Muktangan prakashan

Muktangan prakashan Online Book Store: http://muktanganprakashan.in/

हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथनvisit: muktanganprakashan.in/book_info.php?bookid=11www.muktanganprakashan.in -...
02/11/2014

हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन
visit: muktanganprakashan.in/book_info.php?bookid=11
www.muktanganprakashan.in - स्वस्त दरात ऑनलाईन पुस्तक खरेदी.

20/10/2014
अ प्रिझनर ऑफ बर्थलेखकः जेफ्री आर्चरप्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊससाधे, सामान्य जीवन जगत असतानाच मित्राचा खून केल्याचा आरो...
19/10/2014

अ प्रिझनर ऑफ बर्थ
लेखकः जेफ्री आर्चर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस

साधे, सामान्य जीवन जगत असतानाच मित्राचा खून केल्याचा आरोप येतो आणि स्वप्नातही कधी तुरुंग न पाहिलेल्या डॅनी कार्टराइटला २२ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. तुरुंगातून बाहेर येतो आणि तिच्या साथीने नावाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी अथक प्रयत्न करतो. अखेर खर्या गुन्हेगारांना तो धडा शिकवितो. जेफ्री आर्चर यांच्या अ प्रिझनर ऑफ बर्थ या कादंबरीची ही कथा उत्कंठावर्धक असून, वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्याचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.

http://muktanganprakashan.in/book_info.php?bookid=990

युगंधरा एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते. आहसी उदाहरणे जगातही अनेकदा दिसतात. यावर आधारित डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची युग...
25/09/2014

युगंधरा
एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते. आहसी उदाहरणे जगातही अनेकदा दिसतात. यावर आधारित डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा कादंबरी वाचकांचा ठाव घेते. यातील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आई-वडिलांची लाडकी लेक दोन भावांची लाडकी बहिण. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा तिच्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते.

त्यांचे जग उभे करताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. त्यात प्रेमाची आहुती पडली तरी ती हसतमुखाने सर्वांचे करत राहते. भाऊ, वहिनींचे तिच्याकडे दुर्लक्ष झाले तरी ती बोल लावीत नाहीत. दुसऱ्यांसाठी झीजातच ती देह ठेवते. युगाची ही कहाणी अंतःकरणाला भिडते, अंतर्मुख करते. स्त्रीची अनेक रूपे तिच्यात दिसतात.
Visit: http://muktanganprakashan.in/book_info.php?bookid=1749

टू सर , विथ लव्हलेखकः ई.आर. ब्रेथवेट सरांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केल...
24/09/2014

टू सर , विथ लव्ह
लेखकः ई.आर. ब्रेथवेट

सरांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली, हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि असं करता करता एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करूलागले. तर असे हे सर! मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. सुरुवातीच्या काळात त्यांना वर्गातील मवाली मुलांशी सामना करावा लागला. पण एक दिवस हीच गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना सर म्हणून आदरानं हाक मारूलागली. किती नकळत हे सरांनी त्या मुलांच्या गळी उतरवलं ! एवढंच नव्हे... त्या मुलांच्या बरोबरीनं त्यांच्याच गलिच्छ वस्तीत वाढलेल्या पोरींना सन्मानानं मिस् म्हणून हाक मारायलाही त्या मुलांना सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एक दिवस या सर्वच्या सर्व सेहेचाळीस मुलांना सर म्युझियम आणि ऑपेरा दाखवायला घेऊन गेले ! तेव्हा मात्र सर्वांनाच वाटलं आता दंगा होणार. पण घडलं काही वेगळंच. जणू नवलच ! एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मसन्मानात केलं. आत्मविश्वासात केलं. दुस-यांवर नाहक संतापण्याऐवजी दुस-याच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. एका शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांविषयीची तळमळ, त्यांच्याविषयी वाटणारी सहसंवेदना, कळकळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम या सर्वांचाच हा विजय होता.
Visit: http://muktanganprakashan.in/book_info.php?bookid=1293

Address

Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Muktangan prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Muktangan prakashan:

Shortcuts

Share

Category