13/06/2026
मध व्यवसायाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण शक्य --रवींद्र साठे
मधमाशी पालन व्यवसायातून केवळ मधच मिळत नसून मधाबरोबरच बहुमूल्य असे मेण, मधमाशांचे विष ,पराग , रोंगण , रॉयल जेली इत्यादी मधमाशी पालन व्यवसायातील उपउत्पादने संकलन करून देखील देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढ मिळत आहे. मधमाश्या द्वारे परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादन वाढीत 50 ते 60 टक्के वाढ होत असल्याचे प्रयोग आणि सिद्ध झाले असल्याची माहिती राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा) यांनी दिली. श्री रवींद्र साठे यांनी मुंढे तालुका कराड येथे मंडळाचे मधुबन या ब्रँडचे शॉपीचे उद्घाटन करून कराड ,पाटण परिसरात मध व्यवसायास चालना देण्यासाठी नुकतीच भेट दिली यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
साठे पुढे म्हणाले की , महिला या एखाद्या व्यवसायाचे उत्कृष्ट नियोजन करीत असतात मधमाशापालन व्यवसाय ही त्याला अपवाद नाही. महाबळेश्वर येथील मंडळाचे मध संचालनालय असून या संचालनालय मार्फत राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण देऊन मध उद्योगासाठी आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येते. या व्यवसायाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन साठे यांनी यावेळी केले. मंडळाने केलेल्या वेगवेगळ्या मध उद्योगातील नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी माहिती देताना साठी आणि मंडळाच्या सेंद्रिय हा उत्तम दर्जाचा मध असून दररोज आहारात मधाचा वापर करावा .याचे महत्त्व सांगताना हाईव्ह ...टू ... हेल्थ ही संकल्पना विशद केली .मंडळ सेंद्रिय मध संकलनाला चालना देत असल्याचे नमूद करून नजीकच्या काळात मधाचे गावातून आग्या मधमाशा द्वारे संकलित केलेल्या मधास सेंद्रिय मधाचे दर्जा प्रमाणीकरण करणार असल्याची माहिती दिली.
नीता बडेकर यांनी मंडळाचे विक्रेते म्हणून कराड पाटण परिसरात शॉपी सुरू करून शुभारंभ केल्याविषयी साठे आणि त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सातारा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी, मंडळाचे विशेष कार्य अधिकारी दिग्विजय पाटील ,उमेद तालुका अभियान व्यवस्थापक कराड निलेश प्रकाश पवार, विश्रांती पाटील सरपंच सुपणे , प्रवीण मानसिंग देसाई प्रभाग समन्वयक ग्राम संघ, रोहिणी पाटील, मधु सखी पुरस्कार विजेती पाटण,प्रतीक बडदे मधुक्षेत्रिक, दिलीप साळुंखे सेवानिवृत्त सचिव, प्रशांत बडेकर, त्या वेळी उपस्थित होते. यावेळी गणेश साठे यांनी प्रास्ताविक केले ,नीता बडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.