23/09/2016
सैराट नावाचं वादळच्या निमित्ताने....
मित्र /मैत्रिणींनो,
गेल्या ३-४ महिन्यांपासून सैराट या सिनेमाने महाराष्ट्रातील समाजमन पूरत ढवळून काढ़ल. सैराटने येथील तरुणाई तसेच अबालवृद्धांना अक्षरशः झिंगाटून, झपाटून टाकल. सैराट सिनेमा कसा होता हा मुद्दा चर्चेचा वा वादाचा ठरेल. परंतु एक सत्य मात्र कुणालाही नाकारता नाही येणार ते म्हणजे सैराटने मांडलेल्या सामाजिक विषयानिमित्त आपल्या महाराष्ट्रातील समर्थक व् विरोधक व्यक्त झाले. विषय ऑनर किलींगचा असो, जाती व्यवस्थेचा असो सरंजामशाहीचा असो वा शोषित विरुद्ध शोषणकर्त्यांचा असो; सैराटने सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून बोलते केले. सर्व समाजमनावर अस्वस्थतेची एक झालर सैराटने टाकली. समाजमानातील विशेषकरून तरुणाईच्या मनातील ही अस्वस्थता तटस्थपणे टिपण्याचा व ती संकलित करुन, तिला विविध अंगाने वेगळ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी '' सैराट नावाच वादळ '' या पुस्तकातून केलाय.सदर पुस्तक लवकरच प्रकाशित होवून मार्केटला येणार आहे.
या पुस्तकावर गेल्या ३ महिन्यांपासून मी लिखाण करीत होतो. सोशल मीडियावर अपडेट राहून, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या थियेटरमधे अनेकदा सैराट पाहून, सैराटवरील चर्चा, बातम्या वाचून,ऐकून सैराट बद्दलच्या एकूण एक प्रतिक्रिया, समर्थन, विरोध ऐकून, पाहून त्याचा समाजमनावर काय, कसा, किती परिणाम झाला किंवा होतोय हे पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुस्तक लिहितांना कुणाच्याही सामाजिक धार्मिक वा कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच उद्देश्य नाहीय. पुस्तकानिमित्त, सैराटनिमित्त आणि सैराटने समाजमानवर सोडलेल्या प्रभवानिमित्त आपणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद सधता यावा आणि या संवादातून निकोप मैत्रीचा आणि चर्चेचा धागा पकडून आपण सर्व मिळून चांगल घडण्यात आणि घडविण्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून हा ग्रुप व हे पेज बनविले आहे.
आशा करतो या ग्रुपवर आपण चर्चा व् संवादातून योग्य ते सहकार्य कराल.
धन्यवाद..... आपलाच
किशोर सुर्यवंशी
( लेखक - सैराट नावच वादळ )