01/07/2026
Story time Wednesday 🌟🌟🌟
शनिवारी 27 जूनला द बॉक्स येथे सई टेंभेकर या गुणी गायिकेचा "Simply Saee" हा तिच्या स्वतःच्या रचनांचा गाण्यांचा कार्यक्रम बघण्याचा योग आला.
MBA च्या वेळची माझी गुणी विद्यार्थिनी अशी तिची ओळख आहेच माझ्या मनात, परंतु त्याहीपेक्षा जास्त उत्तम अशी ती कलाकार आहे!... हो, फक्त गायिका नाही, तर कलाकार आहे खऱ्या अर्थाने!
कलाकार ज्याप्रमाणे आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो तसेच सईचे आहे. मिळालेले गाणे फक्त गायचे किंवा नवीन शिकलेले गाणे सादर करायचे इतक्यापुरतीच तिची कला मर्यादित नाही. नवनवीन कलाकृतींचा आनंद घेणे, कविता लिहिणे, त्या संगीतबद्ध करणे या सर्व अंगांनी सई चे गाणे बहरत आहे असे मला जाणवले.
परवाच्या कार्यक्रमात तिने स्वतः लिहिलेली किंवा स्वतः गायलेली किंवा स्वतः संगीत दिलेली अशी विविध गाणी आणि त्यातून गायनाच्या विविध छटा सादर केल्या. बारीक बारीक ताना, मुरक्या इतक्या सहज आणि प्रभावीपणे गळ्यातून जात होत्या की प्रत्येक गाणे थेट मनाला भिडत होते.
तिच्या रचना खूप लोभस पण म्हणायला थोड्याश्या अवघड अशा असतात आणि त्यामुळे तिच्याकडूनच त्या ऐकणे हा एक आनंद क्षणच होता.
तिला साथ दिलेली राधिका अंतुरकर (गिटार) आणि गणेश (तालवाद्य) या दोघांनी आपापली छाप त्यांच्या वादनाने कार्यक्रमात निश्चित उमटवली. राधिकाचे विविध अंगी गिटार वादन मनाला भावून गेले.
सईनी सादर केलेल्या प्रत्येक गाण्यात तिच्या काही भावना होत्या, काही अनुभव होते आणि ती सर्व गाणी काही माणसांशी तिच्या मनात जोडलेली होती. या सर्वामुळे तिचे प्रत्येक गाणे "ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले" हे निश्चितच. अशा उत्तम कार्यक्रमाचे साक्षी मी आणि माझी आई होऊ शकलो याचे फार अप्रूप वाटले.
सई तुझे गाणे असेच फुलत राहो😊❤️
यानिमित्ताने माझ्या आईचे स्वतःचे प्रॉडक्ट (Creative Mindz) म्हणजेच Stone Miniatures सईला भेट म्हणून देता आले याचा आईला खूप आनंद झाला😊