वाचन चळवळ

वाचन चळवळ वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याच्या हेतूने

📕 हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही… स्वतःला एक प्रश्न विचारण्यासाठी आहे!कधी विचार केला आहे का…?एखादा माणूस सत्तेवर येतो आ...
09/09/2026

📕 हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही… स्वतःला एक प्रश्न विचारण्यासाठी आहे!

कधी विचार केला आहे का…?

एखादा माणूस सत्तेवर येतो आणि हळूहळू संपूर्ण देशाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरच ताबा मिळवतो, तेव्हा नेमके काय घडते?

लोक त्याच्यावर एवढा विश्वास का ठेवतात?
त्याच्या चुका दिसेनाशा का होतात?
त्याच्या विरोधात बोलण्याची भीती का निर्माण होते?

आणि सर्वांत भयंकर प्रश्न…

हुकूमशाही निर्माण करणारा फक्त एक हुकूमशहा असतो, की त्याला निर्माण करणारी परिस्थिती आपणच तयार करत असतो?

याच प्रश्नांचा शोध घेणारे अत्यंत विचारप्रवर्तक पुस्तक म्हणजे ‘विसाव्या शतकातील हुकूमशाह’.

लेखक : अशोक कुमार पांडेय
अनुवाद : मीना शेटे - शंभु

हिटलर…
स्टॅलिन…
मुसोलिनी…
किम इल सुंग…
ऑगस्टो पिनोशे…
ईदी अमीन…

ही केवळ इतिहासातील काही नावे नाहीत.

या प्रत्येक नावामागे लाखो माणसांचे आयुष्य, स्वप्ने, भीती, रक्त आणि अश्रू दडलेले आहेत.

या हुकूमशहांचा उदय कसा झाला?
जनतेने त्यांना स्वीकारलेच का?
सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी समाजाला कसे बदलले?
त्यांचा अंत कसा झाला?

आणि सर्वांत महत्त्वाचे…

या सगळ्यातून आज आपण काय शिकायचे?

हे पुस्तक वाचताना तुम्ही केवळ इतिहास वाचत नाही.

तुम्ही माणूस, समाज, सत्ता आणि लोकशाही यांच्यातील नातं समजून घेता.

कदाचित पुस्तक संपल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न नक्की राहील—

“इतिहास पुन्हा घडला तर… आपण कोणत्या बाजूला उभे राहू?”

म्हणूनच हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने, विद्यार्थ्याने, पालकाने, सामाजिक कार्यकर्त्याने आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने वाचावे, असे मला मनापासून वाटते.

📌 हे पुस्तक आपल्या घरच्या पुस्तक कपाटात असायलाच हवे.

कारण इतिहास विसरण्याची किंमत कधी कधी वर्तमानाला मोजावी लागते.

━━━━━━━━━━━━━━

📕 विसाव्या शतकातील हुकूमशाह
✍️ अशोक कुमार पांडेय
📖 अनुवाद : मीना शेटे - शंभु

💰 मूळ किंमत : ₹400/-
🔥 सवलतीच्या दरात घरपोच : फक्त ₹340/-

📲 पुस्तकाची ऑर्डर देण्यासाठी :

💳 Google Pay / PhonePe : 7028619581

📱 WhatsApp संपर्क : 096373 51400

💰 पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट वरील WhatsApp क्रमांकावर पाठवा.

सोबत आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवा.

📚 इतिहास जाणून घ्या…
सत्तेला प्रश्न विचारायला शिका…
आणि लोकशाहीची किंमत ओळखा!

🔥 पुस्तक हवे असल्यास आत्ताच WhatsApp करा!

@

📚 बोद  'बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही ...
08/05/2026

📚 बोद

'बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सारं जग आहे ही भावना मनात निर्माण करणारा तो कोंडाळा आम्ही जेव्हढे कष्ट करू तितका मोबदला आम्हाला द्यायचा.' पुस्तकाच्या ब्लर्ब वरील ही वाक्ये वाचत असताना कोणताही संवेदनशील वाचक सुन्न होतो. 'बोद' म्हणजे भंगार वेचण्यासाठी कचरा वेचकांच्या पाठंगुळीला मारलं जातं ते पोतं. पाठीवर त्या पोत्याचं ओझं घेऊन शहरातील जागोजागीच्या कचरापेट्यांच्या अवतीभवती वावरणारी मूलं दिसणं ही इतर समाजासाठी सर्वसामान्य गोष्ट असते आणि तितकीच दुर्लक्षित सुद्धा. कधी त्याकडे आत्यंतिक तिरस्काराने, हेटाळणीने पाहिलं जातं तर कधी तुच्छतेने. पण त्या मुलांकडे 'माणूस' म्हणून पाहण्याची दृष्टी असणारे मात्र विरळाच. या पुस्तकात आपण वाचतो 'प्रशांत आंबी' या कचरावेचक मुलाच्या बालपणापासून तरुणाईच्या उंबरठयापर्यंतचा प्रवास. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीय. त्याच्यासारख्या अनेक वंचितांचा, त्याच्यासोबतच्या पीडित समाजाचा आणि आजही कचरा वेचून जीवन जगणं भाग असणाऱ्या अनेक कुटुंबांचा आहे जो प्रस्थापित समाजाला कधीही दखलपात्र वाटला नाही.

बाप नावाच्या व्यक्तीचं पुसटसं अस्तित्व आयुष्याला लाभलेल्या लेखकाच्या जगण्यावर आई नावाच्या योद्ध्याची कणखर, डेरेदार सावली होती. 'इस दुनिया में सबसे बडी योद्धा माँ होती है!' हा डायलॉग आपल्या आईच्या बाबतीत तंतोतंत खरा असल्याचं लेखक सुरुवातीलाच नमूद करतो आणि पुस्तक वाचत पुढे जात असताना त्यातली सत्यता आपल्यालाही पटत जाते. धुण्या-भांड्यांची कामं करत कोल्हापूर मधील 'राजेंद्रनगर' झोपडपट्टीत आपल्या लेकरांना घेऊन स्वाभिमानाने राहणारी 'आक्का' आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पराकोटीची आग्रही होती. घरच्या परिस्थितीमुळे भंगार वेचायला जाणाऱ्या छोट्या बहीणीसोबत हळूहळू लेखक स्वतः सुद्धा त्या कामात सहभागी झाला. पाठीला 'बोद' लटकवून कचऱ्यातील श्रीमंती शोधणाऱ्या या लेकरांचा जगण्याचा हा संघर्ष वाचकाला हेलावून सोडतो.

जिथे सर्वसामान्य माणूस उभा सुद्धा राहू शकत नाही अशा घाणीमधून भंगार वेचताना पांढरपेशा माणसांच्या हेटाळणीयुक्त नजरा झेलाव्या लागायच्याच पण सारं जग निवांत साखरझोपेच्या अधीन असताना पहाटेच्या निर्मनुष्य अंधारात कचऱ्यासाठी वणवण फिरणं, अनवाणी कोवळ्या पायात काटा, तारा, दगड घुसणं, कुत्र्यांशी - सापांशी होणारा जीवघेणा सामना, अनेकदा केले जाणारे चोरीचे आरोप आणि मारहाण, पावसात चिखलातून पाय घट्ट रोवत तर कधी अगदी हागणदारी सुद्धा पायाखाली तुडवत त्या चिमूकल्या पायांनी पोटासाठी संघर्षाच्या नवीन वाटा शोधणं, त्या अभावग्रस्त परिस्थितीत सुद्धा भावंडांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम करणं, एकमेकांना आधार देणं, आईच्या अपार कष्टांची जाणीव ठेवणं आणि तरीही शिक्षणाचा ध्यास न सोडणं हे त्यांच्या जगण्याचं वास्तव आपल्याला थक्क करतं. सरळ साध्या शब्दांत लिहिलेलं हे आत्मकथन खूपच प्रांजळ, प्रामाणिक आणि निखळ आहे. सहज अनुभव वर्णनातून समाजाच्या दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या, समाजाने अव्हरलेल्या चतुर्थ दुनियेतील जगणं जगलेल्या लेखकाने कुणाही विषयी जाणूनबुजून कोणतीही कटुता न दर्शविता हे लेखन केले आहे.

'जगाला जे जे नकोसं, ते ते सगळं कोंडाळ्याला चालायचं त्यावरच अनेकांचं पोट भरायचं. घंटागाड्यांमुळे कोंडाळा ही संकल्पना नष्ट होण्याच्या आनंदाची दुसरी दुखरी बाजू म्हणजे त्यामुळे कचरावेचकांच्या पोटापाण्याचं साधन संपेल', हे वास्तव मांडणारं हे पुस्तक वाचताना कोणताही संवेदनशील वाचक अंतर्मुख होऊन जातो. ज्यांच्याकडे अगदी सहजपणे कानाडोळा करून आपण पुढे निघून जातो त्या कचरा वेचक लेकरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचायला हवं.

सरिता सदाशिव पवार

💰 पुस्तकाची मूळ किंमत : ₹250
🎉 सवलतीच्या दरात घरपोच : ₹220
📦 पोस्ट खर्च काही नाही.

📲 Google Pay / PhonePe : 7028619581
📞 WhatsApp संपर्क : 096373 51400

`📚 जागतिक पुस्तक दिन विशेष ऑफर 📚`इतिहास फक्त पाठांतराचा विषय नाही…तो समजून घेण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि नव्या नजरेतू...
24/04/2026

`📚 जागतिक पुस्तक दिन विशेष ऑफर 📚`

इतिहास फक्त पाठांतराचा विषय नाही…
तो समजून घेण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि नव्या नजरेतून पाहण्याचा प्रवास आहे!

धुळाक्षरे इतिहासाची ही मालिका म्हणजे इतिहास समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि critical thinking विकसित करण्याची एक वेगळीच संधी आहे. साधी, प्रवाही भाषा आणि खोल आशय ही या पुस्तकांची खासियत आहे.

✨ प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने आणि जागरूक नागरिकाने वाचायलाच हवी अशी मालिका!
---
`📖 धुळाक्षरे इतिहासाची 1 : देशाची फाळणी`

या पुस्तकात भारत-पाकिस्तान फाळणीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा सखोल वेध घेतला आहे.
देशाची फाळणी म्हणजे नेमकं काय, ती कशी आणि का झाली, यामागील राजकीय घडामोडी काय होत्या, याचे विश्लेषण यात आढळते.

हिंदू-मुस्लिम तणावाची पार्श्वभूमी, फाळणीस कारणीभूत ठरलेले घटक आणि त्या काळातील राजकारण याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फाळणीचा सामान्य लोकांच्या आयुष्यावर झालेला परिणाम, कुटुंबांचे तुटणे, स्थलांतर, हिंसा आणि मानसिक वेदना , जयराज, बीथीताई आणि करीम नासिर यांसारख्या व्यक्तींच्या कथांमधून प्रभावीपणे मांडला आहे.
---
`📖 धुळाक्षरे इतिहासाची 2 : देशाचे लोक`

हे पुस्तक स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील नागरिकत्व, स्थलांतर आणि ओळख या प्रश्नांवर प्रकाश टाकते.
भारत स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय बदल झाले? प्रजासत्ताक देश होण्याचा अर्थ काय?
स्वतःच्या देशातच नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ लोकांवर का आली?
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतःचे गाव-घर असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्यानंतर स्थलांतर का करावे लागले, याचा विचार यात मांडला आहे.
तसेच नागरिकत्वाचे कायदे वेळोवेळी का बदलले, नवीन कायद्यांमुळे काही लोकांना “घुसखोर” ठरवले जाण्याची प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी यांचे वास्तववादी चित्रण या पुस्तकात आहे.
---
`📖 धुळाक्षरे इतिहासाची 3 : देशाच्या भाषा`

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा हा विषय कसा संवेदनशील बनतो, याचा शोध या पुस्तकात घेतला आहे.
धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली, पण पुढे राज्यांची निर्मिती करताना भाषा हा मुद्दा कसा पुढे आला?
एकाच भाषेच्या आधारावरही वेगवेगळे देश किंवा राज्ये कशी निर्माण झाली, याची उदाहरणे यात दिली आहेत.
भाषेमुळे एकत्र येणं आणि त्याच भाषेमुळे विभाजन होणं, ही विरोधाभासी प्रक्रिया भारतात का घडते, यावर सखोल चर्चा आहे.
तसेच, “देश सर्वांचा असूनही काही जण वंचित का राहतात?” या प्रश्नाकडेही हे पुस्तक लक्ष वेधते.
---
🌟 ही तिन्ही पुस्तकं मिळून इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात!
🌟 पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचा, सर्वसामान्य लोकांचा इतिहास समजावून सांगतात!
---
💰 ३ पुस्तकांचा सेट – फक्त ₹375 (घरपोच – जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिपिंग फ्री)
`मूळ किंमत 390 रू.`

📦 आजच आपला सेट मागवा!
📱 WhatsApp: 9637351400
💰 PhonePe / GPay / UPI: 7028619581

📌 सूचना: पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट WhatsApp वर पाठवावा.

🌱 गावागावात, विद्यार्थ्यांपर्यंत आणि वाचनप्रेमींपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न!
fans

📚 अपघातातून लागलेले महान शोध — प्रेरणादायी पुस्तक!_📖 विज्ञानातील आकस्मिक शोधांच्या 50 सत्यकथा — अपघात ते आविष्कार_✍ लेखक...
23/02/2026

📚 अपघातातून लागलेले महान शोध — प्रेरणादायी पुस्तक!

_📖 विज्ञानातील आकस्मिक शोधांच्या 50 सत्यकथा — अपघात ते आविष्कार_
✍ लेखक : डॉ. अभिजीत पत्की

अपघातातून आविष्कार शोधणारी नजर अपघातानेच दिसते, म्हणूनच त्यांना संशोधक म्हणतात. आणि या संशोधकांचे संशोधन करून त्याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली मांडणी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी आहे, यात शंकाच नाही. यातून अनेकांना संशोधक दृष्टी मिळेल या विश्वासासह शुभेच्छा.

या पुस्तकामध्ये अशा ५० शोधांचा समावेश आहे जे शोध अपघाताने लागले आहेत. शास्त्रज्ञ दुसऱ्याच कुठल्यातरी वस्तूच्या किंवा रसायनाच्या शोधात असताना काहीतरी वेगळे घडले आणि हे शोध लागले. सुरुवातीला कदाचित प्रयोग फसल्यासारखे वाटले असले, तरीही नंतर याच शोधांनी मोठी क्रांती केली आणि जगाला मोठी दिशा दिली.

कोणत्याही फसलेल्या प्रयोगामधून नवीन क्रांती घडण्यामागील मुख्य कारण होते त्या शास्त्रज्ञांची चिकाटी, सातत्य, चिकित्सक वृत्ती आणि समर्पण.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लेखनशैली अतिशय सहज सोपी आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने हे शोध मांडले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या शास्त्रज्ञाला नक्कीच एक नवीन दृष्टी मिळेल आणि कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी रोज घडणाऱ्या गोष्टींमधून जगाला नवीन दिशा देणारा एखादा शोध लावू शकेल.

🔬 काही आविष्कार
• पेनिसिलीन
• कॉर्नफ्लेक्स
• आईसक्रीम कोन
• काडेपेटीच्या काड्या
• भूलशास्त्र
• मायक्रोवेव्ह ओव्हन
• कोका कोला
• सुरक्षा काच
• विद्युत चुंबक
• स्टेनलेस स्टील
• झेरॉक्स मशीन
• सुपर ग्लू

📄 पाने : 352
💰 पुस्तकाची मूळ किंमत : 299
🏠 घरपोच : फक्त 300 रू

💳 Google Pay / PhonePe : 7028619581
📲 WhatsApp संपर्क : 096373 51400

विठोबा मिसिंग इन पंढरपूर प्रकाशन सोहळाह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर विनायक होगाडे हे फार ताकदीचे प्रतिभाशाली लेखक आहेत. त्यांच...
16/12/2025

विठोबा मिसिंग इन पंढरपूर प्रकाशन सोहळा

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर

विनायक होगाडे हे फार ताकदीचे प्रतिभाशाली लेखक आहेत. त्यांच्या विठोबा मिसिंग इन पंढरपूर या कादंबरीचा प्रकाशन सोहळा १४ डिसेंबरला पत्रकार भवनला पार पडला. प्रख्यात लेखक प्रवीण बांदेकर, प्राजक्ता हनमघर, शरद अष्टेकर आणि विनायक होगाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी वारकरी कीर्तनकार म्हणून मी ही प्रमुख वक्ता होतो. त्यावेळी मी विनायकच्या नव्या कादंबरीची मला भावलेली वैशिष्ट्ये मांडली. मी प्रामुख्याने कादंबरीत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आलेल्या सामाजिक मूल्यांविषयी बोललो आहे.

१.ही कादंबरी ऐतिहासिक विषयावर आहे. ऐतिहासिक विषयावर आधारलेल्या कादंबऱ्या सहसा ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करतात. ही कादंबरी त्याला अपवाद आहे. ही कादंबरी वारकरी संप्रदायाचा ७०० वर्षांचा इतिहास मांडते. तो इतिहास मांडताना त्यात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केलेली नाही.

२.आपल्याकडे इतिहास लेखन करताना त्यात केवळ सनसनावळ्या आणि संदर्भांची जंत्री देऊन ते बोजड, क्लिष्ट, निरस आणि कोरडेपणाने लिहिण्याची परंपरा आहे. विनायकने मात्र वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिताना तो कादंबरीचा फाॅर्म वापरुन प्रतिभाशाली शैलीत लिहिल्यानं वाचनीय झाला आहे.

३.नामदेवरायांनी १०० कोटी अभंगातून विठोबाचं चरित्र लिहिण्याचा संकल्प केला होता. तेव्हापासून विठोबाचं चरित्र लिहिलं जातंय. नामदेवरायांपासून ते तुकोबारायापर्यंतच्या संतपरंपरेचा वारसा लक्षात घेऊन विनायकने ही कादंबरी लिहिलीय. यातल्या विठोबाच्या चरित्रातून ७०० वर्षांचा वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडला गेला आहे. चोखोबाराय आणि त्यांचं कुटुंबिय - नामदेवराय - ज्ञानोबाराय - जनाबाई - कान्होपात्रा - एकनाथराय - तुकोबाराय या संतांपासून ते थेट गाडगेबाबा - साने गुरुजीपर्यंत वारकरी संप्रदायाचे संदर्भ यात आलेले आहेत. त्याचबरोबर गणपती महाराज अजात आणि निळू फुले अशा अनेकांचे संदर्भ खुबीने पेरलेले आहेत.

४. कादंबरी संदर्भसमृद्ध असली तरी त्यातलं कथासूत्र हरवलेलं नाही. संपूर्ण कादंबरी एका कथासूत्रासोबत प्रवाहित झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाचा इतिहास इथे एक गोष्ट म्हणून वाचता येतो.

५.कादंबरी ऐतिहासिक विषयावर असली तरी तिला आजच्या समकालाची संदर्भचौकट आहे. आजच्या समकालातल्या संकुचित धर्मवादी राजकारणावर ती बोट ठेवते. त्याचबरोबर धार्मिक दांभिकतेचा बुरखा फाडते. आजचे लेखक, चित्रकार आणि सामाजिक चळवळी यांचे संदर्भ नीटपणे यात आलेले आहेत.

६.ही कादंबरी फक्त मनोरंजन करत नाही. ती प्रबोधनाची भूमिका घेते. जातीय आणि लैंगिक भेदभावाच्या विरुद्ध एक संतुलित आक्रोश संपूर्ण कादंबरीत आहे. त्याचबरोबर या कादंबरीत अंधश्रद्धा, दांभिकता आणि कर्मकांड यांची संतविचारांच्या प्रकाशात चिकीत्सा केलेली आहे.

७.वारकरी संप्रदायाविषयी मी बऱ्यापैकी भरपूर वाचलं आहे. त्यातलं सर्वाधिक सकस असं काही असेल तर ती विनायकची कादंबरी आहे.

८.कादंबरीचं निर्मितीमूल्य आणि त्यातली चित्रंही फार सुंदर आहेत.

पुस्तकासाठी संपर्क 096373 51400

📘✨ कर्जमुक्त व्हा! – अभिजीत कोळपकर ✨📘हे पुस्तक तुमच्यासाठी आहे!कर्ज : संधी की संकट?तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात ...
01/11/2025

📘✨ कर्जमुक्त व्हा! – अभिजीत कोळपकर ✨📘

हे पुस्तक तुमच्यासाठी आहे!
कर्ज : संधी की संकट?
तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात का?
कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे?
जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!

या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत.
कर्ज स्वतः वाईट नसते , त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे!

आजच ‘कर्जमुक्त व्हा!’ वाचा आणि कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊन तुमच्या आर्थिक भविष्याला नवा आकार द्या.
संपत्ती निर्माण करा, आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका!
समाधानाने भरलेले चिंतामुक्त जीवन जगा! 🌿

✍️ लिखाणाची अनेक आवर्तनं, एडिटिंगची तितकीच आवर्तनं,
पुस्तक अद्ययावत असण्यावर असलेला कटाक्ष आणि कर्जफेडीची क्लिष्ट गणितं प्रत्येकाला समजायला हवीत आणि प्रत्येकानं कर्जाचा सुयोग्य वापर करून आपली प्रगती साधायला हवी या कळकळीनं लिहिलेलं हे पुस्तक आहे.
फायनान्ससारख्या क्लिष्ट विषयावरचं पुस्तक उद्बोधक असूनही इतकं देखणं, आकर्षक आणि मनोरंजक कसं होऊ शकतं हे या पुस्तकाच्या मांडणीतून कळतं.
---
💰 पुस्तकाची मूळ किंमत: ₹400
🎁 सवलतीच्या दरात घरपोच फक्त: ₹350
📄 पाने: 435
📱 Google Pay / PhonePe: 7028619581
📞 WhatsApp संपर्क: 9637351400

📸 पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट वरील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा.
---
✨ आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाका – आजच "कर्जमुक्त व्हा!" ऑर्डर करा! ✨

🌺📚 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाणून घेण्यासाठी 18 पुस्तकांचा संच अवश्य वाचा. 📚🌺✨ विचारांचे शस्त्र — परिवर्तनाचा मार्ग ✨📘 1️⃣ ...
27/10/2025

🌺📚 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाणून घेण्यासाठी 18 पुस्तकांचा संच अवश्य वाचा. 📚🌺
✨ विचारांचे शस्त्र — परिवर्तनाचा मार्ग ✨

📘 1️⃣ बुद्ध की कार्ल मार्क्स
✍️ लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 किंमत – ₹50 | 📄 पाने – 32

📗 2️⃣ हिंदू स्त्रियांची उन्नती
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 ₹35 | 📄 पाने – 24

📗 3️⃣ मुंबई ही महाराष्ट्राचीच
✍️ डॉ. बी. आर. आंबेडकर
💰 ₹60 | 📄 पाने – 51

📘 4️⃣ हिंदुत्व आहे तरी काय ?
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 ₹50 | 📄 पाने – 32

📗 5️⃣ मुक्ती कोण पथे ?
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 ₹50 | 📄 पाने – 32

📘 6️⃣ प्रतिक्रांतीच्या समर्थनार्थ तत्वज्ञान
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 ₹25 | 📄 पाने – 28

📗 7️⃣ ब्राह्मणी साहित्य
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💰 ₹40 | 📄 पाने – 35

📘 8️⃣ मुलांचे डॉ. आंबेडकर
✍️ चिंतामण मोरे
💰 ₹70 | 📄 पाने – 48

📘 9️⃣ धर्मांतराची भीमगर्जना
✍️ अरुण कांबळे
💰 ₹90 | 📄 पाने – 124

📗 🔟 डॉ. आंबेडकर संविधानिक विचार आणि धर्मचिंतन
✍️ डॉ. जनार्दन वाघमारे
💰 ₹40 | 📄 पाने – 47

📘 11️⃣ डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म...
✍️ उदय मेहता
💰 ₹60 | 📄 पाने – 48

📘 12️⃣ गांधी आणि आंबेडकर : दोन नेतृत्वांचा अभ्यास
✍️ डॉ. एलिनॉर झेलियट
💰 ₹60 | 📄 पाने – 36

📗 13️⃣ चार्वाक, बुद्ध आणि आंबेडकर
✍️ डी. वाय. हाडेकर
💰 ₹90 | 📄 पाने – 109

📗 14️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य
💰 ₹40 | 📄 पाने – 36

📘 15️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दात
✍️ ग. प. प्रधान
💰 ₹90 | 📄 पाने – 64

📗 16️⃣ आंबेडकर : तत्व आणि व्यवहार
✍️ डॉ. रावसाहेब कसबे
💰 ₹80 | 📄 पाने – 76

📗 17️⃣ भारतातील आर्थिक सुधारणा...
✍️ डॉ. भालचंद्र मुनगेकर
💰 ₹50 | 📄 पाने – 56

📘 18️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातीयंताचा लढा
✍️ डॉ. जनार्दन वाघमारे
💰 ₹35 | 📄 पाने – 40

एकूण 18 पुस्तकांची मूळ किंमत 1015
पोस्ट खर्च 96 रू
एकूण 1111

सवलतीच्या दरात घरपोच फक्त 888 रू

Google pay phone pay 7028619581
Whats app संपर्क 9637351400

पैसे पाठवल्यानंतर त्याचा अजून शॉट वरील क्रमांकाच्या व्हाट्सअप ला पाठवावा. आणि आपले पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता देखील पाठवा.

भंगार...💔🌼एखादं पुस्तक असतं, जे वाचताना ते आपल्याला आपल्या जागेवर बसूनच हेलावून टाकतं. भंगार असंच एक पुस्तक आहे.मागे दलि...
15/09/2025

भंगार...💔🌼

एखादं पुस्तक असतं, जे वाचताना ते आपल्याला आपल्या जागेवर बसूनच हेलावून टाकतं. भंगार असंच एक पुस्तक आहे.मागे दलित साहित्यातील सर्वच आत्मचरित्र वाचल्यानंतर मी जेव्हा हे पुस्तक उघडलं नि वाचत गेलो नि हे वाचल्यानंतर लक्षात आलं की ही फक्त अशोक जाधव यांची गोष्ट नाही... ही त्या संपूर्ण गोसावी समाजाची वेदना, जगणं नि त्यातून वर यायचा संघर्ष आहे.

अशोक जाधव नावाचा एक लहान मुलगा, उकिरड्यावर, कचऱ्यातून भंगार गोळा करत मोठा होतो. भीक मागणं, अपमान सहन करणं, भुकेलेपणावर झोपणं नि आईला रोज दारु पिऊन येणाऱ्या बापाकडून शिव्या-मार खाणं हे त्याचं बालपण असतं. त्या समाजात शिक्षण म्हणजे “बिगडणं” असं समजलं जातं. पण अशोकला शाळा बघून शिकायचं वेडच चढतं. अन् तिथून सुरू होतो त्याचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे.

तो शाळेत जातो, चोरी करून का होईना पण पुस्तक मिळवतो नि बी.ए., बी.एड्. होतो. शिक्षक होतो. शिक्षक म्हणून काम करताना तो समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवतो, बोलतो, प्रश्न विचारतो. हेच त्याचं वेगळेपण ठरतं.त्याच्या समाजात जातपंचायत म्हणजे सर्वोच्च सत्ता. पण तिथे न्याय नाही, केवळ दहशत असते. महिलांना काहीच किंमत नसते. त्यांचं लग्न, त्यांची प्रतिष्ठा, आयुष्य सगळं पंचायतीच्या मर्जीवर असतं. अशोक याच पंचायतीच्या विरोधात उभा राहतो. आपल्या बहिणीला शिकवतो, डॉक्टर बनवतो. त्याच्या घरच्यांनी जे स्वप्नही पाहिलं नव्हतं, ते तो प्रत्यक्षात आणतो.

भंगार हे पुस्तक म्हणजे भंगारात सोनं शोधण्याचा जिद्दीचं उदाहरण आहे. ते केवळ शिक्षण मिळवून थांबत नाही, तर समाजाला संघटित करतो, राजकारणात भाग घेतो, संस्थांमधून काम करतो. भंगाराच्या पोत्याऐवजी टेम्पो येतो नि त्याचा समाज हळूहळू ‘दिसू’ लागतो. या पुस्तकात अशा कितीतरी गोष्टी आहेत . आईचं थकलेलं जगणं, जातीनं पायावर घातलेली बेडी, समाजाच्या नावानं गिळवलेलं स्वप्न नि तरीही त्या सगळ्यावर मात करत माणूस म्हणून उभं राहिलेला अशोक.

जेव्हा मी हे पुस्तक वाचलं तेव्हा सुन्न झालो होतो.तेव्हा थोडा वेळ काहीच सुचतं नव्हतं. मनात विचारांचे वादळ सुरू झालं होतं. आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो शिक्षण, स्वच्छ कपडे, दोन वेळचं अन्न त्यासाठी कुणाला किती लढावं लागतं हे लक्षात आलं.

हे पुस्तक फक्त एका गोसावी समाजाची गोष्ट नाही, ही एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की या देशात अजून किती समाज, किती लेकरं, किती माणसं अशाच परिस्थितीत जगत आहेत नि त्यांच्यासाठी किती काम होणं गरजेचं आहे.हे पुस्तक वाचताना इतकं राग, दुःख, अभिमान सगळं एकत्र वाटतं. हे पुस्तक असं काहीतरी आहे, जे शेवटपर्यंत आपल्याला हलवतं आतून, खोलवर. मी अनेक आत्मचरित्रं वाचली, पण "भंगार" काहीतरी वेगळं आहे. कारण यात शब्दांपेक्षा भावना जास्त बोलतात. समाजाने फेकलेली माणसं, त्यांचं जगणं, त्यांची स्वप्नं.. हे सगळं यात आहे.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. जे आपल्याला आठवतं करून देईल की शिकणं, माणूस होणं, दुसऱ्यासाठी उभं राहणं हीच खरी क्रांती आहे नि आपल्याला करायची आहे.❤️

हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता.
https://wa.me/9637351400
या व्हाट्सअप्प नंबर वर पुस्तकाचं नाव नि आपला पत्ता पाठवा...🌼❤️

🌿✨ योग दिन ऑफर: शरीर आणि मनासाठी दोन अमूल्य पुस्तके! 🧘‍♀️📚फक्त योग दिनाच्या निमित्ताने – १५% खास सवलत!दोन्ही पुस्तके एकू...
22/06/2025

🌿✨ योग दिन ऑफर: शरीर आणि मनासाठी दोन अमूल्य पुस्तके! 🧘‍♀️📚
फक्त योग दिनाच्या निमित्ताने – १५% खास सवलत!
दोन्ही पुस्तके एकूण किंमत ₹550
घरपोच फक्त ₹470 (पोस्ट खर्च काही नाही)
⏳ मर्यादित काळासाठी ऑफर
---
🔹 1️⃣ हे पुस्तक तुमचं जीवन वाचवू शकतं!
✍️ लेखक: डॉ. करण राजन
🔁 मराठी अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
📄 पृष्ठे: 294
💰 मूळ किंमत: ₹300
डॉ. करण राजन यांनी रुग्णालयात अनेक वर्षे काम करून कष्टाने शिकलेले मौल्यवान धडे आणि आरोग्यविषयक युक्त्यांनी हे पुस्तक भरलेले आहे. यामध्ये मानवाच्या अद्भुत शरीराचा गुणगौरव आहे. हे पुस्तक तुम्हाला तणाव कमी करण्यास तसेच निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करेल. या पुस्तकात, डॉ. करण राजन आपल्या शरीराच्या कार्य करण्याच्या विचित्र आणि अद्भुत पद्धती स्पष्ट करतात आणि समस्यांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक युक्त्या सांगतात. त्यांनी समाविष्ट केलेल्या काही गोष्टींमध्ये नाकाचे केस उपटण्याचे धोके, ताण कमी करण्यासाठी तुमच्यातील सुप्त, नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया, वेदना कमी करण्यात मदत करण्यासाठीच्या सोप्या मानसिक युक्त्या, तुम्ही कधीही पाद रोखून का धरू नये ? आणि यांसारख्या इतर बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे.

“जेव्हा तुम्हाला वैद्यकीय तथ्ये आणि वैद्यकीय मिथके एकमेकांपासून विलग करावयाची असतील तेव्हा डॉ. करणसारखे दुसरे कोणी नाही. हे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला जितके हसायला लावेल, तितक्याच प्रमाणात शिकवेलही.”
– डॉ. जूली स्मिथ
---

_🔹 2️⃣ काय, किती आणि कसं खायचं?_
✍️ लेखिका: अमिता गद्रे
📄 पृष्ठे: 180
💰 मूळ किंमत: ₹250

🍳 "अंडं खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?"
🥭 "मधुमेह असलेला माणूस आंबा खाऊ शकतो का?"
💪 "पुरेसं प्रोटीन मिळवायचं तरी कसं?"
🍯 "साखरेऐवजी गूळ खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते का?"
✅ उत्तरं मिळवा या पुस्तकातून!
२० वर्षांचा अनुभव असलेल्या न्यूट्रिशनिस्टने लिहिलेलं,
सोप्या भाषेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन देणारं पुस्तक.

🗣️ विशेष शिफारसी:

> “नो नॉनसेन्स पण प्रॅक्टिकल दृष्टिकोन! जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारे पुस्तक.”
— सई कोराठे – खांडकर
“आहार कसा असावा याचं सहज, सोपं आणि सुसंगत उत्तर!”
— अंकेत गाडगव
---

_📦 दोन्ही पुस्तके मिळवा आणि तुमच्या शरीर व मनासाठी आजच एक सकारात्मक पाऊल उचला!_

📞 ऑर्डरसाठी संपर्क: 9637351400
📲 Google Pay / PhonePe: 7028619581
🖼️ पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट वरील संपर्क क्रमांकावर पाठवा

📅 फक्त 25 जूनपर्यंतच – योग दिन विशेष ऑफर चुकवू नका!

शिवजयंतीनिमित्त करा वाचनीय पुस्तकांची खरेदी...🍀📚✅ जाड कव्हर ✅ उत्तम दर्जाचा कागद ✅ उत्कृष्ट बांधणीदहा पुस्तकांचा संच सवल...
05/02/2025

शिवजयंतीनिमित्त करा वाचनीय पुस्तकांची खरेदी...🍀📚

✅ जाड कव्हर
✅ उत्तम दर्जाचा कागद
✅ उत्कृष्ट बांधणी

दहा पुस्तकांचा संच सवलतीच्या घरात घरपोच...

एकूण किंमत - 415/-
पोस्ट खर्च 100/-
एकूण 515/-

सवलतींच्या दरात घरपोच फक्त 444/-

पुस्तकांची नावे आणि किंमत 🔽
1️⃣ शिवचरित्राची शिकवण 40/-
2️⃣ शिवाजी महाराजांच्या पत्रातून कळणारे शिवाजी महाराज 50/-
3️⃣ शिवचरित्रातील शंभूराजे 40/-
4️⃣ शिवाजी शूद्र कसा? 40/-
5️⃣ शिवकालीन जलनीती 50/-
6️⃣ महात्मा फुले यांचा गणपती 40/-
7️⃣ शारदा झाली सरस्वती 40/-
8️⃣ बुद्धाचे ज्ञानप्राप्ती एक महाकाव्य 25/-
9️⃣ मनुस्मृती, संघ, हिंदुत्व व संविधान 40/-
🔟 50 कोटी नि गांधी हत्या 50/-

सर्व पुस्तकांची एकूण पाने (कव्हर सह) - 387

Whats app - 9637351400

Google pay phone pay 7028619581

(वरील क्रमांकाला पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट व्हाट्सअप क्रमांकावर पाठवणे.)

आपला संच आजच बुक करा.

हा मेसेज आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवा.

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वाचन चळवळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share