04/02/2023
फूड सप्लीमेंट्स का आवश्यक आहेत ?
फूड सप्लिमेंट्स म्हणजे पूरक आहार. आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आपल्याला रोजच्या आहारातून मिळाली पाहिजेत. परंतु आजकाल रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आहाराची गुणवत्ता खालावली आहे.
आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा व सवयी योग्य नाहीत. त्यामुळे आवश्यक पौष्टिक घटक सर्वांना खूपच कमी प्रमाणात मिळतात. ही पौष्टिकता आपल्याला देण्याचे काम फूड सप्लिमेंट्स करतात.
आपण आजारी पडू नये, आरोग्य नेहमी चांगले रहावे यासाठी फूड सप्लिमेंट्स आवश्यक आहेत. आपला देश आरोग्याबद्दल अजून एवढा जागरूक नाही. आपण जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत तब्येतीची काळजी करीत नाही. Prevention is better than cure, हे नेहमी लक्षात ठेवावे.
आपण नेहमीची मेडीसिन घेतली की आजार बरा होतो. परंतु वेगवेगळे साईड इफेक्ट होतात. जास्त प्रमाणात मेडीसिन घेत राहिल्याने शरीराला सवय लागू शकते. त्याचे अनेक दूरगामी परिणाम होतात. आपण फूड सप्लिमेंट्स घेतली तर, संबधित आजारावर उपचार होतो. तसेच त्यासोबत इतरही अनेक फायदे होऊ शकतात. त्यामुळे फूड सप्लिमेंट्स हा नेहमीच्या औषधांना एक सर्वोत्तम पर्याय आहे.
अनेक आजारांना आपण आजार असे म्हणतो, पण त्यांना त्रास म्हणणे अधिक योग्य ठरेल. हे त्रास म्हणजे शरीराची एक अवस्था असे म्हणता येईल. मधुमेह, उच्चरक्तदाब, मूळव्याध, जॉईंट पेन, ऍसिडिटी, ऍलर्जी, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, कॅन्सर, थायरॉईड, त्वचेचे विकार हे रोग नाहीत. हे सर्व आपल्या शरीरातील उर्जा, जीवनसत्त्वे, खनिजे याची कमतरता, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे होणारे त्रास आहेत. त्यांना आजार म्हणून ट्रीटमेंट देणे फारसे योग्य नाही. कारण आपण औषधांवर जगावे, अशी आपली रचना परमेश्वराने किंवा निसर्गाने केलेली नाही.
आपण आजारी पडू नये यासाठी काय करावे असे डॉक्टरांना विचारले तर ते काय सांगतात? चौरस आहार घ्या, पालेभाज्या खा, ड्रायफ्रुट खा, फळे खा, मटन मासे खा. कारण त्यातच न्यूट्रिशनल घटक असतात. मात्र हल्लीच्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या गोष्टी सुरक्षित नाहीत.
फूड सप्लिमेंट्समुळे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आपल्याला मिळतील याची खात्री देता येते. आपण आजारी पडू नये, आरोग्य नेहमी चांगले रहावे यासाठी फूड सप्लिमेंट्स एक चांगला पर्याय आहे. फूड सप्लीमेंट ही संशोधन करून, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केली जातात. याचा वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य अबाधित ठेवू शकता. आजपासूनच फूड सप्लिमेंट्स वापरायला सुरुवात करा. आणि आपले आरोग्य सुरक्षित ठेवा.
*Join us on WhatsApp 9834617905
🍥🍥🍥