टिंब Timb.in

टिंब  Timb.in पुस्तकांचे Online गाव प्रत्येक पुस्तकप्रेमीचे स्वप्न

मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाह...
19/06/2025

मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण – ‘नरकातला स्वर्ग.’ भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल… राजू परूळेकर

रामाच्या पदचिन्हांवरून - मकरंद करंदीकरपुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक !  मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्य...
12/07/2024

रामाच्या पदचिन्हांवरून - मकरंद करंदीकर

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक ! मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला.

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

https://timb.in/रामाच्या-पदचिन्हांवरून/

रामाच्या पदचिन्हांवरून - रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग

https://timb.in/रामाच्या-पदचिन्हांवरून/रामाच्या पदचिन्हांवरून - मकरंद करंदीकरपुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचि...
12/07/2024

https://timb.in/रामाच्या-पदचिन्हांवरून/

रामाच्या पदचिन्हांवरून - मकरंद करंदीकर

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक ! मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला.

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास!

रामाच्या पदचिन्हांवरून - रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग

07/05/2024

गेले लिहायचे राहून -मृदुला भाटकर

https://timb.in/गेले-लिहायचे-राहूनजनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या...
07/05/2024

https://timb.in/गेले-लिहायचे-राहून

जनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. ऑक्टोबर १९९२च्या सुमारास मला निरोप आला, "आप को सुखदेवसिंगने मिलने को बुलाया है।" तोपर्यंत सुखा नावाचं प्रकरण वकील म्हणून आमच्या लेखी संपलं होतं. मला हा निरोप आल्यावर कळेना की मला त्याने असा निरोप का दिला असेल?

गेले लिहायचे राहून -मृदुला भाटकर

06/05/2024

लोकप्रिय कादंबरी ‘वनवास' - ‘लंपन’ची गोष्ट - प्रकाश नारायण संत

https://timb.in/वनवास-लंपनची-गोष्ट/ लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ...
06/05/2024

https://timb.in/वनवास-लंपनची-गोष्ट/

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या’ तरी’ त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटूकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येती आहे ह्या आनंदात मी आहे.

प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन.

– पु. ल. देशपांडे

लोकप्रिय कादंबरी ‘वनवास' - ‘लंपन’ची गोष्ट - प्रकाश नारायण संत

https://timb.in/जगभरातले-धटिंगण-राजकारणी/लोकशाहीतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तकआज अनेक देशांमध्ये लोकशाही ...
02/05/2024

https://timb.in/जगभरातले-धटिंगण-राजकारणी/

लोकशाहीतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक

आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते. तिथे माध्यमं आहेत. न्यायालयं, विरोधी पक्ष सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते. पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात. असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत.

हुकूमशहा, लोकशाहीतले हुकूमशहा, निळू दामले, समकालीन प्रकाशन, राजकारण, मराठी पुस्तक

https://timb.in/लढणारी-पत्रकार/फिलिपिन्सचे प्रेसिडेंट ड्युटेर्टे या धटिंगणाशी कसा सामना करावा लागला याचं सोदाहरण कथन प्र...
01/05/2024

https://timb.in/लढणारी-पत्रकार/

फिलिपिन्सचे प्रेसिडेंट ड्युटेर्टे या धटिंगणाशी कसा सामना करावा लागला याचं सोदाहरण कथन प्रस्तुत पुस्तकात आहे. ड्युटेर्टे यांनी फेसबुक आणि इंटरनेटचा वापर करून अत्यंत खोटी आणि विषारी माहिती लोकांमधे पसरवली. फेसबुकचा कुशलतेनं आणि व्यासायिक वापर करून त्यांनी फेसबुकवर गट तयार केले. फेसबुवरचे मेसेजेस आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून आपल्या बाजूचे कोण आणि बाजूला नसलेले कोण याचा अभ्यास ड्युटेर्टेंच्या फेसबुक गटानं केला. बाजूच्या लोकांना भक्त केलं; त्यांना पटवलं की विरोधक दुष्ट आहेत; विरोधकांना बदनाम करणारी माहिती त्यांना पुरवण्यात आली. भक्तानी पूर्ण सायबर जग व्यापून टाकलं. विरोधक दुष्ट आहेत हे पटवल्यावर त्यांना जखमी करा, ठार मारा, त्यांना धडकी भरेल असे उद्योग करा असे संदेश फेसबुकवरून दिले गेले.

हुकूमशाहीशी सामना, निळू दामले,पुस्तक वाचन, English Book, पत्रकारिता, Maria Ressa (Author)

Address

Kothrud
Pune
411038

Telephone

+917517555150

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when टिंब Timb.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to टिंब Timb.in:

Shortcuts

Share

Category