवी घेतली. सध्या ते अध्यापक म्हणून सेवा बजावीत आहेत.

2009 ला सुरू झालेला हा काव्य प्रवास 2019 साली गझलेत परावर्तित झाला आणि आज प्रमोद चक्क गझल रुजवण्यासाठी वर्ग घेत आहेत. आॕनलाईन क्लासेसमधून ते गझलकार घडवित आहेत. विवीध महाविद्यालयांमधून त्यांना गझल विषयावर साधन व्यक्ती म्हणून निमंत्रीत केले जाते.

कवी प्रमोद जगताप यांनी अनेक व्यासपीठं गाजवली आहेत.अनेक काव्यसंमेलनातून त्यांच्या कवितेची वाहवा झाली आहे. त्यांनी त्यांच्या गेय आवाजाने दिल्लीलाही धडक दिली आहे. ९८ व्या अखिल भारतीय काव्य संमेलनात त्यांच्या कवितेची निवडक झाली आहे. त्यांच्या साहित्यविषयक कार्यासाठी त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला आहे.

कवी कुसूमाग्रज म्हणतात,काव्याची अंतिम बांधीलकी असते ती जीवनाशी. शब्दांशी नव्हे.काव्याच्या दृष्टीने शब्दांची अथांगता जेवढी खरी, तेवढाच खरा सामाजिक व्यवस्थेतील अन्याय. कविता प्रचार करत नाही, पण संस्कार अवश्य करते.' प्रमोद यांची कविता अशीच जीवनवादी आहे, तिच्यात आक्रोश आहे तितकाच विद्रोहही आहे.

सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. हे दुःख या कविच्या लेखनीतूनही सुटत नाही. तो लिहितो,
कशी सोसावी कळेना,
ओल्या दुष्काळाची झळ
दोन्ही डोळ्यात भरलं
खार्या आसवांचं तळं.
शेतकर्याची दैन्यावस्था मांडताना हा कवी हतबल, हताश होतो, तेवढीच त्याची लेखनी टोकदार होते.

आयुष्यातला ऊनपाऊस झेलताना कविता ही गोष्ट जगण्याचं बळ देते. आधार देते. सिएचबी वर काम करताना हा कवी मनाचा प्राध्यापक बरेचदा व्यथितही होतो. ज्यांनी शब्दांच्या पालख्या वाहिल्या, जे साहित्ययात्रेत या पालखीचे भोई झाले, त्यांच्याच वाटयाला आयुष्यानं ही ऊपजीविकेची ओझी लादली. शेकडो शिक्षक आज या पोटाच्या ओझ्याखाली दबले आहेत. तरिही वेदनेतून सृजन फुलवण्याचे काम अखंडपणे करत आहेत. पूर्वी राजदरबारी कलावंतांना आश्रय होता. आता कलावंताला आधी पोटाची लढाई लढावी लागते. मात्र प्रमोद सारखे कलावंत ही लढाईही लढतीलच आणि जिंकूनही दाखवतील. शेवटी लेखक कवींना काय हवं असतं ? पोटापुरता पसा हवा असतो आणि हे शब्दांचं आभाळ लेखनिच्या टोकावर पेलण्यासाठी स्पेस. त्यामुळं प्रमोदसारखे लेखक कवी जपणं ही समाज म्हणून आपलीच जबाबदारी असते.

निलेश महिगावकर

जांभळं ढवंची गरगर गिरकीलाल चिखलाची कथा हुडकीपागोट्याची याद केली जिंदगीतुलाच ये कास्तकऱ्यांची बंदगीकमअस्सल गेले फळकूट घेऊ...
27/09/2025

जांभळं ढवंची गरगर गिरकी
लाल चिखलाची कथा हुडकी
पागोट्याची याद केली जिंदगी
तुलाच ये कास्तकऱ्यांची बंदगी

कमअस्सल गेले फळकूट घेऊन
तू गावासाठी गावाकडेच राहिला थांबून...

भास्कर चंदनशिव 🙏🏻🙏🏻

लघुकथाः आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात फारच कमी लोकं आलेतम्हणजे दोन काळे दोन इंगळे एक पाठक एकनागोलकर एक दाभाडे एक राजपू...
27/09/2025

लघुकथाः आपल्या आयुष्यात

आपल्या आयुष्यात फारच कमी लोकं आलेत
म्हणजे दोन काळे दोन इंगळे एक पाठक एक
नागोलकर एक दाभाडे एक राजपूत एक दिवटे
आधी भगत दुसरे भवरे कधीतरी डहाके कनाटे

काही आलेत तसेच गेलेत त्यांच्या काहीच आठवणी
उरल्या नाहीत शिल्लक काही तर कापरासारखे
जळून गेलेत चालताना सोबत सोबत काहींनी तर
शुभ्र पिसारा उघडण्याआधीच घेतले मिटून डोळे

काही तर कधीच आलेच नाहीत आपल्या आयुष्यात
तरीही जेवढा देता येईल तेवढा ताण टाकून
गेलेत मनावर काहीची सोबत नसूनही त्यांची
अनवाणी पावलं उमटत राहिली प्रवासभर सतत

काहींचे तर शब्दही पोहचले नाहीत आवाज वगैरे
तर दूरच ते तर त्यांच्या स्वत:चाही आयुष्यातूनही
हरवून गेले जे सापडलेच नाही शेवटालोक किंवा
जे यायचेयेत अजूनही तेही असेच होतील गायब

कांबळे वाघमारे गायकवाड मेश्राम जाधव पवार
देशमुख पाटील किंवा देशपांडे जोशी कुलकर्णी
खान पठाण शिवाय दिब्रीटो डायस शहा पारेख
हेही एकानंतर एक येतील तसेच जातीलही निघून

पण त्या कवीं लेखकांचं काय करशील
ज्यांच्या प्रतिभेची कल्हई
तुझ्या मेंदूवर चढण्याऐवजी
रातोरात त्याचेसोबत गेली उडून

आपल्या आयुष्यात फारच कमी कवी लोकं
आलेत आणि गेलेत एक एक करत मुकाटपणे
जे उरलेत ते एकविसाच्या पलिकडचे असावेत
त्यांना कधी जा असं म्हणावं लागत नाही
आणि कितीही जा म्हटलं तरी ते जात नाहीत

🌿

दिनकर मनवर

#दिनकर #कविताप्रेमी #मराठी

लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला, पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,मदतीच्य...
27/09/2025

लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला,
पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या
निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,
मदतीच्या आशेने एखादे स्वप्न घट्ट बिलगेल तुमच्या पावलांना.
क्षणभर तरी, त्याला उराशी कवटाळून घ्या,
त्याचं सांत्वन करा, त्याच्याशी बोला
मग, तुमचं काळीज डोळ्यांतून वाहू लागेल!

- समीर गायकवाड

□ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'कथाकार  बाबूराव बागुल पुर...
27/09/2025

□ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'कथाकार बाबूराव बागुल पुरस्कार' २०२४ डॉ. विवेक कुडू यांच्या 'चार चपटे मासे' कथासंग्रहास जाहीर...
•••
Vivek Kudu | Shabd Publication | Yeshu Patil 🌿

#अभिनंदन

आवृत्ती;१दुर्मिळ. २नवी. ✨बाकी...माडगूळकर म्हणजे ❤️ #बुक  #पुस्तक  #कविताप्रेमी  #वारी  #माडगूळकर  #लेखक  #मराठीपुस्तक   ...
27/09/2025

आवृत्ती;

१
दुर्मिळ.

२
नवी. ✨

बाकी...
माडगूळकर म्हणजे ❤️

#बुक #पुस्तक #कविताप्रेमी #वारी #माडगूळकर #लेखक #मराठीपुस्तक

Address

सातारा
सातारा

Telephone

+918767638724

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PustakNaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PustakNaka:

Shortcuts

Share

Category