06/07/2020
#भिमसेनी_कापूर हा झाडांपासुन मिळवला जातो..हे कुणा कुणाला माहित आहे?
👇प्राप्त करने हेतु संपर्क 👇
--------------------------
जय श्री राम 🙏
जीन्हे आश्रम के शुध्द व सात्विक आयुर्वेदिक सामान चाहिए वह संपर्क करे हरि ॐ एजेंसी ठाणे आनंद पेंडूरकर 9892959198
9892449074
( तुलसी अर्क, नीम अर्क, गौमूत्र, साबण, चवनप्राश, मध, भिमसेनी-कापूर, फिनाइल, कफ सिरप, नैसर्गिक अगरबत्ती, गोचंदन धूपबत्ती, देशी गोबर के कंडे और भी बहुत सारी आयुर्वेदिक औषधि)
*👉🏻नोट - होम डिलिवरी चार्ज 50/- सामान सोसायटी बिल्डिंग मे लाकर दिया जायेगा अपनी सामान की लिस्ट वॉटसॅप करे*
अनेकांना कापूर म्हणजे काय हेच माहित नाही. केमिकल कापूर नी नैसर्गिक कापूर यातील फरक.
आपण जो कापूर पुजेत वापरतो तो चक्क रासायनिकरित्या बनवलेला असतो. क्यॆम्फ़र म्हणुन ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बॊन संयुगांच्या वर्गात मोडतो ज्याच्या ज्वलनाने हवेत शुध्दता न होता प्रदुषणच होणार आहे.बाजारात स्वस्त मिळणारे कापूर हा एक प्रकारचा मेणचट , ज्वलनशील नी पांढरट प्रकारचा रासायनिक प्रकार असतो .
अशिया खंडातल्या पुर्वेकडच्या काही देशांमधील जंगलांमध्ये एक सदाहरीत झाड आढळते [ Dryobalanops aromatica -family Dipterocarpaceae ] . सुमात्रा, ईंडोनेशिआ आणि बोर्निओया देशांमध्ये आढळणाऱ्या ह्या झाडापासून कापूर निर्मिती होते. नैसर्गिक उत्पादन असलेल्या कापराची किंमत महाग असते ज्याचा उपयोग खाण्यात, औषधांमध्ये, पुर्वापार धार्मिक विधींमध्ये केला जातो. मात्र हल्ली जो कापूर आपण अगदी स्वस्त भावात विकत घेतो तो टरपेन्टाईन प्रकारातलं ज्वालाग्रही रसायन असतं. हेच रासायनीक प्रमाण आपल्या विक्स वेपोरब वगैरे सारख्या औषधांमध्ये वापरलेले असते. हा कापूर खाण्यास योग्य नसतो. याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.
भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. सुमात्रा, बोर्निऒ च्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसं यांच्या उभ्या आडव्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. हे प्रमाण कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो.
आता हे वाचल्यावर अनेकांना हा प्रश्न छळू शकतो की भारतात ही झाडं आहे का?
हो, आहेत.
आपल्या अनेक शासकिय व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ही झाडं लावून त्यावर प्रयोग केले जाताहेत. भारताखेरीज, चीन, जपान सह अनेक पाश्चिमात्य देशांमधे याच्या औषधी गुणधर्मांवर अधिकाधीक संशोधन होतय. आपले पुर्वज खुप हुशार ज्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर सुपरिचीत होता.
भीमसेनी कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते.
कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते
*आयुर्वेदिक भिमसेनी कापूर कसा वापरावा*
हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.
१) सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
२) रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
३) पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा.
४) तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
५) केसातील कोंड्याकरीता : -
सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे
६) दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
७) खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.
*संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,*
-----------------------------------------------