Nashik Informer

Nashik Informer Platform To Promote Buy/Sale, Shopping, News, Advertise, Tourist Place, Lease/Rent, Marketplace, Jobs Nashik Informer page tells about various places in Nashik.

On this page we are going to provide information about various religious, tourism places, shopping center in our Nashik city. This page is also a marketplace and on this you can advertise and market about buying and selling, jobs, product sale, services listing, flats sale / rent in Nashik.

पोलीस आयुक्तालय नाशिक शहर ट्रॅफिक वॉर्डन सदस्य नोंदणीसाठी १८ ते ५० वयोगटातील नागरिकांनी  खालील लिंकद्वारे नोंदणी करा.htt...
06/07/2023

पोलीस आयुक्तालय नाशिक शहर ट्रॅफिक वॉर्डन सदस्य नोंदणीसाठी १८ ते ५० वयोगटातील नागरिकांनी
खालील लिंकद्वारे नोंदणी करा.
https://forms.gle/qvys1pCNjzsH4Sum7

06/07/2023

Advertisement may be this is it..*जिओ स्टुडिओज प्रस्तुत आटपाट निर्मित*🔘खाशाबा 🥇🔘चित्रपट ऑडिशन🎬🔘दिग्दर्शक नागराज पोपटराव ...
06/07/2023

Advertisement may be this is it..
*जिओ स्टुडिओज प्रस्तुत
आटपाट निर्मित*

🔘खाशाबा 🥇
🔘चित्रपट ऑडिशन🎬
🔘दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे

🔴फक्त मुलांसाठी

🔘वयोगट - ७ ते २५ वर्षे
🔘मराठी भाषा तसंच माती आणि 🔘मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक
🔘पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे)
🔘३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ.
🔘३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात 🔘माहिती सांगणारा व्हिडीओ.
🔘फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै

🔴फॉर्म भरण्यासाठी सोबत दिलेल्या URL लिंकचा वापर करा.

https://forms.gle/YUX23Uhji4oPzL4W9

23/05/2023

रुग्णांच्या सेवेत स्वामी विवेकानंद मल्टी
स्पेशालिटी हॉस्पिटल रुजू,
4 जूनला होणार उद्घाटन
मोफत तपासणी आरोग्य तपासणी सेवा सुरू.
त्र्यंबकेश्वर . 14 मे 2023.
श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, त्र्यंबकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले.
त्र्यंबकेश्वर तालुका व इतर जवळील भागातील आदिवासी तसेच इतर गरजू घटकांकरिता श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने, अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना केली असून लवकरात लवकर सर्व गरजूंना आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने रविवार दि.14 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले, त्वचा विकार, दंत रोग, स्त्रीरोग, नेत्र रोग, अस्थीरोग, बाल रोग, कॅन्सर, मेडिसिन यामध्ये मोफत उपचार व औषधे देण्यात आली. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोफत आरोग्य तपासणी दि. ३जुन पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत चालू राहणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांनी केले आहे. हॉस्पिटलचा औपचारिक उदघाटन सोहळा 4 जून रोजी सेवाभावी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्रंबकेश्वर तुपादेवी समोर तळवाडे व्हिलेज रोड येथे हॉस्पिटल असून सद्या बाह्य रुग्ण विभाग ओपीडी सेवा सुरू झालेली आहे.
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून वरील हॉस्पिटल कार्यरत राहणार आहे. निसर्गरम्य वातावरणातील हॉस्पिटल रुग्णांना वरदान ठरेल चित्र आहे.

नाशिक शहरामधील कोव्हिड-19 संदर्भातील महत्त्वाची माहिती | दिनांक 13/06/2021.आपल्या शहरातील कोव्हिड-१९ संदर्भातील माहिती ल...
13/06/2021

नाशिक शहरामधील कोव्हिड-19 संदर्भातील महत्त्वाची माहिती | दिनांक 13/06/2021.

आपल्या शहरातील कोव्हिड-१९ संदर्भातील माहिती लाईव्ह डॅशबोर्डच्या माद्यमातून मिळविण्यासाठी क्लिक करा.

https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html


नाशिक जिल्ह्याला शासनाच्या अनलॉक लेव्हल तीन मध्येच ठेवण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय; अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात...
12/06/2021

नाशिक जिल्ह्याला शासनाच्या अनलॉक लेव्हल तीन मध्येच ठेवण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय; अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी ग्रामीण भागातील वाढती कोरोना बाधितांची संख्या अडसर, निर्बंध शिथिल होण्यासाठी अजून एक आठवडा प्रतीक्षा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिकमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे तर मृत्यू दर १.४३ टक्के आहे. खाजगी हॉस्पिटलमधील ५२२ बळींची संख्या पोर्टलवर अद्ययावत करणे बाकी आहे आहे. जिल्ह्याचा सरासरी मृत्युदर १.८१ आहे.

हॉस्पिटलमध्ये बेड्स मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्ह्यात १०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत असून सर्व हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन पुरेसा आहे.

निर्बंधात लॉन्स करीता शनिवार आणि रविवार परवानगी देण्यात आली आहे. ५० लोकांत लग्नसमारंभ करण्याचं बंधन आहे त्याचप्रमाणे यासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच वेळ आहे. इतर सर्व निर्बंध कायम आहे. विकेंड लॉकडाऊन हा सुरूच राहील. परिस्थिती सुधारल्यास पुढील आठवड्यात आणखी शिथिलता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

 #म्युकोरमायकोसिस म्हणजे नक्की काय आहे?लक्षणे कोणती असू शकतात?  #म्युकोरमायकोसिस कोणाला होऊ शकतो?कशाप्रकारे काळजी घ्यावी...
23/05/2021

#म्युकोरमायकोसिस म्हणजे नक्की काय आहे?

लक्षणे कोणती असू शकतात? #म्युकोरमायकोसिस कोणाला होऊ शकतो?
कशाप्रकारे काळजी घ्यावी? या संदर्भातील माहिती सर्व माहितीसाठी जरूर वाचा.

#म्युकोरमायकोसिस

...यंदा प्रथमच बाप्पा निघाले एसटीतून; पंचवटी आगाराचा मूर्ती संकलन रथ
01/09/2020

...यंदा प्रथमच बाप्पा निघाले एसटीतून; पंचवटी आगाराचा मूर्ती संकलन रथ

नाशिक शहरामध्ये यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने पार पडला दरम्यान आज अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिक करण कड....

गणेश विसर्जनासाठी नाशिककरांची 'ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग'ला पसंती; इथे करता येईल बुकिंग।नाशिक : कोरोना विषाणूच्या साथीमुळे...
01/09/2020

गणेश विसर्जनासाठी नाशिककरांची 'ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग'ला पसंती; इथे करता येईल बुकिंग।

नाशिक : कोरोना विषाणूच्या साथीमुळे या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणेश विसर्जनाचे वेळी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि फॉक्सबेरी टेक्नोलॉजिज् यांच्या वतीने ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

:: नागरीकांनी उद्दंड प्रतिसाद ::

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्याने व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात येत आहे. ३० ऑगस्ट, १ सप्टेंबर या दिवसांकरता बुकिंगची सुविधा सुरु केली आहे. या उपक्रमाला २५०० पेक्षा जास्त नागरीकांनी उद्दंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत ११३१ नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेटचा लाभ घेतला आहे.

:: असे करता येईल बुकिंग ::

विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html
या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Ganpati Visarjan Booking हा पर्याय निवडल्यानंतर आपल्या भागातील कृत्रिम तलावांची किंवा मूर्ति स्वीकृती केंद्रांची यादी पहावी. गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन स्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩**स्वराज्याचे पहिले युवराज , दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परम...
14/05/2020

*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩*
*स्वराज्याचे पहिले युवराज , दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परमपराक्रमी रणधूरंधर शाक्तवीर बुध्दभुषणकार युगंधर अजिंक्य सर्जा मृत्युंजय शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचरणी* कोटी
कोटी मानाचा मुजरा
अवघ्या ९ वर्षांच्या अत्यल्प राजकीय कारकिर्दीत *छत्रपती शिवरायांनी* स्थापलेल्या *स्वराज्याचा विस्तार* *अटक पासून कटक पर्यंत करणार्या तसेच *वयाच्या ९ व्या वर्षी अनेक भाषांवर प्रभूत्व मिळवलेले संस्कृत पंडीत , जगातले सर्वात पहिले बुलेटप्रुफ जाकेट तयार करणारे* , *जगातला पहिला तरंगता तोफखाना बनवणारे* , *उसळत्या समुद्रात 800 मिटर रस्ता बनवणारे* ,
*स्वराज्यरक्षणार्थ दिवसातले 20 तास घोड्यावर स्वार होऊन* *दोन दोन हातांनी तलवार चालवणारे* ,
*सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे* , *एकाचवेळी 5आघाड्यांवर नेतृत्व करणारे* , *१४९ लढाया करुनही एकही लढाई न हारलेले*
*जगातले एकमेव सर्वश्रेष्ठ योध्दे छत्रपती संभाजीराजे* यांचा १४ मे
जन्मदिवस !!

*छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवाच्या* तमाम शिवशंभू प्रेमींना खूप खूप शिवशंभू शुभेच्छा 💐💐💐

नाशिकच्या लोकांनी भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडू नये .🙏farmr.shop आपल्याला हव्या असलेल्या भाजीपाला आणि फ्रेश फळे  पुरव...
21/04/2020

नाशिकच्या लोकांनी भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडू नये .🙏

farmr.shop आपल्याला हव्या असलेल्या भाजीपाला आणि फ्रेश फळे पुरवण्यास उपलब्द आहे .

आम्ही घरपोच देत आहोत.

आमच्या संकेतस्थळावर भेट द्या.

https://farmr.shop/

आम्ही नाशिकचे शेतकरी गट आहोत.

#नाशिक

Address

Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Informer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Informer:

Share