Online shopping

Online shopping मराठी तरुणांनो एकदा एकत्र या आणि बघा काय होत ते

https://youtu.be/rdFcI8T9hNMछत्रपती शिवरायांचा मुख्य किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ले कोरीगड, मुंबई टू क...
13/11/2022

https://youtu.be/rdFcI8T9hNM
छत्रपती शिवरायांचा मुख्य किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ले कोरीगड, मुंबई टू कोरीगड व्हिडिओ नक्की बघा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका
Like
Share
Subscribe

कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वे.....

https://youtu.be/ywWu_voGXfE*आपल्या Maharashtra मधील अंबरनाथ येथील १००० वर्ष पूर्वीचे प्राचिन शिव मंदिर  पाहण्या सारखे आ...
02/09/2022

https://youtu.be/ywWu_voGXfE

*आपल्या Maharashtra मधील अंबरनाथ येथील १००० वर्ष पूर्वीचे प्राचिन शिव मंदिर पाहण्या सारखे आहे सर्वांनी जरूर पहावे.*

Ambernath Shiv Mandir || अंबरनाथचे प्राचीन मंदिर || Ambreshwar Templeमहाराष्ट्रातील १००० वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवमंदिर / Ambernath Shiv Mandir अंबरना....

https://youtu.be/MOb4oec6MkQ
10/02/2021

https://youtu.be/MOb4oec6MkQ

तुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी...

21/08/2020

* #शिवकालीन_स्वराज्यातील_किल्ले

*★ #विशाळगड_किल्ला ★*

*{ कोल्हापूर जिल्हा }*

*किल्ल्याचे नाव : विशाळगड किल्ला*
*किल्ल्याची ऊंची : ३३५० फूट*
*किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग*
*डोंगररांग : कोल्हापूर*
*चढाईची श्रेणी : मध्यम*
*जवळचे गाव : विशाळगड गाव*
*तालुका : शाहूवाडी*
*जिल्हा : कोल्हापूर, महाराष्ट्र*

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे.

◆ गडाचा इतिहास :

शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज (कार. सु. ११७५ – १२१२) याने दक्षिण महाराष्ट्रात सु. पंधरा किल्ले नव्याने बांधले, त्यांतील हा एक असावा.
दुसरा राजा भोज याने आपली राजधानी इ.स. ११९०च्या सुमारास कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला - भोजगड - खिलगिला - खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसर्‍या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोर्‍यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन मुळातूनच वाचायला हवे.

पुढे १४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करुनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो.
यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले.

३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.

संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नविन बांधकामे केली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला. इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.

डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशूराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत. इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली. म्हणून प्रतिनिधींनी मलकापूरला स्थलांतर केले. संस्थाने विलीन होईपर्यंत तो कोल्हापूरच्या प्रतिनिधी शाखेच्या ताब्यात होता.

◆ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

एस टी किंवा खाजगी वहानाने विशाळगडासमोरील वहानतळावर उतरल्यावर, समोर आडवा पसरलेला विशाळगड दिसतो. वहानतळात व विशाळगडामध्ये एक दरी आहे. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट, तर उजव्या बाजूची पायर्‍यांची फिरुन जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायर्‍यांच्या वाटेने उतरावे. म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात.
शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायर्‍यांची वाट खाली उतरते.

या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायर्‍यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जूनी फरसबंदी(दगडांची) वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरा समोरील कड्यावरुन पडणारे पाणी कुंड बांधून आडवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरावरुन तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलिकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात त्या ठिकाणी यावे.

तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायर्‍यांच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नविन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे. या मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हार्‍याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. प्रदक्षिणामार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत. विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महिरीपीवर केलेले कोरीव काम पाहाण्यासारखे आहे.

मंदिर पाहून जवळच असलेल्या पंतप्रतिनीधींच्या वाड्याकडे(राजवाड्याकडे) जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायर्‍यांची विहिर लागते. राजवाड्याचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे; प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भूयार आहे. या भूयारातून (उंची ३ फूट) रांगत जाता येते. भूयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरी जवळ आहे. राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला , दिंडी दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे. या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहिर आहे. या विहिरीवरुन पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो.
हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. येथे दुकानांची / हॉटेलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे. या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे. दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास ‘रणमंडळ’ टेकडी म्हणतात. येथेच खालच्या बाजूस एक ८ फुटी तोफ पडलेली आहे. ती पाहून पायर्‍यांच्या वाटेने गड उतरण्यास सुरुवात करावी. वाटेत एका चौथर्‍यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात; ती आहे राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. याशिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

◆ गडावर पोहोचण्याच्या वाटा :

कोल्हापूर - विशाळगड अंतर ८० किमी आहे. कोल्हापूरहून दोन मार्गांनी विशाळगडावर जाता येते.

१) कोल्हापूर - मलकापूर - पांढरपाणी (पावनखिंड) - भाततळी - गजापूर - विशाळगड या मार्गाने पावनखिंड पाहून विशाळगडावर जाता येते.

२) कोल्हापूर - मलकापूर - अंबा - गजापूर - विशाळगड
कोल्हापूर बस स्थानकातून विशाळगडला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस आहेत.

◆ गडावर राहाण्याची सोय :

गडावरील हॉटेलामध्ये(यातील बर्‍याच हॉटेलच्या खोल्यांना खिडक्याच नाहीत) रहाण्याची सोय आहे. तसेच भगवंतेश्वर व विठ्ठल मंदिरात श्री हर्डीकरांच्या परवानगीने रहाण्याची सोय होऊ शकेल. ज्यांना गडावर रहायचे नाही, त्यांची सोय पांढरपाणी (१५ किमी) किंवा गजापूर(३ कि मी) येथील शाळेत होऊ शकेल.

◆ गडावरील जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आहे

◆ गडावरील पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे

◆ सूचना :

गडाची सद्यस्थिती: गडाची सद्यस्थिती अतिशय भयंकर आहे. दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक अनाधिकृत हॉटेल्स झालेली आहेत. भक्तगण हॉटेलमधील रुमचा उपयोग जुगार खेळणे, दारु पिणे व मटण/चिकन खाणे याकरीता करतात. किल्ल्यावर सगळीकडे कोंबड्यांची पिसे, हाडे पडलेली आहेत. संडासांची सोय नसल्यामुळे किल्ल्यावर २ रुपये दराने पाण्याने भरलेला टमरेल मिळतो; तो वापरुन भक्त लोक आपली पोटे किल्ल्यावरच साफ करतात. त्यामुळे किल्ल्यावरील दर्ग्याकडील भागात प्रचंड दुर्गंधी/घाण पसरलेली असते. या अनाधिकृत बांधकामांना / कृत्यांना कोणीतरी आवर घालणे आवश्यक आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*

20/08/2020

🚩अंजनेरी किल्ला🚩नाशिक🚩

🚩१) जाण्याचा मार्ग :
किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे. या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.

🚩२) माहिती :
अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे.

🚩३) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.

🚩४) खाण्याची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपणच जेवणाची सोय करणे. मंदिराजवळच बारामाही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.

🚩५) राहण्याची सोय :
जनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची सोय होते.

20/08/2020

इरशाळगड किल्ला IRSHALGAD FORT IN THANE

इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.

इतिहास
तसे म्हटले तर या इरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे कारण इरशाळ हा एक सुळकाच आहे. त्यामुळे इतिहासातही त्याचा फार असा कुथे उल्लेख नाही. मे१६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. इरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटाना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारील मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत. तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगद हा परिसर दिसतो.
इरशाळावाडीत ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवणाची सोय नाही, स्वःताच जेवणाची सोय करावी लागते. मार्च पर्यंतच गडावरील टाक्यात पाणी असते इतर वेळी स्वतः पाण्याची सोय करावी लागते. जाण्यासाठी इरशाळवाडीतून एक तास लागतो.
सूचना: अतिकठीण (गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे) १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.

बाजींदभाग क्र.३४-----------------लेखन,संकल्पना,शब्दांकनपै.गणेश मानुगडेकुस्ती-मल्लविद्या----------------------वस्ताद काका...
14/08/2020

बाजींद
भाग क्र.३४
-----------------
लेखन,संकल्पना,शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
----------------------
वस्ताद काका व सखाराम सारे जण बाजिंद च्या जंगलात आले होते का ?
खंडोजी कुठे गेला यावेळी ?
खंडोजी म्हणून बहिर्जी नाईकांनी सखाराम ला मदत का केली ?
राजे येसाजीराव आणि सावित्री कुठे गेली ?
बाजिंद चे पुढे काय झाले ...?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा बाजींद भाग क्र.३४ वा.खालील लिंकद्वारे

https://drive.google.com/file/d/0B2rX95OXE1thY0tEUzJOVFNBT00/view?usp=drivesdk

धन्यवाद

पै.गणेश मानुगडे
---------------
समाप्त
🙏🏻बाजिंद कादंबरीला सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्वांनचे आभार🙏🏻

बाजींदभाग क्र.३३-----------------लेखन,संकल्पना,शब्दांकनपै.गणेश मानुगडेकुस्ती-मल्लविद्या----------------------वस्ताद काका...
13/08/2020

बाजींद
भाग क्र.३३
-----------------
लेखन,संकल्पना,शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
----------------------
वस्ताद काका व सखाराम सारे जण बाजिंद च्या जंगलात आले होते का ?
खंडोजी कुठे गेला यावेळी ?
खंडोजी म्हणून बहिर्जी नाईकांनी सखाराम ला मदत का केली ?
राजे येसाजीराव आणि सावित्री कुठे गेली ?
बाजिंद चे पुढे काय झाले ...?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा बाजींद भाग क्र.३३ वा.खालील लिंकद्वारे

https://drive.google.com/file/d/0B20X6m_Od--Uelo2eFR1X1lZZnc/view?usp=sharing

धन्यवाद

पै.गणेश मानुगडे
----------------

बाजींदभाग क्र.३२.................................लेखन,संकल्पना,शब्दांकनपै.गणेश मानुगडेकुस्ती-मल्लविद्या....................
12/08/2020

बाजींद
भाग क्र.३२.................................
लेखन,संकल्पना,शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या.......................................
जर खंडोजी ला मारले गेले होते तर सखाराम ला इतके दिवस बाजिंद ची गूढ कथा सांगत इथवर आणले कोणी ?
भूत,प्रेत कोणी अस्तित्वात असू शकते ?
सावित्री चे पुढे काय झाले ?
बाजिंद चे पुढे काय झाले ?
अशा अनेक प्रश्नाच्या उत्तरासाठी बाजिंद भाग क्र.३२ वाचा खालील लिंक द्वारे

https://drive.google.com/file/d/0B20X6m_Od--UOWc5andGeGpWcVE/view?usp=sharing

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
*************************

बाजींदभाग क्र.३१ वा.**************************लेखन,संकल्पना,शब्दांकनपै.गणेश मानुगडेकुस्ती-मल्लविद्या********************...
11/08/2020

बाजींद
भाग क्र.३१ वा.
**************************
लेखन,संकल्पना,शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
*************************
सखाराम ने खंडोजी ने दिलेल्या चांदीच्या पेटीने वस्ताद काका का भयभीत झाले ?
खंडोजीच्या आणि सावित्रीच्या जीवनात पुढे काय घडले ?

काय झाले पुढे हे जाणून घेण्यासाठी बाजिंद चा भाग क्रमांक ३१ वा खालील लिंकवरून Download करून घ्यावा.

https://drive.google.com/file/d/0B20X6m_Od--UeU5WeERvcldhYkE/view?usp=sharing

जास्तीत जास्त share करा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
*************************

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online shopping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share