Pradeep Niphadkar BookLover

Pradeep Niphadkar BookLover I know some People can lose their entire lives in Libraries. And there are so many books but so little time in hand.

19/10/2024

ज्येष्ठ पत्रकार, प्रतिथयश लेखिका
अनुराधा औरंगाबादकर यांचे निधन

नाशिक- ज्येष्ठ पत्रकार, प्रतिथयश लेखिका आणि साप्ताहिक गांवकरीच्या सेवानिवृत्त सहसंपादक श्रीमती अनुराधा औरंगाबादकर (86) यांचे 18 ऑक्टोबरला रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कन्या प्रा.आम्रपाली औरंगाबादकर या आहेत.हंस मोहिनी नवल या मासिकाचे संपादक अंतरकर यांच्या कन्या आणि अरुणा अंतरकर यांच्या भगिनी होत.
पुण्याच्या प्रसिद्ध हंस प्रकाशनचे अनंत अंतरकर यांच्या कन्या असलेल्या डॉ.अनुराधाताई औरंगाबादकर यांनी 1970 मध्ये देशदूत पासून पत्रकारिते सुरुवात केली. यानंतर 1971 ते 1998 पर्यंत त्या साप्ताहिक गावकरीशी संलग्न होत्या. साप्ताहिक गांवकरीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी विविध विषयांवर लिखाणासाठी प्रोत्साहित केले होते. एक प्रतिथयश लेखिका म्हणूनही त्या परिचित होत्या.त्यांची 90 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राशी त्या निगडित होत्या. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीवरही त्यांनी काम बघितले. वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत त्या पुणे विद्यापीठात द्वितीय तर तर केंद्रात प्रथम आल्या होत्या. नंतर काही वर्षे त्यांनी हंप्राठा महाविद्यालयात बीसीजेचे समन्वयक म्हणूनही धुरा सांभाळली. पीएचडी साठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

18/10/2024
06/10/2024

दिल्ली येथे भरणाऱ्या श्रीमती तारा भवाळकर यांची निवड सार्थ निवड

https://youtu.be/K1TfBNMCrfc
05/10/2024

https://youtu.be/K1TfBNMCrfc

The Pradeep Niphadkar Showhe Pradeep Niphadkar Show is brought to you by an experienced and renowned Ghazal writer, composer, poet and story writer, Pradeep ...

03/10/2024

नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. २६ -२७ ऑक्टोबरला आनंदवन वरोरा येथे येतोय.... भेटू या विदर्भातील मित्रांनो !

गेले ते दिन गेले .. १९८३ मध्ये गझलेचे सादरीकरण करताना अस्मादिक. तल्लीनतेने ऐकताना (डाव्याबाजूने) राजेंद्र शहा, संगीता जो...
25/09/2024

गेले ते दिन गेले ..
१९८३ मध्ये गझलेचे सादरीकरण करताना अस्मादिक.
तल्लीनतेने ऐकताना (डाव्याबाजूने) राजेंद्र शहा, संगीता जोशी, डॉ.ग़ुलाम दस्तगीर शिहाब , प्रो. डॉ. अमानत, दि ग्रेट हनीफ सागर,नश्तर अकबराबादी , फ़लक रुमान, दि ग्रेट ग्रेट सुरेशचंद्र नाडकर्णी.
आता शहा, संगीताबाई आणि मी जिवंत आहोत. बाकी सगळ्यांनी दयामाया न दाखवता सोडले आम्हाला. तरीही नाडकर्णी सर आणि सर्व शायरांनो तुमची आठवण चिंब करते अजूनही. लव्ह यू ऑल. एकेक माणसाबद्दल लिहिता येईल. बघू लिहू.. कधीतरी. वेळ मिळाला तर ......

17/09/2024

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि अजून एक कृपा करा.

उद्या अमुक इतके मोबाईल चोरीला गेले, अमुक पाण्यात बुडाले, अमुक इतक्या पाकिटाची चोरी झाली, अमुक माणसाचा डीजेमुळे हृदयविकाराने मृत्यू वगैरे बातम्या ऐकायला मिळणार नाही याची तजवीज करा.

माझे 'बस्तिक' हे पुस्तक वाचून अनेक फोन नेहमीच येतात. पण मला कौतुक वाटते ते अश्या लोकांचे. हे पत्र आहे, त्रंबकेश्वरच्या स...
31/08/2024

माझे 'बस्तिक' हे पुस्तक वाचून अनेक फोन नेहमीच येतात. पण मला कौतुक वाटते ते अश्या लोकांचे. हे पत्र आहे, त्रंबकेश्वरच्या संतोष भोई यांचे. पेशाने ते वकील असल्याने माझ्यासारख्या पापभिरू माणसाला वकिलाचे पत्र म्हणजे नोटीसच वाटली पण त्यांनी 'बस्तिक' वाचून पत्र लिहिले. ते तुम्ही वाचालच. त्यांचा सल्लाही वाचाल. पण कौतुक हे की आजही या जमान्यात लोकं आपल्या आवडत्या लेखकाला पत्र लिहितात. त्यासाठी वेळ काढतात, पाकिटात छान पैकी घडी घालून ते प्रेमाने ठेवतात, पोस्टाचे तिकीट (भले ते ५ रुपये असेल पण ) लावतात, पोस्टात जाऊन पोस्ट करतात. या सर्वांसाठी किती ते अमूल्य वेळ देतात. नुकतेच मी कर्जतचे दिलीप गडकरी यांनी केलेले माझ्या 'सुरेश भट आणि...' या पुस्तकाचे परीक्षण टाकले होते ते तुम्हाला आठवत असेलच. आता हे पत्र !

बा.सी. मर्ढेकर लयसिद्धांत मांडताना म्हणाले होते ,'' आधुनिक काळात मराठीत सांस्कृतिक महत्त्व काडी इतके नाही'' पण ते खोटे ठरते याची साक्ष वेळोवेळी येते. आमच्या महाराष्ट्रात सर्वत्र अंधाराच्या बातम्या येत असतीलही पण ''आमची रसिकतेची मिणमिणती पणती तेवत आहे. ती विझणार नाहीच. उलट हळूहळू तिची ज्योत अधिक प्रज्वलित होईल. तुम्ही फक्त लिहा '' असेच या घटना सांगतात. लिहिण्याला बळ येते. धन्यवाद गडकरी (कर्जतचे हं ) आणि वकीलसाहेब भोई. लवकरच उत्तर देतो.

बाळंतपण : नेमके कुणाचे ?मला एक धक्का बसला आहे पण तो सांगण्याआधी काही गोष्टीही सांगायला हव्यात. म्हणजे आमचे माजलगावचे कवी...
24/08/2024

बाळंतपण : नेमके कुणाचे ?

मला एक धक्का बसला आहे पण तो सांगण्याआधी काही गोष्टीही सांगायला हव्यात. म्हणजे आमचे माजलगावचे कवीमित्र प्रभाकर साळेगावकर आणि सौ. वहिनी आज सकाळी नाष्ट्याला आले होते. नेहमीप्रमाणे गप्पा, खाणे, कविता वगैरे झाले, तो भाग काही लिहिण्याचा नाही. म्हणजे त्यात काय लिहायचे ? ते होतेच. पण त्या गप्पांदरम्यान एक विषय साळेगावकर यांच्या सुनेच्या बाळंतपणाचा होता. ते आनंदी होते की सुनेचे बाळंतपण नॉर्मल झाले, नात झाली वगैरे.पण त्यांनी त्या बाळंतपणाची हकीकत सांगितली ती ऐकण्यासारखी आहे.
साळेगावकर माजलगावचे आणि मुलगा राहतो पुण्यात. सुनेचे बाळंतपण म्हटल्यावर ते चार दिवस आधी पुण्यात आले. माजलगावी सर्वांना हे गोड कारणही सांगून आले. इकडे आले, सून दवाखान्यात दाखल झाली. दोन दिवस झाले तरी बाळंत होईना. तिकडून आणि इकडून (माझ्यासारख्या मित्रांचे त्यांना फोन होत होते , अहो, झाले का आजोबा ? त्यामुळे साळेगावकर नाही म्हटले तरी वैतागलेच. साहजिक आहे. माझ्यासारख्या मित्रांना ते हकीकत सांगत होते. दोन दिवस झाले, अजून बाळंत होत नाही . डॉक्टरांना सांगतो, सीझर करा. पण नाही. माझ्यासारख्या मित्रांनी धीर दिला, ''डॉक्टर म्हणतील तेव्हा होऊ द्या. होईल सारे सुरळीत. काळजी करू नका.'' आणि अखेर ११ ऑगस्टला सकाळी १०. २० वाजता 'धनश्री-नचिकेतला कन्यारत्न झाले,' असा त्यांचा आनंदाचा संदेश आला आणि सर्वांनी आजोबा-आजीचेही अभिनंदन केले.

मग ह्यात काय लिहिण्यासारखे ? तर ती हकीगत आता -

तर त्यांनी सांगितले की बालेवाडी फाट्याला 'उमरजी मदर अँड चाईल्ड केअर' ह्या हॉस्पिटलमध्ये धनश्री होती. तिला होणारा त्रास पाहून साळेगावकर घराचा सीझर करण्याचा आग्रह होता. पण त्या डॉक्टर मॅडम बाळंतपण नॉर्मलच करायचे ह्या मताच्या होत्या. ह्यांचे कुणाचेही न ऐकता त्यांनी नॉर्मलच बाळंतपण केले. मी अवाक झालो. कारण माझे ऐकलेले अनेक अनुभव सांगतात की नॉर्मल होणार असेल तर डॉक्टर सिझेरिनच करतात. त्यातही पुण्यात तर नक्कीच. अशावेळी असेही डॉक्टर आहेत ? प्रभाकर म्हणाले,'' अहो, ते हॉस्पिटल त्यासाठीच प्रसिद्ध आहे.''
मग त्यांनी त्या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये सांगितली. तिथे मुलगी झाली की सगळे वातावरण गुलाबी रंगात (नव्या युवक-युवतींसाठी मराठीत-पिंक) न्हाऊन निघते. मुलगा झाला तर निळ्या. ते बाळ जेव्हा घरी जाते तेव्हा सिस्टर (नर्स नाही. लाडकी बहीणच) गुलाबाच्या पाकळ्या अंथरतात. केक कापला जातो. एक गिफ्ट बाळाला दिली जाते. तुमची गाडी छान सजविली जाते आणि मग खुशीखुशीत निरोप दिला जातो. हे बाळही आजोळी चिमकोडकरांकडे आले. १२ व्या दिवशी थाटात बारसे झाले. बाळाचे नाव विस्मया ठेवण्यात आले.

ऐकून डोळे भरून आले. आज इतके डॉक्टरांबद्दल वाईट वाईट सांगितले जाते, ऐकतो आपण, टीव्ही वर पाहतो, तिथे एक डॉक्टर, तेही पुण्यातले, नव्या शिशुचे असे स्वागत करतात ? सीझर केले की चांगले पैसे असताना आणि रुग्ण, रुग्णाच्या घरचे आग्रह करत असताना ? विस्मयकारकच सारे. (म्हणून तर 'विस्मया' नाव ठेवले नाही ना साळेगावकरांनी?)
एकदा या हॉस्पिटलला भेट देऊ म्हटले. कारण बाळंतपण एका बाईचे नसते. ते त्या डॉक्टरचेही असते, त्या बाईच्या घरच्यांचेही असते आणि त्या घरच्यांच्या मित्रांचेही असते. ते एकटे नसते. सगळे काळजीत असतात. तेव्हा असेच सर्व डॉक्टरांनी नव्या शिशुची, त्याच्या आईची काळजी घ्यावी, इतकेच !

प्रदीप निफाडकर
९९२२१२७४९२

Address

Sinhgad Road
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Niphadkar BookLover posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pradeep Niphadkar BookLover:

Shortcuts

Share

Category