15/07/2026
माझा उद्योजकीय प्रवास – 1: सुरुवात
प्रत्येक व्यवसायाची एक गोष्ट असते, आणि ही माझी गोष्ट आहे.
अनेकांप्रमाणे, माझ्याकडे एक स्थिर नोकरी होती. पण मला नेहमीच काहीतरी शिकावे असं वाटत असायचे, हॉबी कलासेस असतात हे मी बऱ्याचवेळा ऐकले होते, छंद जोपासायचे पण क्लास असतात तेव्हा माहित नव्हतं, वेगळं काहीतरी शिकू म्हणून चॉकोलेट पासून सुरवात केली डिसेंबर 2017 मधे, सॅलरी मधून थोडे पैसे साठवून चॉकलेट मेकिंग चे सगळे सामान जमा केले आणि केली सुरवात.
सुरवात करताना वाटलं नव्हतं की आपण आपल्या आवडीसाठी शिकलेल्या गोष्टीपासून बिझनेस सुरु करू किंवा पैसे कमवू.
पहिल्यांदा चॉकलेट सेल करण्याचा मला अनुभव माझ्या भाच्या च्या शाळेमधे आला, आणि 3-4 तासामध्ये मी 1800₹ चे चॉकलेट सेल केले आणि सुरवात झाली माझ्या अद्विक चॉकलेट डिलाईट ला...
त्या 3-4 तासांच्या अनुभवाने मला Advik Delight ( estd 2018) सुरू करण्यास प्रवृत्त केले, एक लहानसा उपक्रम जो आवड, निर्धार आणि असंख्य शिकण्याच्या अनुभवांतून जन्माला आला.
काहीही शॉर्टकट नव्हते. मी आव्हाने पेलली, चुका केल्या, माझी नोकरी आणि व्यवसाय यांचा समतोल साधला, आणि अनेकदा मी योग्य मार्गावर आहे का असा प्रश्नही पडला. पण मी पुढे जात राहिले कारण मला विश्वास होता की प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं असतं.