07/09/2026
कौशल्याची दखल… परिश्रमांची पावती!
साताऱ्यात पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सर्व सन्मानचिन्हे व स्मृतिचिन्हे तयार करण्याची जबाबदारी विश्वासाने “गौरव ट्रॉफीज्” वर सोपविण्यात आली.
ही संधी आव्हान म्हणून स्वीकारत, अतिशय कमी वेळेत दर्जेदार आणि आकर्षक ट्रॉफीज् साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हे काम उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ॲड. शुभम तंटक आणि दुर्गेशवीर भारती यांचा सत्कार करण्यात आला.
हा सन्मान केवळ आमचा नाही,
तर गौरव ट्रॉफीज् वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा आणि आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आहे.
अशा प्रतिष्ठेच्या उपक्रमात योगदान देण्याची संधी मिळणे हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे मित्र विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत आणि अनिल जठार यांचे विशेष आभार.
गौरव ट्रॉफीज् ला मिळालेला हा सन्मान आमच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
यशाचे सुवर्णक्षण!
गौरव ट्रॉफीज् सातारा
#गौरवट्रॉफीज् #सातारा #साहित्यसंमेलन #99वेअखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन #सन्मान गौरव यशाचेसुवर्णक्षण