Shree Process

Shree Process Shree Process is a leading OEM Manufacturer, Supplier of trophy, awards, etc.we supply all type of c We supply all type of gift article and photo frame.

Shree Process is a leading OEM Manufacturer, Supplier of trophy, awards, etc.we supply all type of crystal and wooden trophy and desktop gift or corporate gift. We are prominent names in the industry, offering an exceptional array of Crystal Trophy that are acclaimed for high quality and are designer in nature. They are appealing in looks and have sharp edges. They are appealing in nature and are

designed as per the latest fashion trends prevailing in the industry. This product is made-up by employing superior-grade raw material and with the aid of contemporary techniques according to the market guidelines.

दोन वर्षांपूर्वी...दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या ‘राजदंडाची’ निर्मिती आपल्या श्री प्रोसे...
26/12/2025

दोन वर्षांपूर्वी...

दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या ‘राजदंडाची’ निर्मिती आपल्या श्री प्रोसेस मध्ये करण्यात आली होती. त्या संदर्भातील पोस्ट आपण यापूर्वी शेअर केली होती.

याच परंपरेत पुढचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून यावर्षी डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी – पुणे यांच्यासाठी ‘ज्ञानदंड’ तयार करण्यात आला आहे. या ज्ञानदंडाबाबतची सविस्तर माहिती लवकरच शेअर केली जाईल.

असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियासाठी तयार करण्यात आलेला राजदंड कोल्हापूरमध्ये साकारला गेला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. राजदंड किंवा सेंगोल हे अधिकार, परंपरा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रतीक मानले जाते. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा दीक्षांत समारंभ, संस्था प्रारंभ किंवा उद्घाटन यांसारख्या औपचारिक प्रसंगी आजही जपली जाते.

आता त्याच परंपरेत डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसाठी तयार झालेल्या ज्ञानदंडाची भर पडत आहे. श्री प्रोसेस जरी ट्रॉफी, सन्मानचिन्हे आणि मानपत्र निर्मितीसाठी सुप्रसिद्ध असले, तरी वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानदंड, राजदंड आणि सेंगोल घडवण्यात आमचा एक अनोखा हातखंड आहे.

कोल्हापूरच्या मातीतील कारागिरी, परंपरेचा सन्मान आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम घडवत अशा ऐतिहासिक प्रतीकांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रवास आम्ही सातत्याने पुढे नेत आहोत.

17/12/2025

🚩मुघलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार – गौरवाचा अभिमानाचा क्षण 🚩

महाराणी ताराबाई छत्रपती यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित, अखिल भारतीय मराठा महासंघ व महाराणी ताराबाई छत्रपती ३५० वी जयंती वर्ष समिती यांच्या वतीने, मेजर स्वाती महाडिक यांना ‘मुघलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान सोहळा दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे दिमाखात पार पडला. देशसेवेचा वारसा जपणाऱ्या, शौर्य व धैर्याचे प्रतीक असलेल्या मेजर स्वाती महाडिक यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि मेजर जनरल एम. एन. काशीद यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी देण्यात आलेले सन्मानचिन्ह हे आपल्या श्री प्रोसेस वर्क्स येथे निर्मित करण्यात आले, ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

या स्मृतीचिन्हामध्ये छत्रपती महाराणी ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती दगडी चौथऱ्यावर उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी ताराराणी यांनी उभारलेल्या शौर्याचा भक्कम पाया या प्रतीकात्मक रचनेतून दाखववण्यात आला आहे.

संपूर्ण स्मृतीचिन्हासाठी ऍक्रेलिक बॉक्स कव्हरचा वापर करण्यात आला असून त्याच्या बॉक्स च्या बॅकग्राऊंडला पन्हाळा किल्ल्याच्या तीन दरवाज्यांची कमान दर्शविण्यात आली आहे. महाराणी ताराराणी यांनी कोल्हापूरची गादी स्थापन करून पन्हाळा ही राजधानी म्हणून उभारली, या ऐतिहासिक संदर्भाचे प्रतीक या कमानीतून अधोरेखित करण्यात आले आहे.

इतिहास आणि कलेचा संगम असलेले हे स्मृतीचिन्ह साकारण्याची संधी दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक साहेब, आणि महासंघातील सर्व पदाधिकारी यांचे श्री प्रोसेस वर्क्स कडून मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏

वैशिष्ठयपूर्ण स्मृतिचिन्ह, सन्मानपुरस्कार, मानपत्र या साठी आवश्य संपर्क करा श्री प्रोसेस वर्क्स, कोल्हापूर
7741091224

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर , 'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज' यांच्यावतीने आयोजित "हेरिटेज हंट कार रॅली २०२५ " नुकतीच यश...
29/04/2025

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर , 'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज' यांच्यावतीने आयोजित "हेरिटेज हंट कार रॅली २०२५ " नुकतीच यशस्वीपणे पार पडली. हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, यामागे आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि स्थानिक परंपरांचा अभ्यास दडलेला आहे. या रॅलीद्वारे सहभागींना ऐतिहासिक स्थळे, स्मारके आणि सांस्कृतिक वारसा स्थळांची माहिती मिळाली. खेळाडूंनी विविध ठिकाणी लपवलेले संकेत शोधले, कोडी सोडवली आणि त्या स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले.

या रॅलीला न्यू पॅलेस येथून सुरुवात झाली. श्रीमंत सौ. मधुरीमाराजे छत्रपती यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. क्लबचे सदस्य आणि अ‍ॅन्स यांनी मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

या उपक्रमासाठीच्या ट्रॉफीज आपल्या 'श्री प्रोसेस वर्क्स' मध्ये तयार करण्यात आल्या. ऍक्रेलिक बेस व आधुनिक यु व्ही. प्रिंटिंगतंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला होता. याच बरोबर संकेत चिन्ह म्हणून शिवमुद्रा देखील बनवण्यात आल्या होत्या, जे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्लब प्रेसिडेंट-रो. दिव्यराज वसा, सेक्रेटरी- रो. योगेश रास्ते, इव्हेंट चेअरमन- रो. चंदन मिरजकर यांचे विशेष आभार!

रो. सारिका बकरे- 9130365036
रो. सागर बकरे- 7741091224
- श्री प्रोसेस वर्क्स (ट्रॉफीज, मानपत्र, मेडल्सचे निर्माते)
- कान्होजी गिफ्ट्स (प्रमोशनल,कार्पोरेट व विशेष भेटवस्तू चे निर्माते)

२७ मार्च रोजी कोल्हापूरच्या दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात 'शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषद' हा कार्यक्र...
29/03/2025

२७ मार्च रोजी कोल्हापूरच्या दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात 'शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषद' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा 'बहुजन नायक' पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना सुप्रसिद्ध अभिनेते तसेच शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि संत साहित्याचे अभ्यासक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे उपस्थित होते.

हा भव्य नागरी सत्कार सोहळा हिंदू बहुजन महासंघ, मुलनिवासी क्षत्रिय परिषद, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा योद्धा-मावळा-शिव प्रबोधिनी-भवानी फाउंडेशन कोल्हापूर, संभाजी ब्रिगेड (सामाजिक), संभाजी ब्रिगेड (राजकीय), मराठा समाज सेवा संघटना आणि राजमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी इंद्रजीत सावंत यांना प्रदान करण्यात आलेल्या 'बहुजन नायक' पुरस्काराची निर्मिती श्री प्रोसेस वर्क्समध्ये करण्यात आली. या सन्मान पुरस्काराची संकल्पना मा. हर्षलजी सुर्वे यांनी मांडली होती. भरीव सागवानीमध्ये तयार करण्यात आलेले साडेतीन फूट उंचीचे आणि तब्बल सात किलो वजनाचे पेन, तसेच पुस्तकाच्या स्वरूपात साकारलेले भारताचे संविधान हे या पुरस्काराचे विशेष आकर्षण ठरले. योग्य त्या ठिकाणी धातूचा वापर, अत्याधुनिक यू. व्ही. प्रिंट आणि डेकोरेटिव्ह मटेरियलमुळे या पुरस्काराची भव्यता आणि सौंदर्य अधिकच वाढले. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषद' यांचे मनःपूर्वक आभार!

अशाच दर्जेदार आणि रचनात्मक सन्मानचिन्हे, मानपत्रे तसेच प्रमोशनल व कॉर्पोरेट गिफ्ट्ससाठी आम्हांला संपर्क करा.

श्री प्रोसेस वर्क्स व कान्होजी गिफ्ट्स, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी
सागर व सारिका बकरे
7741091224, 9130365036 ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषद' यांचे मनःपूर्वक आभार!

(इन्सेट मध्ये पुरस्काराची भव्यता दर्शवणारा, मुख्य सोहळ्यातील फोटो )

दुर्मिळ वृक्षांना श्री प्रोसेस निर्मित नेमप्लेटशहरामध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या अतिदुर्मिळ, दुर्मिळ व वारसा वृक्षांची माह...
28/01/2025

दुर्मिळ वृक्षांना श्री प्रोसेस निर्मित नेमप्लेट

शहरामध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या अतिदुर्मिळ, दुर्मिळ व वारसा वृक्षांची माहिती सर्व नागरिकांना सहजरित्या कळावी या उद्देशाने कोल्हापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षांना नामफलक लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आला. या नाम फलकात वृक्षाचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव यासोबत क्युआर कोड यांचा समावेश असून नागरिकांनी मोबाईलवरून क्युआर कोड स्कॅन केल्यास या वृक्षाबद्दलची संपुर्ण माहिती उदा. प्रजात, शास्त्रीय नाव व वृक्षांचे महत्व, छायाचित्रे अशी सर्व माहिती मिळणार आहे. तसेच सध्या महापालिकेमार्फत वृक्षगणनेचे काम सुरु असून यामध्येही वृक्षांची जात प्रजात शास्त्रीय नांव यांची नोंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महावीर उद्यानामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ मधुकर बाचुळकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहा.उद्यान अधिक्षक राम चव्हाण व उद्यान विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान या दुर्मिळ वृक्षांना लावण्यात आलेल्या नेमप्लेटस ची निर्मिती आपल्या श्री प्रोसेस मध्ये करण्यात आली. टिकाऊ ऍक्रेलिक शीट, त्यावर आधुनिक पद्धतीने यु.व्ही. प्रिटिंग करण्यात आले आहे. जे जल व हवामान प्रतिरोधक आहे. या शिवाय प्रत्येक प्लेटवर वेगळा क्यू आर कोड देण्यात आला आहे.

श्री प्रोसेस वर्क्स् व कान्होजी गिफ्टस्, कोल्हापूर.

सारिका सागर बकरे
9130365036
सागर विलास बकरे
7741091224





आज (२६ जानेवारी) ‘प्रजासत्ताक दिन...’आज ७६ वा ‘प्रजासत्ताक दिन...’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्य...
26/01/2025

आज (२६ जानेवारी) ‘प्रजासत्ताक दिन...’

आज ७६ वा ‘प्रजासत्ताक दिन...’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्यांच्या समितीने राज्यघटना तयार केली. २६ जानेवारी १९५० रोजी देशात राज्यघटना लागू झाली. देशाचा कारभार संविधानातील तरतुदी आणि नियमानुसार चालणार असल्याचे अधोरेखित झाले. या दिवशी भारत प्रजासत्ताक देश बनला.

लोकांनी, लोकांच्या कल्याणार्थ राबविलेली सत्ता / कारभार असा ‘प्रजासत्ताक’ शब्दाचा अर्थ आहे. यानिमित्त दरवर्षी देशात २६ जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा होतो. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायांमधील लोक एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. तिरंग्याला नमन करतात. दरवर्षी दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही ‘‘सुवर्ण भारत - वारसा आणि विकास’’ ही आहे.

देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेऊ या, या देशाचा नावलौकिक आणखी वाढवू या.
समस्त देशवासीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...

#प्रजासत्ताक_दिन #ध्वजारोहण #शुभेच्छा

आज (१४ जानेवारी) मकर संक्रांत...मकर संक्रांत हा सण भारताप्रमाणे आशियातील विविध देशांत वेगवेगळ्या नावाने १४ किंवा १५ जाने...
14/01/2025

आज (१४ जानेवारी) मकर संक्रांत...

मकर संक्रांत हा सण भारताप्रमाणे आशियातील विविध देशांत वेगवेगळ्या नावाने १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा होतो. हिंदू पुराणानुसार, या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र शनिदेवाला भेटायला जातात. १४ जानेवारीपासून सूर्य उत्तर दिशेला वळतो. म्हणजे याच दिवशी ‘उत्तरायण’ सुरु होते. आजच्या दिवशी लोक पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य देतात.

शेतकरी याच दिवशी त्यांच्या पिकांची कापणी करतात. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही मुले-मुली, युवा वर्ग उत्साहाने पतंग उडवितात. गूळ, तीळ, घोंगडी, फळे आणि इतर वस्तू दान केल्या जातात. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून शुभेच्छा देत तिळगूळ आणि गुळापासून बनविलेल्या वड्यांचे वाटप केले जाते. महिला ‘हळदीकुंकू’साठी एकमेकींच्या घरी जाऊन काही वस्तूंचे ‘वाण’ म्हणजे भेट देतात. एकमेकांत स्नेह वाढावा, प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे हाच उद्देश ‘संक्रांत’ साजरा करण्यामागे आहे.

सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...
‘तिळगूळ घ्या, गोड बोला...’

ंक्रांत #पवित्र_सण #शुभेच्छा #तिळगूळ_घ्या_गोड_बोला

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - १४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री द...
14/12/2024

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - १४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी विविध रूपांत दत्तात्रेयांना अवतार घ्यावा लागला. त्यानंतर आसुरी शक्‍ती नष्ट झाल्या.

दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ या शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘आत्रेय’ म्हणजे अत्री ऋषी व माता अनसूयेचा पुत्र. श्री दत्तात्रेय हे श्री विष्णूचा अवतार होत. आजच्या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री दत्तात्रेयांना मनोभावे नमन करू… दत्तात्रेयांची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना...
‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’

#श्रीदत्तप्रभू #श्रीदत्तजन्मोत्सव #अत्री_ऋषी #माता_अनसूया #गुरुचरित्र #नमन

12/12/2024
आज (कार्तिक द्वादशी - १३ नोव्हेंबर) तुळशी विवाह आरंभ...प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला महत्त्व देण्यात आल...
13/11/2024

आज (कार्तिक द्वादशी - १३ नोव्हेंबर) तुळशी विवाह आरंभ...

प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला महत्त्व देण्यात आले आहे. तुळशी विवाह हा श्री विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्ण याच्याशी तुळशीचा विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवसापासून तुळशी विवाहाला शुभारंभ होतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुहूर्त असतो. या विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरु होतो.

या काळात तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. तुळशीला गजरा, मंगळसूत्र, हिरवा चुडा, जोडवी यांनी सजवितात. दाराला तोरण व मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेनंतर बाळकृष्ण व तुळस यांचा विवाह लावला जातो.

हा पूजोत्सव करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. तुळशीचे रोप हे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड वायू शोषून, शुद्ध ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचा पुरवठा करते. या रोपामध्ये अलौकिक औषधी गुणधर्म असून ते अनेक रोगांचे निर्मूलन करते. म्हणूनच आयुर्वेदातही तुळशीला फार महत्त्व आहे. तुळशीचा विवाह आणि पूजा मनोभावाने केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाता प्रसन्न होते.

सर्वांना तुळशी विवाहाच्या मंगलमय शुभेच्छा...

#कार्तिकद्वादशी #तुळशीविवाह #श्रीविष्णू #पूजा #प्रार्थना

आज (१२ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशी / प्रबोधिनी एकादशीआज कार्तिकी एकादशी... चार महिन्यांपूर्वी देवशयनी एकादशी अर्थात आषाढी...
12/11/2024

आज (१२ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशी / प्रबोधिनी एकादशी

आज कार्तिकी एकादशी... चार महिन्यांपूर्वी देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीला निद्रेत गेलेले देव कार्तिक शुद्ध एकादशीला जागृत होतात, असे मानले जाते. म्हणूनच या एकादशीला ‘देवउठनी एकादशी / प्रबोधिनी एकादशी’ असेही संबोधले जाते. या दिवशी चतुर्मासाची समाप्ती होते. पंचांगाप्रमाणे वर्षभरातील २४ एकादशीपैकी सर्वांत दोन मोठ्या एकादशी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशी...

एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असल्याने कार्तिकी एकादशी दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला विशेष महत्त्व दिलं जातं. दरवर्षी या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते. हजारो वारकरी कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या ओढीनं पंढरपुरात दाखल झाले आहेत, येत आहेत. दिंड्या, पताका घेऊन टाळ, मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होताहेत.

श्री विठ्ठला, तुझी कृपादृष्टी सर्वांवर राहू दे... तुला मनोभावे साष्टांग वंदन...
विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल...

#कार्तिकीएकादशी #देवउठनीएकादशी #श्रीविठ्ठल #भक्ति #प्रार्थना #वंदन

Address

Shop No. 14, Dalal Market, Laxmipuri, Kolhapur. Contact-9422429668
Kolhapur
942242

Opening Hours

Monday 10:30am - 7am
Tuesday 10:30am - 7am
Wednesday 10:30am - 7am
Thursday 10:30am - 7am
Friday 10:30am - 7am
Saturday 10:30am - 7am

Telephone

+919422429668

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Process posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Process:

Share