Shivprasad Rathi

Shivprasad Rathi भाजपा, नांदेड
मा.निमंत्रित कार्यकारिणी सदस्य, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
मा. उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश

नांदेड : ‘नांदेड भूषण’ पुरस्काराने अशोकराव चव्हाण यांचा गौरवनांदेड येथे आयोजित ‘नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा’त पं. दीनदयाल ...
23/02/2026

नांदेड : ‘नांदेड भूषण’ पुरस्काराने अशोकराव चव्हाण यांचा गौरव

नांदेड येथे आयोजित ‘नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा’त पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना ‘नांदेड भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवा मोंढा मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

पुरस्कार स्वीकारताना खा. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राज्य व देशपातळीवर अनेक सन्मान मिळाले असले तरी आपल्या मातीत, आपल्या लोकांकडून मिळणारा सन्मान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतो. “नांदेडकरांनी दिलेली ही पावती माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अॅड. दिलीप ठाकूर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. निराधारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांच्या कार्याला आपण खंबीर पाठबळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपामार्फत त्यांच्या कविसंमेलनासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतही त्यांनी सूचनाही केल्या.

संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र व रोख रुपये ११,००० देऊन खा. चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माझ्याहस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजपा शहराध्यक्ष अमर राजुरकर, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संयोजक अॅड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकात खा. चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. पुढील काळात कवी संमेलन अधिक भव्य करण्याचा मानस व्यक्त करत प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना आमंत्रित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी मनपामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
सूत्रसंचालन संतोष देवराय यांनी तर आभार दिनेशसिंह ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

एकंदरीत, ‘नांदेड भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खा. अशोकराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.

यशस्वी भव!दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांनी...
20/02/2026

यशस्वी भव!
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांनी आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे लोककल्याणकारी राजे, अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनि...
19/02/2026

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे लोककल्याणकारी राजे, अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
त्यांच्या शौर्यगाथा, दूरदर्शी नेतृत्व आणि लोककल्याणकारी कारभाराची परंपरा आजही प्रेरणादायी आहे.

लोकमत परिवार यांच्या वतीने व्यापार, शेती आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकमतचे मा....
12/02/2026

लोकमत परिवार यांच्या वतीने व्यापार, शेती आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकमतचे मा. श्री तायडे साहेब, श्री राजेश निस्ताने, काकडे साहेब व देशमुख साहेब यांनी निवासस्थानी येऊन दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार.

#लोकमत #पुरस्कार #शिवप्रसाद_राठी #नांदेड #महाराष्ट्र

12/02/2026

📍काहिरा, इजिप्त.

व्यापार, शेती आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इजिप्तमधील ऐतिहासिक काहिरा शहरात आयोजित लोकमत वन वर्ल्ड समिट व पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये सन्मानित होण्याचा अभिमानास्पद क्षण लाभला.

या भव्य सोहळ्यात डॉ. विजय दर्डा, अमृता फडणवीस, अभिनेते बोमन इराणी तसेच भारतीय दूतावासाचे प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणे ही माझ्यासाठी केवळ गौरवाची बाब नसून, पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा आहे.

हा सन्मान माझ्या कार्यसंघ, सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सर्व शुभेच्छुकांच्या विश्वासामुळेच शक्य झाला.

लोकमत परिवाराचे मनःपूर्वक आभार !🙏

#लोकमत_जागतिक_सन्मान #इजिप्त #व्यापार #शेती #समाजकार्य

नांदेड महानगरपालिकेच्या पहिल्या भाजपच्या महापौरपदी सौ. कविता संतोष मुळे तसेच उपमहापौरपदी श्री. दीपक सिंह रावत यांची निवड...
11/02/2026

नांदेड महानगरपालिकेच्या पहिल्या भाजपच्या महापौरपदी सौ. कविता संतोष मुळे तसेच उपमहापौरपदी श्री. दीपक सिंह रावत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नांदेड शहराचा विकास अधिक गतीने होईल, शहरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि महानगरपालिकेचे कामकाज अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा ठाम विश्वास आहे.

सौ. कविता संतोष मुळे व श्री. दीपक सिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहर विकासाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करो, हीच मनापासून सदिच्छा!

🌿 सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई, पंचपक्वान, झिम्मा फुगडी, पूजा-आरतीची घाई! 🎶ज्येष्ठा गौरी आगमनाच्या सर्वांना ह...
31/08/2025

🌿 सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई, पंचपक्वान, झिम्मा फुगडी, पूजा-आरतीची घाई! 🎶
ज्येष्ठा गौरी आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸

#गौरी_आवाहन #गौराई

Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Nanded

29/08/2025

🌧️ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुरस्थिती कायम आहे. पुढील दिवसांतही पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडता जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

आपण सर्वांनी स्वतःची, आपल्या कुटुंबाची व पशुधनाची काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती !

#जिल्हाधिकारी

Devendra Fadnavis Ravindra Chavan CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Nanded

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !जागतिक स्तरावरील हॉकी विश्वात भारताचा ठसा उमटविणारे पद्मविभूषण मेजर...
29/08/2025

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जागतिक स्तरावरील हॉकी विश्वात भारताचा ठसा उमटविणारे पद्मविभूषण मेजर ध्यानचद यांना जयंतीदिनी कोटी-कोटी नमन !



Devendra Fadnavis
Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Nanded

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivprasad Rathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share