रींत आभाळ

रींत आभाळ मी जिच्यावर प्रेम केलं तिच्या सुखद स्?

03/04/2026

मित्र कोण आणि शत्रू कोण ,गणित साधे कळले नाही...
नाही भेटला असा कोणीही, ज्याने मला छळले नाही ...
रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे पण...
मी कोणाला कळलोच नाही...!!!

Hey guys to keep yourself updated with intraday, medium and long term stock investment picks join our telegram channel
03/12/2020

Hey guys to keep yourself updated with intraday, medium and long term stock investment picks join our telegram channel

I Advice Intrday,Short Term & Long Term Stock Disclaimer: Trade at your own risk and with proper trade plans. This channel is for education and awareness purpose .

21/11/2020

Jar Konala share Market help havi asel tar telegram group Join kara... its Free
Link in comments..

07/07/2018

चिंब पावसात भिजण्याची
मजाच काही वेगळी असते...
बंद डोळ्यांनी कुणाला तरी आठवण्याची
मजाच काही वेगळी असते...
अश्रू बनतात शब्द अन्
शब्द बनतात कविता...
खरंच कुणाच्या आठवणींसोबत जगण्याची
मजाच काही वेगळी असते...
अगदी तसंच...
भावना बनतात रेघोट्या,
अन् रेघोट्यांनी साकारतं चित्र...
खरंच, डोळ्यांत साठवुन,
मनात आठवुन...
कुणाला तरी कागदावर उतरवण्याची
नशाच काही वेगळी असते...
©जागृती सारंग

 #लाडकी_लेकमला आवडलेली कविता खास तुमच्यासाठीकळी मोहरावी तशी ती हसावी तिची पापणी अमृताने भिजावीगुलाबी खळी लाल गाली पडावीअ...
28/04/2018

#लाडकी_लेक

मला आवडलेली कविता खास तुमच्यासाठी

कळी मोहरावी तशी ती हसावी
तिची पापणी अमृताने भिजावी
गुलाबी खळी लाल गाली पडावी
अशी #लाडकी_लेक माझी असावी
तिचे हट्ट सारे पुरे मी करावे
मला आवडीने तिनेही छळावे
तिचे त्रास देणे, मजा खास यावी
अशी #लाडकी_लेक माझी असावी

तिचा राग नाकावरी रंग घ्यावा
मला पाहुनी तो जरा ओघळावा
व्यथा गोड माझी तिला आकळावी
अशी #लाडकी_लेक माझी असावी

तिचे बोलणे आरश्याला कळावे!
तिचे लाजणे पाकळीने पहावे
नटावे तिने चांदणी अन् झुकावी
अशी #लाडकी_लेक माझी असावी

प्रत्येकाला अशी लाडकी लेक दे देवा तुम्हाला पण #लाडकी_लेक असेल तर कविता लाईक शेअर आणि कमेंट करा.
लाडक्या लेकींनो ही कविता खास तुमच्या साठी तर अर्धे तुम्ही पण आईबाबाची लाडकी आहात ना मग पटकन एक कमेंट करा .......
तुमचा मित्र :- दत्तू नांदेडकर

*सोप्पं नसत "आई-बाप" होणं**मुलगी म्हणते.... “सँडलचं बक्कल नाही लागत...”*आई म्हणते, “जरा वाकून प्रयत्न कर... जमेल...”बाप ...
31/03/2018

*सोप्पं नसत "आई-बाप" होणं*

*मुलगी म्हणते.... “सँडलचं बक्कल नाही लागत...”*

आई म्हणते, “जरा वाकून प्रयत्न कर... जमेल...”
बाप उठतो... जमिनीवर बसतो आणि बक्कल लावून देतो
*मुलगी संतापाने घरात शिरते... “त्याने इन्सल्ट केला माझा”...*

आई म्हणते, “महत्त्वाचा नसेल माणूस आयुष्यात तर इग्नोर कर... विसर...”
बाप म्हणतो... “कोण आहे तो... नाव सांग... बदडूनच काढतो...”

*किचनमध्ये थोडंसं भाजतं लेकीला...*

बाप फर्स्ट एड घेऊन धावतो... कासावीस होतो
आई म्हणते, “असं छोटं-मोठं भाजणारच... अशा चटक्यांची सवय व्हायला हवी...”

*काकू नाक मुरडते लेकीला...*

बाप भडकतो...काकुला शिव्या घालायला धावतो.....
आई म्हणते, “सोडून दे... असे शिखंडी घरातच मिळणार कायम... विद्ध झालं तरी... कण्हायचं नाही...”

*लाड लाड करत राहतो बाप, सगळ्या वादळापासून जपत राहतो*

*शिकवत राहते आई... ओरडत राहते, प्रत्येक वादळाची...वेदनेची सवय करायला लावते. मुलगी मोठी होऊन तिच्या घरी जाते तेव्हा.......*

तेव्हा बाप दूर कुठे उगाचच व्याकुळ होतो आणि आईची घालमेल सुरु होते...

*मुलगी मात्र आई बनून मजेत असते ........कौतुक झेलताना बाप आठवत आसते आणि घायाळ होते तेव्हा आई आठवत आसते ...*

खरं तर......
"आईपण"
आणि
"बापपण"
हा एक नीव्वळ भाव असतो...

*कधी आई... आईच राहते तर कधी बाप होते*

*बाप... बापच राहत नाही सहज आई होत असतो...*

म्हणुनच मुलांना घडवताना एकजण आई झाली की दुसऱ्याने बाप व्हावं लागतं.

*पंखा खाली जपता जपता... पंखात जोर भरायला लागतो...*

क्षणोक्षणी आणी प्रसंगानुरूप वादळांची जाणीव द्यावी लागते.
समाजातील अपप्रवृत्तींशी झगडायची ताकद द्यायची आसते.
अनुरूप ठीकाणी मदत करण्याची सहजवृत्ती वाढवायची आसते.

*सोपं नसतंच... आई होणं आणि बाप ही होणं...*

खरोखरच एक सुंदर आणि विचार करायला लावणारी कविता ....!आज म्हटलं आयुष्य विणायला घेउयाजमतंय का ते बघुयावाटलं अगदी सोपं असेल!...
13/03/2018

खरोखरच एक सुंदर आणि विचार करायला लावणारी कविता ....!
आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया
जमतंय का ते बघुया
वाटलं अगदी सोपं असेल!
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल!
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे!!
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणू !
सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटलं छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम!
मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा!
थोडं थोडं आयुष्य आकार घेऊ लागलेलं
पण अजूनही बरंचस विणायचं बाकी रहिलेलं!
एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला!
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला!
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती!
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी!
एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला!
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते!
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते!
थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच!
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतंय का सुरेख!
मग घेतला एक धागा दुःखाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा!!
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे!
अपयशाशिवाय यश नाही
दुःखाशिवाय सुख नाही!
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही!
महत्व पटलं आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त मजा नसते आयुष्याला!
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच!
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणूनच
एक परिपूर्ण आयुष्य बनतं!
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याचं त्याच्यावर असतं !!

26/02/2018

" एक पान कोरंच ठेवलंय
रेखाटलेल्या बिंदुंसाठी
एक पान ओलंच ठेवलंय
गंध ताजा राहण्यासाठी..
एक वचनास, एक श्वसनास
एक 'शब्द' जपण्यासाठी..
एक पान 'राखून' ठेवलंय
सौंदर्य तुझं टिपण्यासाठी..
एक स्पर्शास, एक हास्यास
एक साद झेलण्यासाठी
'उघडून' ठेवलंय एक पान
तुझंच रूप पाहण्यासाठी..
दाटलेल्या घनघोर भावनेत
चिंब चिंब भिजण्यासाठी..
'जपून' ठेवलंय एक पान
तुझ्या आठवणींत रमण्यासाठी..
स्वराला तुझ्या चिरंतन
गती प्रकाशाची देण्यासाठी
एक पान 'मोकळंच' ठेवलंय
तुझ्याच धेय्यपूर्तीसाठी..
कंठात रुजलेलं एक गीत
कंठारवाने गाण्यासाठी
'पूजलं' आहे एक पान
गीत नवं लिहिण्यासाठी..

01/02/2018

'वाटर थेरपी; म्हणजेच जलउपचार पद्धत,
यात आतड्यांचं शुद्धीकरण केलं जातं, हा उपचार
घरच्या घरी करता येतो, यासाठी
याला शून्य खर्च येतो, जपानमध्ये
'वाटर थेरपी' प्रचंड लोकप्रिय झाली
आहे.
पोटाच्या आतड्याचं
शुद्धीकरण करणारी थेरपी
वाटर थेरपीमुळे चयापचाला वेग येतो,
आतडे धुवून निघतात, लठ्ठपणा झटपट
कमी होतो. त्वचा अधिक तेजस्वी
दिसते, अनेक आजार आटोक्यात
आणण्यास वाटर थेरपी फायदेशीर
ठरते.
ही थेरपी करण्यासाठी तुम्हाला
काही साध्या-सोप्या गोष्टी
करायच्या आहेत.
जपानमध्ये वाटर थेरपी सुरू करतांना,
मॉर्निंग वाक केल्यानंतर लगेच पाणी
पितात, मॉर्निग वाक न करताही
सकाळी उठल्यानंतर पाणी प्या,
म्हणजेच जलउपचार पद्धतीला सुरूवात
होते. काही वैद्यकीय चाचण्यांवरून
जलोपचार म्हणजेच आतड्यांच्या
शुद्धीकरणाला महत्वप्राप्त झालं
आहे.
दुर्धर, दुर्मिळ आजार, नवीन रोग
नियंत्रणात आणण्याची क्षमता
जलशुद्धीकरणात आहे. जपानीज
मेडिकल सोसायटीला यात १००
टक्के यश आलं आहे.
खालील आजारांवर वाटर
थेरपी प्रभावी
डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार,
संधीवात, ह्दयाचे जलद ठोके,
मिर्गी-अपस्मार, लठ्ठपणा, दमा,
टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह,
किडनी, मुत्राशयाचे आजार,
उलट्या, जठराची सूज, जुलाब, अपचन,
मूळव्याथ, मधूमेह-डायबेटीस,
बद्धकोष्ठता, डोळ्यांचे आजार,
गर्भाशयाचे आजार, कॅन्सर, मासिक
पाळींचा आजार, कान-नाक आणि
घशाचा आजार यावर जलशुद्धीकरण
पद्धती प्रभावी ठरली आहे.
अशी सुरू करा 'वाटर थेरपी'
१) सकाळी उठल्यानंतर ब्रश
करण्याआधी कमीत कमी अर्धा
लीटरच्या वर पाणी प्या. मात्र
त्याचं प्रमाण एकावेळेस ६००
मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे
प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू
वाढवा, म्हणजे पहिल्या दिवशी एक
ग्लास, तिसऱ्या दिवशी दोन ग्लास
याप्रमाणे.. पाण्यात फ्लुओराईडचं
प्रमाण नको, पाण्यात फ्लुओराईडचं
नाही याची खात्री करा, म्हणजेच
शुद्ध पाण्याचा वापर करा.
२) पाणी पिल्यानंतर ४५
मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा.
त्यानंतर मात्र आणखी ४५
मिनिटांचा अवकाश ठेवा.
३) यानंतर ४५ मिनिटं झाल्यानंतर
तुम्ही नाश्ता करू शकतात.
४) नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं
जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका,
प्रत्येक वेळी पाणी २ तासानंतर
प्या.
५) हे दररोज करा, शून्य पैशात तुमची
वाटर थेरपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे
असे समजा.
सूचना - ज्यांचं वय जास्त आहे, किंवा
जे नेहमी आजारी असतात, त्यांनी
अर्धा लीटर पाणी ऐवजी, चार
ग्लास पाणी पिणे चांगले असेल.
6. जे इतर आजारांवर उपचार घेत
असतील, त्यांनी ही थेरपी त्या
दरम्यान केल्यास त्यांना फायदा
होईल, मात्र त्यांनी एकदा त्यांच्या
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाहा खालील आजार
नियंत्रणात आणण्यासाठी
किती दिवस लागतील?
१) उच्च रक्तदाब - ३० दिवस
२) पोटाचे आजार (गॅस्ट्रिक) - १०
दिवस
३) डायबेटीस - ३० दिवस
४) बद्धकोष्ठता (मलावरोध) - १०
दिवस
५) कॅन्सर - १८० दिवस (मोठा फरक
दिसेल)
६) टीबी - ९० दिवस
७) संधिवातच्या रूग्णांनी ही
ट्रिटमेंट पहिल्या आठवड्यात ३
दिवस, तिसऱ्या आठवड्यात ३ दिवस
करावी, मात्र त्याआधी आपल्या
डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड
इफेक्ट नाहीत.
ही पद्धत तुम्ही रोज अंगीकारली तर तुमच्या आरोग्याला
मोठा फायदा होईल.

01/02/2018

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून
करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
४)हसत खेळत आणि भावूक गप्पामित्रासोबत
मारणे...!!!
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम
करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून
चालणे...!!!!
६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून
एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते
आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!
हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू
नका देवू....!!!!
नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे
क्षण..
आवडलं तर share नक्की करा ..

Address

Mumbai
400058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रींत आभाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category