12/09/2026
🚀 लातूरमध्ये MSME TEAM Initiative ला उत्स्फूर्त प्रतिसाद!
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) यांच्या MSME TEAM – Trade Enablement & Marketing Initiative अंतर्गत SIMACES Learning LLP आणि Easy Pay Limited यांच्या सहकार्याने लातूर येथे 7 सप्टेंबर 2026 रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात MSME उद्योजकांना Digital Commerce, ONDC, Online Selling, Digital Marketing तसेच आपल्या व्यवसायाला डिजिटल माध्यमातून अधिक व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
💡 डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून स्थानिक MSME व्यवसायांना नवीन बाजारपेठांशी जोडणे आणि व्यवसायवृद्धीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या लातूरमधील सर्व उद्योजकांचे मनःपूर्वक आभार! 🤝
🌐 डिजिटल होऊया…
नवीन बाजारपेठेशी जोडूया…
व्यवसायाची नवी भरारी घेऊया! 🚀