31/03/2020
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा आता मुंबईत आपल्या सोसायटीमध्ये.
हापूस आंबा ही कोकणची मुख्य अर्थव्यवस्था. कोरोना जागतिक संकटामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत छोटी धडपड म्हणून एक अभिनव संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला मुंबई पुणे शहरांमध्ये ही योजना राबवली जाईल. ही योजना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने राबवित आहोत.
वर्षभर प्रचंड परिश्रम करणारे, व फळांचा राजा हापूस आंबा याचा दर्जा राखणारे काही शेतकरी एकत्र येऊन आम्ही एक गट बनवला आहे. या शेतकऱ्यांचा दर्जेदार हापूस आंबा रत्नागिरी राजापूर देवगड दापोली इथून थेट शेतकऱ्याच्या बागेतून आपल्या सोसायटीमध्ये येऊ शकतो.
आपल्या सोसायटीमध्ये अंबा वितरण करणे ही जबाबदारी तिथल्या स्वयंसेवकांना घ्यावी लागेल. भरपूर क जीवनसत्त्व असलेला व रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणारा, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कोकणातला दर्जेदार हापूस आपला सोसायटीमध्ये घरोघर जाईल. आणि त्याच वेळी कोकणातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल.
सुरुवातीला चार डझन, पाच डझन आणि सहा डझन या साईजमध्ये लाकडी पेटीतून हाऊस आंबे आपल्या सोसायटीमध्ये दिले जातील. तिथून पुढे प्रत्येक सदस्याकडे आंबे देण्याची जबाबदारी सोसायटी मध्येच करावी लागेल. एका सोसायटीची ऑर्डर कमीत कमी 50 लाकडी बॉक्स म्हणजे दोनशे ते अडीचशे डझन ची असाव.
आंबा साईझ
हे संपूर्ण आंबे नैसर्गिक रित्या आडी मध्ये पिकवले जाणार आहेत. आणि दर्जेदार आंबे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
1- एका सोसायटीची ऑर्डर कमीत कमी 50 लाकडी पेटी म्हणजे दोनशे ते अडीचशे डझन ची असावी.
2- ऑर्डरचे पैसे हे ५०% ऍडव्हान्स आणि ५०% डिलिव्हरी च्या वेळी देणे.
3- ऑर्डर दिल्यापासून 5 किंवा 8 दिवशी हापूस आंबाची डिलेव्हरी आपल्या ठिकाणी करण्यात येईल.
4- सोसायटी पातळीवरील वाटप हे स्थानिक राहिवाश्यानी करावे.
5- सर्व पेट्यांचा भाव 2100/- रुपये प्रति पेटी राहील.
आंबा वजनाप्रमाणे-
1- चार डझन पेटी - 250 ते 275 ग्रॅम
2- पाच डझन पेटी - 225 ते 250 ग्रॅम
3- सहा डझन पेटी - 200 ते 225 ग्रॅम
4- साडे सहा डझन पेटी - 175 ते 200 ग्रॅम
For Orders Please send a message, What's up or Call - Pravin Naik +91- 9833118592