31/10/2025
अफवांवर विश्वास ठेवू नये
सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की महाराष्ट्रात शासनाची कोणतीही भाव फरक (भावांतर) योजना जाहीर झालेली नाही.
फक्त MSP वर NAFED मार्फत खरेदी जाहीर झालेली आहे.
तसेच भविष्यात भाव फरक योजना जाहीर झाली तर ती सहकारी मार्केट (APMCs) सोबत खाजगी बाजारांना (प्रायव्हेट मार्केट) सुद्धा लागू असणार आहे
> २०१६ मध्ये सोयाबीन अनुदान तसेच २०२३ आणि २०२४ च्या कांदा अनुदान योजनेत खाजगी बाजारात विक्री करणारे शेतकरी पात्र होते.
👉 सहकारी (APMCs) व खाजगी बाजार हे एकाच कायद्याखाली स्थापन झालेले शासनमान्य बाजार आहेत.
👉 भावांतर सारख्या योजनां संदर्भात व्यवहारात्मक दृष्टीने सरकारसाठी दोन्ही एकसमान आहेत.
👉 याबाबत कृषी पणन विभागाच्या संचालक साहेबांकडून आदेश जारी केलेले आहेत.