23/04/2021
नाते पुस्तकांशी !
(निसर्ग माझा सखा परिवाराचा उपक्रम)
'बुकसागर.इन' या प्रायोजित संकेतस्थळाचा श्रीगणेशा !
लेखक आणि प्रकाशक यांना नम्र आवाहन !!
आपल्या जीवनामध्ये पुस्तकांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आजवर अनेक संतांनी, थोर व्यक्तिमत्वांनी पुस्तकांचं महत्व विषद केलेलं आहे. प्राचीन ग्रंथांपासून आजवर प्रकाशित झालेली विविध विषयांवरची अभ्यासपूर्ण पुस्तके आपल्यासाठी नेहमीच दिशादर्शक ठरणारी आहेत.
वाचनसंस्कृती अबाधित राहावी, वाचनातून चांगल्या त्या गोष्टी वेचण्याची सवय आणखी वाढावी आणि मान्यवर लेखक-प्रकाशक व चोखंदळ वाचक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या मुख्य उद्देशाने बुकसागर.इन या स्वतःच्या हक्काच्या संकेतस्थळावर पुस्तकांच्या नोंदणीचा श्रीगणेशा होतोय. एप्रिल २०२१ या महिन्यातला गुढी पाडवा आणि जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला आम्ही सुरुवात करतोय.
या संकेतस्थळावर विविध विषयांवरची पुस्तके, इ-पुस्तके आणि ऑडिओ स्वरूपातली पुस्तके वाचकांसाठी असणार आहेत. लेखकांच्या परवानगीने 'पुस्तक परिचय' हे सदर देखील प्रसिद्ध करणार आहोत, यामध्ये अनुभवी आणि जाणकार मान्यवरांनी लिहिलेले परीक्षण असणार आहे. सोबत 'लेखक परिचय' ही संकल्पना यथावकाश राबविण्यात येणार आहे.
संकेतस्थळाच्या एकूण प्रोजेक्टमध्ये पहिल्या टप्प्यात पुस्तके नोंदणी करण्यात येणार आहे. एप्रिल २०२१ मध्ये करण्यात येणाऱ्या सर्व पुस्तकांची नोंदणी ही संपूर्णतः मोफत असणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क -
व्हाट्सअप क्रमांक - 9881550200, 7020343280
नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी -
१) पुस्तकाचे नाव
२) लेखकाचे नाव
३) प्रकाशक ४) पुस्तकाची पाने
५) मूळ किंमत
६) डिस्काउंट % (असल्यास)
७) पुस्तकाचे वजन
८) मुखपृष्ठ, मलपृष्ठ + २ किंवा ३ पानाचे इमेजेस - (JPEG, PNG)
९) पुस्तकाबद्दल १० ते १५ ओळीतली माहिती
बुकसागर.इन साठी विविध समित्या गठीत केलेल्या आहेत.
१) मार्केटिंग
२) जाहिरात
३) लीगल
४) वितरण
५) तांत्रिक इ.
बुकसागर.इन हे संकेतस्थळ आपल्यासाठी २३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनादिवशी खुले होणार आहे, याची नोंद घ्यावी.
धन्यवाद
आपले विश्वासू
टीम बुकसागर.इन
9881550200