01/06/2026
आई... आज तुझा वाढदिवस आहे, पण माझ्यासाठी हा दिवस फक्त वाढदिवस नाही... हा तुझ्या आठवणींनी पुन्हा एकदा मन भरून येण्याचा दिवस आहे. ❤️
तू गेलीस त्या दिवशी मी फक्त माझी आई गमावली नाही, तर माझा आधार, माझी सर्वात मोठी प्रेरणा आणि माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती गमावली..आजही आयुष्यात काही चांगलं घडलं की सर्वात आधी तुझी आठवण येते. मनात एकच विचार येतो...
"आई, बघ ना... तुझी मुलगी प्रयत्न करतेय. तुझी मुलगी हार मानली नाही."
Ekdant Artbox हा फक्त एक व्यवसाय किंवा ब्रँड नाही. हे माझ्या डोळ्यांतल्या अश्रूंमधून, मनातल्या वेदनांमधून आणि तुझ्या आठवणींमधून जन्माला आलेलं स्वप्न आहे.
कितीतरी वेळा वाटलं सगळं सोडून द्यावं. कितीतरी रात्री रडत रडत काढल्या. कारण प्रत्येक यशाच्या मागे तुझी उणीव आणखी जास्त जाणवते..किती छान झालं असतं ना आई... आज तू माझ्या बाजूला असतीस... मी तुला हे सगळं दाखवलं असतं... आणि तुझ्या चेहऱ्यावरचा अभिमान पाहिला असता..ही एक इच्छा आहे जी आयुष्यभर अपुरीच राहील..पण मला विश्वास आहे... तू कुठेतरी आहेस... माझ्याकडे बघतेयस... माझ्यासाठी प्रार्थना करतेयस... आणि प्रत्येक यशाच्या क्षणी माझ्याइतकंच आनंदी होत असशील..
आज लोक Ekdant Artbox पाहतात...त्यांना एक ब्रँड दिसतो... एक व्यवसाय दिसतो... एक स्वप्न पूर्ण होताना दिसतं...पण मला त्यामागे फक्त तू दिसतेस.
कारण Ekdant Artbox ची सुरुवात व्यवसाय म्हणून झाली नाही...
ती झाली एका मुलीच्या तुटलेल्या हृदयातून...
जिला तिच्या आईची खूप आठवण येत होती.
जिला तिच्या दुःखाला एक अर्थ द्यायचा होता..
जिला तिच्या आईला अभिमान वाटेल असं काहीतरी घडवायचं होतं.
आई...
जेव्हा मी पहिली ऑर्डर घेतली, तू आठवलीस.
जेव्हा पहिल्यांदा कुणी माझ्या कामाचं कौतुक केलं, तू आठवलीस.
जेव्हा मी नवीन स्वप्न बघितलं, तू आठवलीस.
आणि आज, जेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे...तेव्हाही सर्वात जास्त तूच आठवतेस.
कारण या क्षणी मला फक्त एकदाच तुझ्याकडे धावत जाऊन म्हणायचं आहे—
"आई, बघ...तुझी मुलगी जमवतेय.
तू ज्या स्वप्नांवर विश्वास ठेवला होता, ती आता खरी होत आहेत."
किती विचित्र आहे ना आई...लहानपणी तुझा वाढदिवस आला की तुला काय द्यायचं याचा विचार करायचे.
आणि आज...
आज माझ्याकडे तुला देण्यासाठी खूप काही आहे, पण तूच नाहीस.
आज मला तुला सांगायचं आहे की तुझी मुलगी मोठी झाली.
जबाबदाऱ्या सांभाळतेय.
स्वप्नांसाठी लढतेय.
हार मानत नाहीये.
पण हे सगळं करताना रोज एक गोष्ट जाणवते...
"आई, तू असतीस तर किती बरं झालं असतं..."
Happy Birthday Aai🥹❤️🧿