बोल भाऊ

Directions

बोल भाऊ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बोल भाऊ, Shopping Service, mahavir market, NAVI MUMBAI.

29/08/2026

जिवाची मुंबई अन् जिवाभावाचे मुंबईकर; स्वतःचे जेवण आंदोलनकर्त्यांना देत जपली माणुसकी

मराठा आरक्षण आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या समाजबांधवांच्या मदतीसाठी मुंबईकर धावले; रेल्वेस्थानकांवर मुक्काम करणाऱ्यांना अन्न-पाणी देत दाखवला आपलेपणा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाजबांधव मुंबईत दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलनकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अनेक समाजबांधवांना रेल्वेस्थानके आणि उपलब्ध सार्वजनिक ठिकाणांचा आसरा घेत रात्र काढावी लागली.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी भोजनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावाहून येताना कुटुंबीयांनी सोबत दिलेली भाकरी, चटणी, ठेचा आणि कांदा हीच आंदोलनकर्त्यांची शिदोरी ठरली. दिवसभराचा प्रवास आणि आंदोलनाची धावपळ यामुळे थकलेले समाजबांधव रेल्वेस्थानकांवर बसून आपल्यासोबत आणलेले अन्न एकमेकांमध्ये वाटून खात होते.

नोकरदार मुंबईकरांनी दिले स्वतःचे डबे

आंदोलनकर्त्यांची ही परिस्थिती मुंबईत नोकरी करणाऱ्या मुंबईकर तरुण आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर अनेकांनी घरून स्वतःसाठी आणलेले जेवणाचे डबे आंदोलनासाठी आलेल्या बांधवांना दिले. काही मुंबईकरांनी पाण्याच्या बाटल्या, चहा आणि बिस्किटांचीही व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले.

“गावाकडून आलेला आपला समाजबांधव मुंबईत उपाशी राहू नये,” या भावनेतून मुंबईकरांनी केलेल्या मदतीने आंदोलनस्थळी आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. मदतीचे स्वरूप छोटे असले तरी त्यामागील माणुसकी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी मोठी होती.

रेल्वेस्थानक बनले तात्पुरते निवासस्थान

मुंबईत निवासाची मर्यादित साधने आणि आंदोलनकर्त्यांची प्रचंड संख्या यामुळे प्रत्येकाच्या राहण्याची व्यवस्था करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकांना रेल्वेस्थानकांच्या फलाटांवर आणि परिसरात मुक्काम करावा लागला. गैरसोय होत असतानाही समाजबांधवांनी संयम राखत एकमेकांना आधार दिला.

कोणाकडे अन्न कमी असल्यास उपलब्ध शिदोरी वाटून खाणे, वृद्धांना बसण्यासाठी जागा देणे आणि पाण्याची व्यवस्था करणे, अशा अनेक घटना यावेळी समोर आल्या. या प्रसंगांनी आंदोलनातील सामाजिक एकोपा अधोरेखित केला.

व्हिडिओतून समोर आली माणुसकी

आंदोलनासाठी आलेल्या समाजबांधवांना मुंबईकर आपले जेवण देत असल्याचा व्हिडिओ समोर आला. या दृश्याने मुंबईकरांच्या संवेदनशीलतेचे आणि आपलेपणाचे दर्शन घडवले. धावपळीच्या मुंबईत नोकरी करणाऱ्या बांधवांनी स्वतःची भूक बाजूला ठेवत आंदोलनकर्त्यांना मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

मुंबई ही केवळ गर्दी आणि उंच इमारतींची नगरी नसून संकटाच्या काळात मदतीसाठी धावणाऱ्या विशाल मनाच्या माणसांची नगरी असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रोजगारासाठी गाव सोडून मुंबईत आलेल्या समाजबांधवांच्या मनातील गावाकडची आपुलकी आणि माणुसकी आजही कायम असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

एका जेवणाच्या डब्यातून व्यक्त झालेली ही माणुसकी अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेली. आपल्या दारात आलेला पाहुणा, सगा-सोयरा किंवा समाजबांधव उपाशी राहता कामा नये, ही महाराष्ट्राची संस्कृती मुंबईकरांनी आपल्या कृतीतून जपली. हीच जिवाची मुंबई आणि हेच जिवाभावाचे मुंबईकर, अशी भावना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

जरांगें पाटलांची भीती खरी ठरली! पुरावे असूनही 'कुणबी' रद्द; विद्यार्थिनीचे शिक्षण धोक्यात, कुटुंबाचा टोकाच्या निर्णयाचा ...
28/08/2026

जरांगें पाटलांची भीती खरी ठरली! पुरावे असूनही 'कुणबी' रद्द; विद्यार्थिनीचे शिक्षण धोक्यात, कुटुंबाचा टोकाच्या निर्णयाचा इशारा

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वैध नसल्याच्या मुद्यावरून राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कुणबी प्रमाणपत्र वैध नसल्याने काही लोकप्रतिनिधींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यत्व रद्द करण्यात आले. आता, कुणबी प्रमाणपत्रावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे. कुणबी नोंद असल्याचे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे असूनही जात वैधत प्रमाणपत्र रद्द झाल्याचे समोर आले आहे. आत कुटुंबाने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

कुटुंबातील वडील, आजोबा, यांच्याकडेह 'कुणबी' जातीचे पक्के पुरावे उपलब्ध आहेत. तरीही त्यापूर्वीच्या नोंदी नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्र फेटाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वैजापूर तालुक्यातील बाधणी येथील शीतल सोनवणे आणि तिच्या कुटुंबातील एका विद्यार्थ्यावर ही वेळ आली असून, ऐन प्रवेशप्रक्रियेत प्रमाणपत्र नाकारल्याने या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण धोक्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल सोनवणे व तिच्या भावाचा उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास शासनाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती रद्द होण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मिळणारी सवलत बंद झाल्यास पूर्ण शैक्षणिक शुल्क भरणे या शेतकरी कुटुंबाला अजिबात शक्य नाही.

विद्यार्थीनीचे वडील उदय सोनावणे यांनी सांगितले की, माझ्या मुलीचे नाशिकमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश झाला आहे. त्याच अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे. २६ डिसेंबर २०२५ रोजी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला. माझ्या आजोबाची कुणबी नोंद आहे. घरी येऊन वारसाबाबतची चौकशी देखील झाली होती.

समाजकल्याणमध्ये जात प्रमाणपत्र वैधताबाबत चौकशी केल्यावर सांगितले की, माझे पंजोबा हे मराठा असल्याची नोंद असल्याने कुणबी प्रमाणपत्र नाकारण्यात येत असल्याचे कारण देण्यात आले. मराठा-कुणबी हे एकच आहेत, तरी जात वैधता प्रमाणपत्र नाकारले गेल्याने धक्का बसला असल्याचे सोनावणे यांनी सांगितले. हा प्रश्न न सुटल्यास आमच्यासमोर आत्महत्येचाच मार्ग उरला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, या मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने आणि संबंधित जात पडताळणी समितीने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा संघर्ष अटळ आहे...

26/08/2026
25/08/2026

भुजबळांवर लक्ष्मण हाके यांची पुन्हा टीका; मुलांबाबतच्या वक्तव्याने माळी समाजात संताप

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. यावेळी हाके यांनी भुजबळ यांच्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माळी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“ओबीसींचे नेतृत्व धनगर समाजाकडे जात असल्याचे माळी समाजातील काही नेत्यांना सहन होत नाही. भुजबळांची दोन्ही मुले काही कामाची नाहीत. तसेच भुजबळांनी अन्य कोणत्याही कार्यकर्त्याला वर येऊ अथवा पुढे जाऊ दिले नाही,” असे विधान हाके यांनी केले.

हाके यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेषतः भुजबळ यांच्या मुलांना लक्ष्य करण्यात आल्याने माळी समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या टीकेवर छगन भुजबळ किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

24/08/2026

मराठी भाषेच्या सक्तीविरोधात परप्रांतीय रिक्षाचालकांचे आंदोलन

मराठी भाषेच्या सक्तीविरोधात परप्रांतीय रिक्षाचालकांनी आज आंदोलन केले. यावेळी आंदोलनादरम्यान मराठी भाषिक रिक्षाचालकांशी वाद झाल्याचे समोर आले असून, काही रिक्षाचालकांनी दादागिरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कांचा आणि मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातच मराठी भाषिकांना अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे का जावे लागत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

24/08/2026

भुजबळ-बिजबळ सोडा. आमदार-खासदारांनी धास्ती घेतली आहे. ते चिडतायत ना! माझा फोटो जरी बारका आहे, तरी ९०% मला रिस्पॉन्स आहे. पण मी आबांना (नवनाथ वाघमारेला उद्देशून) पुढे करतोय...हाकेची छगन भुजबळांवर जोरदार टीका..

- ओबीसी नेते लक्ष्मण हाके

Address

Mahavir Market
Navi Mumbai
400703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोल भाऊ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share