Sarang Nerlekar Granth Vitarak

Sarang Nerlekar Granth Vitarak प. पु. श्री. के. वी. बेलसरे यांच्या सर्व ग्रंथांचे वितरक

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : श्री. के. वि. बेलसरेमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन ग...
07/07/2025

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : श्री. के. वि. बेलसरे
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर.
साताऱ्या जवळील गोंदवले येथील छोटयाशा गावात जन्म झालेल्या एका परमात्म्याचा प्रवास या चरित्रात लिहिला आहे. 'मी देहच आहे' या कल्पनेचा त्याग करून 'मी आनंदरूप ब्रह्म आहे' अशी साक्षात अनुभूती ज्याला येते त्याला सत्पुरुष म्हणतात. श्री महाराज असेच सत्पुरुष असल्याने त्यांचे जीवन स्वानंदाच्या मस्तीने काठोकाठ भरलेले होते. 'जो निरंतर नाम घेतो, राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम, जग त्याचे गुलाम' हे महाराजांच्या शिकवणीचे सार.
प्रा. श्री. के. वि. बेलसरे यांच्या लेखणीतून उतरलेले महाराजांचे दिव्य चरित्र खरंच अलौकिक आहे. वाचताना स्वतःला पूर्ण हरवून जाणाऱ्या साधकाच्या, वाचकाच्या हृदयाला ते भिडते आणि तो अक्षरशः महाराजमय होऊन जातो. श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रवास हा किती राममय होता हे शब्दशः अनुभवायचे असेल तर श्री महाराजांचे चरित्र नक्कीच वाचावे.

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय
किंमत 500/-
----------------------------------------------
श्री बाबा बेलसरे लिखित उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला (दुर्मिळ चित्र आणि मानसपूजा ) :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना परमार्थप्रदीप -105/-
नामसमाधी सहज समाधी -120/-
साधकांसाठी संतकथा -120/-
ज्ञानदेवांचा सार्थ हरिपाठ -140/-
प्रेमयोग -110/-
चैतन्यगीता -120/-

पुस्तके मिळण्याचा पत्ता:
Sarang Nerlekar Granth Vitarak
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंतत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

साधकांसाठी संतकथा श्रीराम संतांची मानसिक अवस्था काय असते याचा अंदाज आला म्हणजे माणूस खऱ्या अर्थाने ईश्वराच्या नादी लागतो...
25/12/2024

साधकांसाठी संतकथा

श्रीराम

संतांची मानसिक अवस्था काय असते याचा अंदाज आला म्हणजे माणूस खऱ्या अर्थाने ईश्वराच्या नादी लागतो. ईश्वराच्या नादी लागलेल्या माणसाचा संसार चार लोकांसारखा होत नाही असे समजणें चूक आहे. त्याचा संसार इतरांच्या संसाराप्रमाणेच चालतो. उलट त्याच्या संसाराला निःस्वार्थी ईश्वरी प्रेमाचा आधार मिळाल्यामुळे त्याच्या प्रपंचामध्ये एक रम्यपणा निर्माण होतो. जो माणूस ईश्वरावर प्रेम करतो त्याच्यावर संत विशेष प्रेम करतात. त्या प्रेमाच्या प्रभावाने माणसे नैतिकदृष्ट्या प्रथम सुधारतात. नंतर त्यांचे मन खऱ्या अर्थाने ईश्वराकडे वळल्यामुळे त्यांना समाधानाचा खात्रीचा मार्ग सापडतो. संतांच्या जीवनांतील साध्या खऱ्या प्रसंगांमध्ये ईश्वराच्या अनुसंधानाचीं निरनिराळीं अंगे आढळतात. त्यांच्या साध्या बोलण्यामध्ये साधकाला मार्मिक सूचना मिळतात. प्रत्येक साधकाच्या संग्रही असावा असा सत्य कथांचा सर्वोत्कृष्ट संग्रह.

संकलन : के. वि. बेलसरे
किंमत : 120/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

II चैतन्य गीता II श्रीराम चैतन्य गीता म्हणजे श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनीं लिहिलेल्या पत्रांचा त्यांच्याच शब्...
25/12/2024

II चैतन्य गीता II

श्रीराम

चैतन्य गीता म्हणजे श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनीं लिहिलेल्या पत्रांचा त्यांच्याच शब्दांत दिलेला सारांश होय. श्रीमहाराजांचा पत्रव्यवहार फार मोठा होता, पण त्यांनीं लिहिलेल्या पत्रांपैकी पुष्कळ पत्रे काळाच्या उदरात गडप झाली. सध्या जवळजवळ तीनचारशे पत्रेच उपलब्ध आहेत. श्रीमहाराजांचें पत्र म्हणजे ज्याचे नांवे ते पत्र असते त्याच्याशी अगदीं आपलेपणाचे खाजगी संभाषणच होय. त्यांतील भाषाशैली सहजसुंदर, घरगुती, व्यवहारी आणि भगवंताच्या प्रेमानें भरलेली आढळते. प्रत्येक पत्रांत प्रत्येक शब्दागणिक आपल्या माणसाचें कल्याण व्हावें ही श्रीमहाराजांची उत्कट तळमळ दृष्टीस पडते. पण तो भगवंताला म्हणजे अध्यात्माला सोडून नाहीं आणि अगदीं सामान्य माणसांना लिहिलेल्या पत्रांमध्यें उपदेश आहे; पण गुरूपणाची भावना नाहीं. श्री बाबांच्या मतें श्रीमहाराजांचे पत्र म्हणजे अत्यंत साधेपणा, गोडवा, वात्सल्य आणि उत्स्फूर्त काव्य यांनीं नटलेला परमार्थपाठच होय.

श्री महाराजांशी संभाषण म्हणजे भगवंताच्या प्रेमाचा एक नवीन अनुभव आल्यासारखा वाटे, त्यांनीं लिहिलेली पत्रे वाचतांना असाच अनुभव येतो. म्हणून सगळ्या पत्रांतील विविध विषयांवरील म्हणीवजा वचनें शोधून काढून, तसेंच त्यांची अध्यायवार रचना करून, ही चैतन्यगीता संग्रहित केली. दैनंदिन व्यवहारांत येणाऱ्या साध्या प्रसंगीं कसें वागावें येथपासून ब्रह्मज्ञानी किंवा संत कसे बनावे येथपर्यंत, सर्व विषयांवर श्रीमहाराजांनी मार्गदर्शन केलें आहे आणि त्याचेच संकलन श्री चैतन्य गीता यात आपल्याला मिळेल.
मूल्य : 120/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ) :श्रीराम हरिपाठ म्हणजे संतरचित एक लहानसा अभंगसंग्रह. त्या अभंगांमधे भगवंताच्या प्राप्ती...
25/12/2024

श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ) :

श्रीराम

हरिपाठ म्हणजे संतरचित एक लहानसा अभंगसंग्रह. त्या अभंगांमधे भगवंताच्या प्राप्तीचें साधन म्हणून नामस्मरणाचे वर्णन केलेले असते. भगवंताच्या नामस्मरणानें भगवंताचे अनुसंधान कसें ठेवता येतें आणि त्या अनुसंधानाचे पर्यवसान भगवंताच्या दर्शनांत कसें घडून येते याची रूपरेषा हरिपाठांत मिळते. मराठीमधे अनेक हरिपाठ आहेत. त्यांमधे श्रीज्ञानदेवांच्या हरिपाठाचा पहिला क्रमांक लागतो. श्रीज्ञानदेवांना त्यांच्या सद्‌गुरूंनीं म्हणजे श्रीनिवृत्तिनाथांनी - अनुग्रह देतांना हरिनाम दिले. श्रीज्ञानदेवांनी त्या नामाचा मोठा अभ्यास केला. त्या नामस्मरणानें त्यांना भगवंताचें दर्शन झाले. भगवंताच्या नामस्मरणानें माणसाला भगवंताचें दर्शन घडते हा स्वतःचा अनुभव लोकांना सांगण्यासाठीं त्यांनी हरिपाठाची रचना केली.
श्री निवृत्तिनाथांच्या संमतीने आध्यात्मिक योग्यता पावलेला हा हरिपाठ साधकांना पूर्ण भरंवशाचा मार्गदर्शक आहे. माझे गुरुदेव (श्री महाराज) स्वतः नामावतार होते. भगवंताचे नाम त्यांना प्राणापलीकडे प्रिय होते. त्यांच्या तोंडून श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ ऐकतांना दोघांचे (श्री ज्ञानदेव आणि श्री महाराज) नामप्रेम पाहून श्रोते मोहून जात. त्या निरूपणांचा आधार घेऊन हा सार्थ हरिपाठ तयार केला आहे. नामस्मरणाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक साधकाला साधनेसाठी याचा उपयोग व्हावा हीच श्री पू. बाबांची इच्छा.
किंमत 140/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

ईश्वरभक्तिदर्शन अथवा प्रेमयोग : श्रीराम माणूस आणि ईश्वर यांचा मुकाबला नवीन नाही. फार पुरातन कालापासून माणसाला ईश्वराबद्द...
25/12/2024

ईश्वरभक्तिदर्शन अथवा प्रेमयोग :

श्रीराम
माणूस आणि ईश्वर यांचा मुकाबला नवीन नाही. फार पुरातन कालापासून माणसाला ईश्वराबद्दल कुतूहल वाटते. जगातील सत्पुरुष तर त्याचें साक्षात दर्शन घेतात. असा तो ईश्वर खरोखर मोठा विलक्षण आहे. ईश्वर आहे असें तर्कानें निर्विवादपणें सिध्द करता येत नाही. पण तो नाहीच असेंही तर्कानें ठामपणें म्हणता येत नाही.

ईश्वराची भक्ती आपल्या हातून घडावी असे कांहीं सज्जनांना मनापासून वाटते. पण ईश्वराबद्दल आणि त्याच्या प्रेमाबद्दल अनेक लहानमोठ्या शंका त्यांना त्रास देतात. त्या शांत होण्यास हा अभ्यास उपयोगी पडेल. भारतीय व युरोपियन तत्त्वज्ञानांमधे ईश्वराबद्दल अनेक संकल्पना आढळतात. त्यांपैकी अद्वैत ब्रह्माची संकल्पना बुध्दीचें जास्तीत जास्त समाधान करणारी आहे.

तत्त्वज्ञानांत कठिणपणा दोन प्रकारचा असतो. एक मूळ विषयाचा आणि दुसरा भाषेचा व मांडणीचा. भक्ति माणसाला सहज असल्यानें तिच्या तत्त्वज्ञानामधें विषयाचा कठिणपणा नाही. श्री बाबांनी सर्व सामान्य साधकाला सुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत कठिणपणा न येऊ देता आपल्या समोर मांडले आहे.
मूल्य : 110/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

नाम समाधी / सहज समाधी श्रीराम : मनुष्य जन्माला आलेला प्रत्येक जीव, आत्मज्ञानाच्या व समाधानाच्या अनुभवास पात्र असतो. असे ...
25/12/2024

नाम समाधी / सहज समाधी

श्रीराम :

मनुष्य जन्माला आलेला प्रत्येक जीव, आत्मज्ञानाच्या व समाधानाच्या अनुभवास पात्र असतो. असे असूनही तो शाश्वत समाधानाच्या शोधात असफल होतो व नाना प्रकारची दुःखे भोगतो.
सद्‌गुरुंच्या सहवासांत त्यांच्या कृपेने सामान्य प्रापंचिकांची नामसाधनेला सुरुवात होऊन तो साधक बनतो. चिकाटीने नामसाधना केल्यास, भगवंताचे स्मरण जीवनाच्या सर्व प्रसंगामध्ये आणि मनाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत टिकून त्यांस नामसमाधी साधते.
"जग हे माझ्यासाठी आहे" असे म्हणणारा तो, 'मी पणाने" संपतो, त्यांच्या अंतरीचे अज्ञान लुप्त पाउन दुःखस्पर्श नसलेल्या आनंदाचा त्यास अनुभव येतो. त्याचे जीवन आतबाहेर निर्भय, चिंतामुक्त व कृतकृत्य होते.
प्रपंचातील सर्व व्यवहार चालू असता, स्वाभाविक असणारी, जशीच्या तशी टिकणारी व उपाधिरहित अशी "सहजसमाधी" साधकाला फक्त नामसाधनेने कशी साध्य होते.
असा नामसमाधी - सहजसमाधी हा प्रत्येक साधकाच्या जवळ असावा असा अभ्यास पू. बाबांनी आपल्याला या पुस्तिकेत दिलेला आहे.
मूल्य : 120/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44

Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

नामसाधना / परमार्थ प्रदीप श्रीराम 🚩नामसाधना : जीवनाचा विकास होऊन मनाची पातळी वाढली म्हणजे माणसाला सुख दुःखाची कल्पना येत...
25/12/2024

नामसाधना / परमार्थ प्रदीप

श्रीराम 🚩

नामसाधना :
जीवनाचा विकास होऊन मनाची पातळी वाढली म्हणजे माणसाला सुख दुःखाची कल्पना येते परंतु अनुभव असल्याशिवाय त्याचे खरे ज्ञान होत नाही. मानवी जीवन सुख दुखांचे मिश्रण असते, केवळ सुख किंवा केवळ दुःख असे कोणाच्या वाट्याला येत नाही. कोणाकडे कमी सुख असते किंवा कमी दुःख असते. ते कमी जास्त प्रमाणात असू शकते.
या सुख दुःखाच्या पलीकडे जाण्याची क्रिया फार कमी जणांना साधता येते आणि ज्यांना ती जमलीय त्यांनाच आपण संत म्हणतो. म्हणून सर्व सामान्य लोकांनी ती साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडायचे नाही, संतांचे अनुकरण करणे सोडायचे नाही. ते ज्या मार्गाने गेले आहेत त्याच मार्गावर आपण गेले पाहिजे. मार्ग भरपूर आहेत, साधने ही भरपूर आहेत पण सामान्य माणसाला सहज जमेल असा नामस्मरणाचा सरळ आणि हुकमी मार्ग सोप्या शब्दात पू. बाबा बेलसरे यांनी या पुस्तकात साधकांसाठी दिला आहे.

परमार्थ प्रदीप :
परमार्थ म्हणजे काय तर आत्मज्ञानाने संपन्न अशी मंगल व पवित्र जीवन प्रणाली. परमार्थी माणूस हा निर्भयतेने अत्यंत शांत राहतो. कोणत्याही परिस्थितीत सर्व जीवांवर अत्यंत निस्वार्थी प्रेम ठेवत त्यांच्या दुःखाचा परिहार करण्यात सदैव मग्न असतो.
परमार्थ हा नुसता बोलायचा किंवा सांगायचा नसतो तर दैनंदिन जीवनात आचरणात पण आणायचा असतो. सर्वांवर निरपेक्ष प्रेम कसे करावे, स्वतःसकट सर्वांच्या जीवनात शांती, संतोष आणि समाधान परमार्थाने कसे भरून टाकावे याचे सार अतिशय साध्या, सोप्या शब्दात पू. बाबांनी परमार्थ प्रदीप या भागात सांगितले आहे.
किंमत : 105/-

प. पू. बाबा बेलसरे यांची उपलब्ध ग्रंथ संपदा :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
बृहदारण्यक उपनिषद :- 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
बोधवाचने :- 80/-
शरणागती :- 70/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 80/-
आनंदसाधना :- 100/-
अंतर्यात्रा :- 80/-
मनाची शक्ती :- 90/-
नामसाधना - परमार्थ प्रदीप :- 105/-
नामसमाधी - सहज समाधी :- 120/-
साधकांसाठी संतकथा :- 120/-
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ :- 140/-
चैतन्य गीता :- 120/-
प्रेमयोग :- 110/-

वितरण व्यवस्था
Sarang Nerlekar Granth Vitarak
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545 7777 44
Location:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

बृहदारण्यक उपनिषद् अनुवादक : श्री. के. वि. बेलसरे.उपनिषद् या शब्दामध्यें उप, नि व सद् अशीं तीन पदे आहेत. उप म्हणजे जवळ, ...
28/03/2022

बृहदारण्यक उपनिषद्
अनुवादक : श्री. के. वि. बेलसरे.

उपनिषद् या शब्दामध्यें उप, नि व सद् अशीं तीन पदे आहेत. उप म्हणजे जवळ, सद् म्हणजे बसणें, आणि नि म्हणजे मनापासून किंवा भक्ति- नम्रभावानें. उपनिषद् म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी विधिपूर्वक गुरूच्या जवळ जाऊन नम्रपणानें व भक्तिभावानें बसणें. अज्ञान नाहींसें करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद् असा अर्थ श्रीमच्छंकराचाऱ्यांनी केला आहे.

एकंदर उपनिषदांमध्ये बृहदारण्यक सर्वांत महत्त्वाचें उपनिषद् मानलें जातें. आकाराने सर्वांत मोठें असणाऱ्या अरण्यकाला बृहदारण्यक म्हणतात. वार्तिककार सुरेश्वर यांनी तर ग्रंथाचा आकार व अर्थ दोन्हीं दृष्टींनीं बृहदारण्यक थोर आहे असा शेरा मारला आहे.
या उपनिषदात ब्रह्मविद्याविषयक तीन संवाद म्हणजेच याज्ञवल्क्य - मैत्रेयी संवाद, याज्ञवल्क्य - गार्गी संवाद, जनक - याज्ञवल्क्य संवाद असे आहेत.

श्री. के. वि. बेलसरे यांनी बृहदारण्यक उपनिषदावर श्रीमच्छंकराचार्य यांच्या संस्कृत भाष्याचा सुरस आणि साधकाला सहज समजेल असा मराठी अनुवाद या विलक्षण ग्रंथात केला आहे.

बरेच वर्ष न मिळणारा हा ग्रंथ आपल्या जवळच्या सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध.

#किंमत 550/-

प्रा. के. वि. बेलसरे यांच्या पुस्तकांची यादी:

●श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय :- 500/-
●उपनिषदांचा अभ्यास : 550/-
● बृहदाराण्यक उपनिषद : 550/-
●श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
●पत्रांद्वारे सत्संग :- 100/-
●बोधवाचने :- 80/-
●शरणागती :- 50/-
●साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 60/-
●आनंदसाधना :- 80/-
●अंतर्यात्रा :- 60/-
●मनाची शक्ती :- 75/-
●ज्ञानेश्वरी खंड 5 वा :- 280/-
●ज्ञानेश्वरी खंड 6 वा :- 400/-
●ज्ञानेश्वरी खंड 7 वा :-300/-
●अध्यात्म संवाद भाग 1 :- 100/-
●अध्यात्म संवाद भाग 3 :- 175/-

पुस्तके मिळण्याचा पत्ता 📌
'सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक'
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545777744

रविवार बंद 🙏

Map:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

उपनिषदांचा अभ्यास'  श्री के. वि. बेलसरे. भारतीय ऋषींचें अनुभवसिद्ध सांगणे असें की परमात्मस्वरूपाचे अखंड स्मरण राखणें हें...
19/11/2021

उपनिषदांचा अभ्यास' श्री के. वि. बेलसरे.

भारतीय ऋषींचें अनुभवसिद्ध सांगणे असें की परमात्मस्वरूपाचे अखंड स्मरण राखणें हें त्या शोधाचें यथार्थ रूप आहे. परमात्मा सत्य आहे. ज्ञानमय आहे, अनंत व आनंदमय आहे. म्हणून परमात्म्याचे स्मरण ठेवण्यास आपण अनंत होणे जरूर आहे. आपण अनंत होण्यास आपला अहंकार आड येतो. त्या अहंकाराचें विसर्जन केलें की माणसामधें आनंदमय अनंत परमात्मा प्रगट होतो. त्या विराटपणाच्या अवस्थेला ब्रह्मदर्शन असे म्हणतात. त्याच दर्शनाचे अनेकांगीं वर्णन उपनिषदांचा अभ्यास या ग्रंथामधे आढळेल.

उपनिषदांवर शंकराचार्यांसकट अनेक विद्वान लोकांनी, अभ्यासकांनी भाष्य केले आहे परंतू श्री बाबा बेलसरे यांनी दहा उपनिषदांच्या मूळ संस्कृत श्लोकांचे सहज सोप्या पण अतिशय अभ्यासात्मक शब्दात भाषांतर या ग्रंथात केले आहे.

बरेच वर्ष उपलब्ध नसलेला आणि साधकाच्या अत्यंत उपयोगी असलेला श्री बाबा बेलसरे यांचा 'उपनिषदांचा अभ्यास' हा ग्रंथ सर्वत्र उपलब्ध होत आहे.

आपल्या जवळच्या प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे मागणी करा.

श्री बाबा बेलसरे लिखित उपलब्ध ग्रंथ संपदा :
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : :- 500/-
उपनिषदांचा अभ्यास : 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
अध्यात्म दर्शन :- 300/-
पत्रांद्वारे सत्संग :- 100/-
बोधवाचने :- 80/-
नामसाधना परमार्थ प्रदीप :- 30/-
शरणागती :- 50/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 60/-
आनंदसाधना :- 80/-
अंतर्यात्रा :- 60/-
मनाची शक्ती :- 75/-
ज्ञानेश्वरी खंड 5 वा :- 280/-
ज्ञानेश्वरी खंड 6 वा :- 400/-
ज्ञानेश्वरी खंड 7 वा :-300/-

वितरण व्यवस्था
Sarang Nerlekar Granth Vitarak
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2
मोबाईल : 9545777744
Map:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : श्री. के. वि. बेलसरेमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन ग...
10/11/2021

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : श्री. के. वि. बेलसरे

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर.

साताऱ्या जवळील गोंदवले येथील छोटयाशा गावात जन्म झालेल्या एका परमात्म्याचा प्रवास या चरित्रात लिहिला आहे. 'मी देहच आहे' या कल्पनेचा त्याग करून 'मी आनंदरूप ब्रह्म आहे' अशी साक्षात अनुभूती ज्याला येते त्याला सत्पुरुष म्हणतात. श्री महाराज असेच सत्पुरुष असल्याने त्यांचे जीवन स्वानंदाच्या मस्तीने काठोकाठ भरलेले होते. 'जो निरंतर नाम घेतो, राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम, जग त्याचे गुलाम' हे महाराजांच्या शिकवणीचे सार.

प्रा. श्री. के. वि. बेलसरे यांच्या लेखणीतून उतरलेले महाराजांचे दिव्य चरित्र खरंच अलौकिक आहे. वाचताना स्वतःला पूर्ण हरवून जाणाऱ्या साधकाच्या, वाचकाच्या हृदयाला ते भिडते आणि तो अक्षरशः महाराजमय होऊन जातो. श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रवास हा किती राममय होता हे शब्दशः अनुभवायचे असेल तर गेले काही दिवस न मिळणारे हे चरित्र आता सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय
किंमत 500/-

----------------------------------------------

श्री बाबा बेलसरे लिखित उपलब्ध ग्रंथ संपदा :
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्‍‍मय : :- 500/-
उपनिषदांचा अभ्यास : 550/-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :-375/-
अध्यात्म दर्शन :- 300/-
पत्रांद्वारे सत्संग :- 100/-
बोधवाचने :- 80/-
नामसाधना परमार्थ प्रदीप :- 30/-
शरणागती :- 50/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 60/-
आनंदसाधना :- 80/-
अंतर्यात्रा :- 60/-
मनाची शक्ती :- 75/-
ज्ञानेश्वरी खंड 5 वा :- 280/-
ज्ञानेश्वरी खंड 6 वा :- 400/-
ज्ञानेश्वरी खंड 7 वा :-300/-

पुस्तके मिळण्याचा पत्ता:

Sarang Nerlekar Granth Vitarak
C/o नेर्लेकर बुक डेपो
शॉप नं. 1 अप्पा बळवंतत चौक, सारस्वत बँक बिल्डींग, पुणे-2

मोबाईल : 9545777744

Map:
https://maps.app.goo.gl/GkHPHw8xg8yDYUeh7

मनाची शक्ती विश्व आणि त्याची सर्व रूपे ही मुळात शक्तिरूप आहेत. परमार्थ हा शक्तिचाच खेळ आहे. मनुष्य आपल्या मनाची शक्ति दृ...
20/09/2021

मनाची शक्ती

विश्व आणि त्याची सर्व रूपे ही मुळात शक्तिरूप आहेत. परमार्थ हा शक्तिचाच खेळ आहे. मनुष्य आपल्या मनाची शक्ति दृष्याकडून सच्चिदानंदाकडे वळवतो. परंतु त्याला याचे ज्ञान नसल्याने तो हवा तसा शक्तिसंचय करू शकत नाही. अथवा अनेकदा शक्तिक्षय झाल्याने साधनाला यश येत नाही. या सर्व प्रक्रियेचे दीर्घ वर्णन पूजनीय बाबांनी या पुस्तकात केले आहे.

यामुळे साधकास त्यांच्या साधनमार्गात अवश्य महत्वाचे आणि मोठे मार्गदर्शन मिळेल.

श्री बाबा बेलसरे लिखित उपलब्ध वाङमय :

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चित्रमाला :- 375/-
अध्यात्म दर्शन :- 300/-
पत्रांद्वारे सत्संग :- 100/-
बोधवाचने :- 80/-
श्री ज्ञानदेवांचा सार्थ हरिपाठ :- 80/-
नामसाधना परमार्थ प्रदीप :- 30/-
अध्यात्म संवाद भाग 1 :- 100/-
अध्यात्म संवाद भाग 2:-175/-
अध्यात्म संवाद भाग 3 :- 175/-
शरणागती :- 50/-
साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा :- 60/-
आनंदसाधना :- 80/-
अंतर्यात्रा :- 60/-
मनाची शक्ती :- 75/-
ज्ञानेश्वरी खंड 5 वा :- 280/-
ज्ञानेश्वरी खंड 6 वा :- 400/-
ज्ञानेश्वरी खंड 7 वा :-300/-

मे. सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक
C/o नेर्लेकर बुक डेपो
अप्पा बळवंत चौक, शॉप नं. 1, सारस्वत बँक बिल्डींग, प्रगती हाईट्स, पुणे 2
फोन : 9545 777 744

Address

C/o Nerlekar Book Depot, Shop No-1, Pragati Heights Appa Balvant Chowk, Saraswat Bank Building
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6pm

Telephone

+919545777744

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarang Nerlekar Granth Vitarak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sarang Nerlekar Granth Vitarak:

Shortcuts

Share