03/07/2024
जीवनाचे सारे वैभव-सौंदर्य, संघर्ष, विपत्ती, दुःख, अश्रू हे सारे जाणावे आणि तरीही आपले मन साधे ठेवावे, ही एक मोठी कला आहे.
प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला दुःखाला सामोरे जावे लागतेच! आपण आपल्या अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपल्याला समजून येईल की, दुःख आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दुःख आपल्यातील 'मी'पणा मिटवते. दुःख वेदनेची आपण अबोल साथ जर स्वीकारली तर, आपण प्रेम करुणेच्या दिशेनेही जाऊ शकतो.
अखेरीस दुःख हा एक प्रकारे आपल्याला बसलेला धक्काच असतो. जी दुःखे आपण एकट्याने एकांतात भोगतो, ती आपल्या आतले अवकाश अधिक विस्तारतात.
जे. कृष्णमूर्ती म्हणतात, 'दुःख माणसाला एकटं करतं आणि इतरांपासून तोडून टाकतं! आपण या दुःखाच्या फार आहारी जाण्याचे टाळले पाहिजे. दुःख जर अटळच असेल,
तर ते सूज्ञपणे सहन करून व त्याच्या फारशा खाणाखुणा मागे न ठेवता, त्यातून बाहेर कसे पडावे, हे आपल्याला कळले पाहिजे. ज्या माणसाला अगदी जाणीवपूर्वक सुबुद्धपणे दुःख कसे भोगायचे हे कळते, त्याला अगदी खराखुरा असा जगण्यातला परमानंद कळतो. मात्र यात दुःखापुढे नुसती मान तुकवणे किंवा दुःखाचा अपरिहार्य स्वीकार असता कामा नये. आपण दुःख स्वीकारावे, ते सहन करावे, असे म्हणत नाही, तर त्या दुःखाबरोबर काही हालचाल न करता, काही कृती न करता राहण्याबद्दल मी बोलत आहे. त्यातून महान करुणा उपजते आणि त्या करुणेतून सर्जन घडते.
दैनंदिन प्रेरणा
(दिशा आणि दृष्टी)
लेखन, संकलन, संपादन आणि मराठी अनुवाद
डॉ. कमलेश सोमण । जीवन आनंदगांवकर
मूल्य रु. २५०/- फक्त
सवलतीत २००/- + पोस्टेज / कुरियर
आजच खरेदी करा
✴️ खरेदीसाठी संपर्क ✴️
Let's Read - चला वाचू या!
७३८७१५४९५९
७३५०२९८५२८
मेसेज मध्ये नाव,पत्ता व पुस्तकाचे नावे पाठवा.
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Payment options
Google Pay
Apeksha Jadhav 7350298528
Phone Pay / Google Pay
Mukesh Jadhav 7387154959
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
इतर मराठी पुस्तकांच्या माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/LETS-READ-1260566530748608/
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶