17/07/2026
गुरुदत्त कॉलोनी भेकराई नगर येथे वारंवार भेडसावणाऱ्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येसंदर्भात गुरुदत्त कॉलोनी मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप कुमार गवळी तसेच विघ्नहर्ता मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद वाघधरे तसेच स्थानिक रहिवासी यांनी निवेदन तयार केले. सदर निवेदनात नमूद केल्या प्रमाणे मागण्या मान्य न केल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. सदर निवेदन गुरुदत्त कॉलोनी येथील नागरिक तसेच फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच श्री.संदीप काका हरपळे, ॲड.विराज करचे, श्री.दयानंद मोरे, श्री काशीनाथ महाजन, मयूर कामथे,ओमकार जगताप, पियुष धुमाळ,शैलेश पवार,प्रथमेश धुमाळ,यांनी महा.वि.वि.कं.मार्या.कार्यालय फुरसुंगी येथे दिले त्यावेळी ईंजी.माने साहेब व ईंजी. कुलकर्णी मॅडम उपस्थित होते सदर वेळी माने साहेबांनी मागण्यांची पूर्तता करत ३०० स्क्वेर एम.एम. ची १२५ मीटर वायर देण्यास मंजुरी दिली व लोड डिवईड करण्याबाबत सर्वेक्षण करून पूर्तता करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.