Aprup.in

Aprup.in सर्व प्रकारची पुस्तकं घरपोच मिळतील. ख?

पत्रकार गौरी कानेटकर यांचं ‘मृत्यु पाहिलेली माणसं’ हे भन्नाट पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. या पुस्...
29/01/2021

पत्रकार गौरी कानेटकर यांचं ‘मृत्यु पाहिलेली माणसं’ हे भन्नाट पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात मृत्युच्या दारातून परतलेल्या नऊ व्यक्तींच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक कहाण्या आहेत. यातील एक कहाणी आज अक्षरनामामध्ये

जोस सॅल्वडोर अल्वरेंगा : समुद्राच्या लाटांवर एक वर्ष जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारा जिगरबाज दर्यावर्दी

ही गोष्ट आहे २०१२ सालची. मेक्सिकोतल्या कोस्टा अझूल नावाच्या छोट्या गावातल्या मच्छीमार वस्तीतली. जोस सॅल्वडोर अल्वरेंगा हा मूळचा मेक्सिकोच्या शेजारी असलेल्या मध्य अमेरिकेतल्याच एल सॅल्वडोर देशातला मच्छीमार. त्याच्या गावातल्या रोजच्या भांडणांना आणि मारामारीला वैतागून तो मेक्सिकोतल्या कोस्टा अझूलमध्ये स्थिरावलेला असतो. आई-वडील, प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी या सगळ्यांना मागे ठेवून. खरं तर एल सॅल्वडोरसारख्या देशातून बाहेर पडणारी माणसं सहसा अशा गरीबड्या गावांमध्ये थांबत नाहीत. ती मेक्सिको पार करून अमेरिकेत जाण्याच्या मागे असतात. पण अल्वरेंगाचं प्रकरण वेगळं असतं. त्याला मुख्य गावापेक्षा मच्छीमार वस्तीशी जास्त देणं-घेणं असतं आणि जमिनीवरच्या व्यवहारांपेक्षा प्रशांत महासागराची ओढ अधिक असते.

वयाच्या दहाव्या वर्षीपासून अल्वरेंगा मासेमारीचंच काम करत आलेला असतो. त्याच्याइतका तरबेज मच्छीमार त्या वस्तीत दुसरा नसतो. मनमोकळा स्वभाव, सर्वांना मदत करण्याची तयारी आणि मच्छीमारीतलं कसब यामुळे तो लवकरच कोस्टा अझूलच्या मच्छीमार वस्तीत लोकप्रिय होतो. त्याला आपल्या बोटीवर ओढण्यासाठी मालकांची चढाओढ सुरू असते; पण अल्वरेंगाला ना पैशांचा मोह असतो ना कसली महत्त्वाकांक्षा. मासेमारीसाठी समुद्रात झोकून देणं आणि परतल्यावर मित्रांसोबत खाणं-पिणं, मौज करणं एवढंच त्याचं आयुष्य असतं. सार्‍या वस्तीप्रमाणेच आपल्या बोटमालकांचाही तो मित्र होऊन जातो.

१७ नोव्हेंबर २०१२. वस्तीत कुठल्याशा पार्टीची तयारी सुरू असते. वादळवार्‍याचे दिवस असतात, त्यामुळे बहुतेक मच्छीमार समुद्र शांत व्हायची वाट पाहत किनार्‍यावर पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये मश्गुल असतात. अल्वरेंगा मात्र अशा छोट्या-मोठ्या वादळांना घाबरून जमिनीवर थांबणारा नसतो. बोटीवरचा त्याचा नेहमीचा पार्टनर या वेळी काही कामामुळे त्याच्यासोबत येणार नसतो; पण त्यामुळे जाणं रद्द न करता तो नवा पार्टनर शोधतो, बोटीचं हवं-नको बघतो आणि पंचवीस फुटी मोटारबोट पाण्यात घालतो. त्याचा हा नवा पार्टनर कोर्डोबा नावाचा नवखा तरुण मुलगा असतो. त्याला ना मच्छीमारीचा फारसा अनुभव असतो, ना समुद्रात झोकून देण्याचा पिंड. पण एक दिवसाचा तर प्रश्न, असं म्हणून अल्वरेंगा त्याला सोबत नेतो. वादळ सुरूच असतं; पण अल्वरेंगाला त्याची सवय असते. त्यांची बोट आत नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघंही प्रचंड जाळं समुद्रात टाकायला सुरुवात करतात.

हे पुस्तक घरपोच मिळेल. खरेदीसाठी व्हॉटसअपवर (लिंक - https://wa.me/917304194194) संपर्क साधावा. खरेदीनंतर तुम्हाला पुस्तक जगतात घडणाऱ्या अनोख्या गोष्टी कळवु.

http://www.aprup.in/ | +91-7304194194 । [email protected]

‘गालापगोस’ म्हणजे कासवांचे बेट.ही बेटे आहेत सुंदर प्रशांत महासागरामध्ये. तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोट...
29/01/2021

‘गालापगोस’ म्हणजे कासवांचे बेट.

ही बेटे आहेत सुंदर प्रशांत महासागरामध्ये. तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांतून बनलेली ही बेटे म्हणजे या वसुंधरेवरील सर्वांत तरुण एकाकी भूमी.

अपघातानेच लाखभर वर्षांपूर्वी या बेटांवर काही मोजक्या सजीवांचा चंचुप्रवेश झाला. या अतिसंवेदनशील अधिवासामध्ये काही टिकले, काही संपले.

मोजक्याच वनस्पती, मूठभर पशु-पक्षी. त्यांच्या जीवनसाखळ्या अगदीच प्राथमिक, संशोधकांसाठी जणू बाळबोध लिपीच. पहिल्यांदा ती वाचली सर चार्ल्स डार्विन यांनी,

तोच उत्क्रांतिवादाचा जन्म. आजही माणूस तेथे पाहुणाच आहे,

आणि पाहुण्याने पाहुण्यासारखेच राहायला हवे, नाही का?

त्यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.

हे पुस्तक घरपोच मिळेल. खरेदीसाठी व्हॉटसअपवर (लिंक - https://wa.me/917304194194) संपर्क साधावा. खरेदीनंतर तुम्हाला पुस्तक जगतात घडणाऱ्या अनोख्या गोष्टी कळवु.

http://www.aprup.in/ | +91-7304194194 । [email protected]

Address

SHREEPRATHAMESH, PLOT NO. 63/65, NEAR MALU HIGHSCHOOL, SOUTH SHIVAJINAGAR
Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aprup.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aprup.in:

Share

Category